राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने

Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34

खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्‍याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> माझी चंद्र रास आणि सुर्य रास कर्क आहे, नक्षत्र पुष्य.. सगळ्यात मजेशीर गोष्ट माझा नवराही कर्क राशीचा आहे.. आश्लेषा नक्षत्र.. दोघांची लग्न रास धनु आहे.. आता पुढील गमती जमती जाणकारांनी सांगाव्यात..

मस्त कॉम्बिनेशन आहे हे. तुम्ही दोघेही पापभीरू, सज्जन, हळवे, भाबडे आणि धार्मिक असणार. हे कॉम्बिनेशन कधीकधी जरा मिळमिळीत असू शकतं. म्हणजे सर्व जेवण शुद्ध तुपातलं शाकाहारी असल्यावर असतं तसंच. Happy

पण जरा सांभाळा. तुमच्या सज्जनपणाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला कोणीही सहज फसविण्याचा प्रयत्न करू शकेल.

>>> मी वृषभ आणि माझा नवरा तुळ..

खूपच छान कॉम्बिनेशन आहे हे. दोन्ही शुक्राच्या राशी. एकीकडे रसिकता तर दुसरीकडे कलाप्रियता असते.

>>> मी मिथुन आणि सौ. वृषभ याबद्दल थोड्काहीस

एकमेकांना पूरक जोडी आहे ही. दोघांपैकी कोणीही दुसर्‍याला फार डॉमिनेट करू शकणार नाही. दोघांकडे आत्मविश्वास भरपूर आहे. फारसं देवदेव करणार्‍यातले दोघेही नाहीत. दोघांकडे जीवनाचा आनंद घेण्याची रसिकता आहे.

>>> चंद्ररास - मीन लग्नरास - धनू . . .
काय स्वभाव वैशिष्ठ्ये असतात ??

धार्मिक स्वभाव, देव्/गुरू/अध्यात्म यावर अंधविश्वास, गुरूकृपा होते/अनुग्रह मिळतो, बुद्धिमान, पापभीरू आणि हळवा स्वभाव, चंचल मनोवृत्तीमुळे निर्णयशक्तीचा अभाव, शास्त्र्/गणित शाखेकडे ओढा, शीघ्रकोपी, आपली सर्व जबाबदारी देवावर टाकून निवांत राहणार, फारसे नेतृत्वगुण नाहीत.

फारसं देवदेव करणार्‍यातले दोघेही नाहीत>>> एकदम पटलं सौ. अजिबात नमस्कार करत नाही पण मी आहे देवभोळा थोडाफार, माझी लग्न रास कर्क आहे म्हणून असेल बहुदा मुलीची(वय वर्षे १.५ महिने) जास्त काळजी मलाच असते.

लाजोच्या प्रफेक्शनिस्ट असण्यावरुन अंदाज बांधला. (ज्या खटपटीच्या पाककृती आणि त्यांचे लेखन असते त्यावरुन.)<<< दिनेशदा Happy अगदी अगदी.... पर्फेक्श्नीस्ट आहे मी... हा व्यवस्थितपणा माझ्या वडलांकडुन आलेला आणि पाककलेची आवड आई कडुन Happy

माझी चंद्ररास नाही ओळखलित अजुन???

दिनेशदा,

>> मामा पैलवान मला मेषेचे वाटतात. (रोखठोक पणा !! म्हणजे नम्रता दाखवायची पण थेटपणे.)

तुमचं उत्तर जवळजवळ बरोबर. जवळजवळ अश्यासाठी म्हंटलं की या जगात दोनेक तास उशीरा आलो असतो तर माझा सूर्य मेषेत गेला असता. तीस दिवसांच्या प्रमाणात दोनेक तास म्हणजे जवळजवळ बरोबरच की! Happy

धन्यवाद! आता चांद्ररास ओळखा बघू! Happy

आ.न.,
-गा.पै.

>>अगदी अगदी.... पर्फेक्श्नीस्ट आहे मी... हा व्यवस्थितपणा माझ्या वडलांकडुन आलेला आणि पाककलेची आवड आई कडुन

मग लाजो, "थोडं मीठ घाला, अंदाजाने." हे वाक्य तुझ्या पाककृतीत सापडलं तर काय करायचं? Wink Proud

हायला!!!! धमाल आहे .. एकेकाची रास आणी स्वभाव.. Happy
माझी रास मला माहितीच नाही.. त्यामुळे जी सगळ्यात चांगली रास असेल ती माझी...:)

सानी, तुझी चंद्ररास माहिती नाही पण सौररास 'पाईसेस' किंवा 'व्हर्गो'!>>> आगाऊ, हे कशावरुन ठरवतात? आणि तुला माझी ही रास असेल, असे का वाटले? कुठल्या लक्षणांवरुन? आमच्या घरी नास्तिक वातावरण असल्याने कधी कुंडली वगैरे काढली नाही. नवराही तसाच, त्यामुळे लग्नातही कुंडली काढायची वेळ आली नाही. म्हणून माझी रास 'सांगा' असं म्हणाले, 'ओळखा' असं नाही. Happy

>> मामा पैलवान मला मेषेचे वाटतात. (रोखठोक पणा !! म्हणजे नम्रता दाखवायची पण थेटपणे.)>>> गा.पै. आणि दिनेशदा, तुम्हा दोघांच्याही राशी सेम आहेत का हो? दोघांचे स्वभाव, वावर, यात मला खुपच साम्य वाटतं... गा.पैं ची पोस्ट वाचतांना तुमचीच वाचतेय, असा भासही होतो क्वचित. Happy

सगळ वाचल्या वर सगळ्या राशीतले चांगले गुण माझ्या स्वभावात बसतात अस वाटतय, त्यामुळे नक्की कुठली रास घ्यावी कळत नाहीये Proud

>>म्हणजे नम्रता दाखवायची पण थेटपणे
म्हणजे काय गं सानी? Lol

झंपी माझे राशीगुण लिहीणार होती त्याचे काय झाले?
लाजोची चंद्ररास कुंभ.

>>म्हणजे नम्रता दाखवायची पण थेटपणे
म्हणजे काय गं सानी? >>> म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे Lol
अगं म्हणजे, जे बोलायचं ते थेट पण नम्रपणे... जे आहे ते सांगायचं पण कुणाला न दुखावता. समझी क्या?

आमच्या घरी नास्तिक वातावरण असल्याने कधी कुंडली वगैरे काढली नाही.>> माझेपण डीट्टो! बाबांनी तर त्यांची आणि आईची कुंडली फेकून दिली.
आगाऊ, हे कशावरुन ठरवतात? आणि तुला माझी ही रास असेल, असे का वाटले? कुठल्या लक्षणांवरुन?>> सौरराशी, ज्या जन्मतारखेवरुन ठरतात, त्यात 'पाईसेस' (मीन) सगळ्यात भावनाप्रधान रास आहे,
हे लोक सहजी दुखावतात, यांना सतत इतरांच्या भावनिक आधाराचा अश्युरन्स लागतो, तर्कदुष्ट नसतात, दिल से सोचनेवाले इ.इ.
तुझ्या पोस्ट्सवरुन तरी तू अशी असावीस हा अंदाज.

तुझ्या पोस्ट्सवरुन तरी तू अशी असावीस हा अंदाज.>>> हम्म्म... धन्स रे. माझे माबोव्यक्तित्त्व आणि प्रत्यक्ष स्वभाव यात काही अंतर नाही. Happy मला तर वाटतं, बहुतेक सगळेच जसे माबोवर वावरतात, तसेच प्रत्यक्षातही असतील. कोणीतरी म्हणालं होतं मागे, की प्रत्यक्ष भेटल्यावर ते लोक वेगळे वाटतात. मला नाही तसं वाटत.

हं पण एखादा मुखवटे चढवण्यात आणि नकला करण्यात फारच पटाईत असेल, तर गोष्ट वेगळी! Happy

>>> नवरा-बायकोची वृषभ + कुंभ (किंवा कुंभ + वृषभ) अशी जोडी असेल तर?

कुंभ रास बुद्धिप्रामाण्यवादी, अहंकारी, बुद्धिमान पण चंचल स्वभावाची असते. त्यामुळे निर्णयशक्ती दुर्बल असते. बराचसा आळशीपणाही असतो. कुंभवाले फारसे देवदेव करत नाहीत. जर ते चुकून अध्यात्माकडे वळले तर ज्ञानमार्गी किंवा कर्ममार्गी होतात. भक्तीमार्ग त्यांच्या अजिबात पचनी पडत नाही.

वृषभ रासही फारसे देवदेव करत नाही. पण बेधडक निर्णय घेतात. तसेच ते अतिशय रसिकही असतात.

कुंभ्-वृषभ असे नवराबायको किंवा बायकोनवरा असले तर, कुंभेच्या चंचल स्वभावाला वृषभेच्या बेधडक निर्णयशक्तीचा भक्कम आधार मिळतो. दोघेही देव देव्हार्‍याच्या बाहेर आणत नाहीत. पण वृषभेच्या रसिकतेच्या तुलनेत कुंभवाले जरा थंड असतात. तसेच दोघात अहंकारयुद्ध होण्याची शक्यता असते कारण दोघेही अजिबात पड खात नाहीत. पण एकंदरीत चांगली जोडी जमते कारण दोघेही एकमेकांना बरेचसे पूरक असतात.

राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने ओळखता येतात हाच प्रचंडा विनोदी समज आहे अन शरद उपाध्धेंनी ते बरोबर ओळखले आहे.

नाही.... १० ते १२ मे च्या मध्ये आहे>>> का.....य!
म्हणजे तू माझ्यासारखीच 'टॉरिअन' आहेस>>> दिनेशदा इज ग्रेट! त्यांना आपल्या दोघांचीही जन्मतारिख नाही माहित, तरी प्रेडिक्शन केले.. आता मी माझा आयडी आगाऊ आणि तू सानी असा करुन घे Proud

टॉरियन नाही म्हणाले, पण आपण दोघं मिथून राशीचे असं म्हणालेत ना ते! काहीतरी साम्य त्यांना आतून जाणवलं असेल...

Pages