टॅटिंग

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 14 February, 2012 - 01:37

टॅटिंग..... माझं अतिशय आवडतं काम. लग्न व्हायच्या आधी बरंच काही केलं होतं........अगदी मान मोडेस्तोवर बैठक........ चक्क ४-४ तास एका जागी बसून. लग्नानंतर इतका वेळच मिळाला नाही. बर्‍याच वर्षांनी पुन्हा शटल हातात घेतलं......... जुनं प्रेम पुन्हा उफाळून वर आलं Happy

DSC00446-1.JPGDSC00450-1.JPGDSC00453-1.JPGDSC00460-1.JPGDSC00463-1.JPGDSC00467-1.JPGDSC00469-1.JPGDSC00474-1.JPG

गुलमोहर: 

अरे वा ! खुप छान आहे जयवी ! माझ्याच्याने नाही बाई होत येव्हढं पेशन्सच काम . धन्य तुमची जयवी Happy
खुप मज्जा येते टॅटिंग करायला. पहिली गाठ जमायलाच खुप अवघड. अन नंतर खुप पेशन्स्चे काम. माझ्या आईने माझ्यासाठी टॅटिंगची लेस केली होती साडीसाठी. ती साडीला टाचतानाही माझा जीव मेटाकुटीला आलेला Happy हा, सापडला, IMG_7202 copy.jpg

अरे वा अवल....... सुरेख दिसतेय साडी लेसमुळे Happy

अपर्णा........ हो वेळ काढूनच बसायला हवं........ कारण पहिली गाठ शिकायला वेळ आणि पेशन्स लागतोच Happy

जयवी, आधी ही लेस डार्क अमसुली साडिला लावली होती, त्याला फारच सुरेख दिसायची. मग १० वर्षे ती साडी पुधडल्यावर साडी जुनी झाली पण लेस आहे तशी. मग या नव्या साडीला पुन्हा लावली. अजूनही लेस अगदी नव्यासारखी दिसते. ते दोरे खुप टिकावू असतात नाही Happy

मला थोडीफार माहिती आहे म्हणून सांगते, टॅटिंग करणं हे खरच खुप कौशल्याचे काम असते. एखादीजरी गाठ चुकली तर संपूर्ण डिझाईन खराब होउ शकते. संपूर्ण रुमाल सलग दोर्‍यात असतो. त्या गाठी अतिशय कौशल्याच्या असतात. दोर्‍याची रिंग करून त्याच धाग्याने त्या रिंगवर गाठ घालायची अन ती गाठ रिंगवर उलटवायची अन रिंगचा धागा आतून सरकता ठेवायचा. खुप कौशल्याचे काम. जयवी खुप रेखीव केलात तुम्ही रुमाल Happy

अवल.........अगदी अगदी Happy
हे धागे खरंच खूप टिकावू असतात. खूप कौशल्य, चिकाटीचं काम असल्यामुळे डीझाइन पूर्ण झालं की धन्य धन्य वाटतं Happy
तुझ्या आईने केलेले काही नमुने असतील तर फोटो टाक ना.

Pages