टॅटिंग

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 14 February, 2012 - 01:37

टॅटिंग..... माझं अतिशय आवडतं काम. लग्न व्हायच्या आधी बरंच काही केलं होतं........अगदी मान मोडेस्तोवर बैठक........ चक्क ४-४ तास एका जागी बसून. लग्नानंतर इतका वेळच मिळाला नाही. बर्‍याच वर्षांनी पुन्हा शटल हातात घेतलं......... जुनं प्रेम पुन्हा उफाळून वर आलं Happy

DSC00446-1.JPGDSC00450-1.JPGDSC00453-1.JPGDSC00460-1.JPGDSC00463-1.JPGDSC00467-1.JPGDSC00469-1.JPGDSC00474-1.JPG

गुलमोहर: 

खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे Happy

मंजुडी........ कुणी करतांना अगदी बघत रहावसं वाटतं ........ नेमकं हेच कारण होतं माझं हे शिकायचं Happy

क्या बात है गोळेकाका Happy

जयु, खुपच सुंदर
माझी ताई पण हा प्रकार खुप छान करते. वेगवेगळे सुंदर सुंदर डिसाईन्स बनवते ती..
एकदा तिने माझ्या फेन्ट कलर च्या प्लेन कमिज ला contrast कलर ची अशीच नाजुक लेस लावली होती
खुप खुलुन दिसत होता तो ड्रेस त्या मुळे Happy

जयश्रीताई, काय सुरेख रंग आहे आणि झालय पण मस्त! मी एकेकाळी हे शिकले होते, पण मग मागे पडल. आता पुन्हा करतेच सुरवात.
शटल, दोरा आणि कात्री एवढच साहित्य लागत असल्याने प्रवासात करायला बेष्ट! आसपासच्या बायांमध्ये प्रसिद्धी मिळते, ती बोनस!

माधुरी खरंय तुझं........फार गोड दिसतं हे.

समीर..... अरे हा एका विशिष्ट प्रकारचा दोरा असतो. शटलने ते विणत जायचं Happy

अनया......... अगदी अगदी...... आजूबाजूच्या लोकांमधे प्रसिद्धी हमखास Wink

सुंदर एकदम. एकेकाळी शिकायचा प्रयत्न केला होता हे पण.
कॉलेजमधे असे पर्यंत आईने केलेल्या क्रोशे किंवा टॅटिंगची लेस असलेलेच पेटिकोट वापरलेत.
मग मात्र शिंग फुटली अन हे सगळं मला नको म्हणून डिक्लेअर केलं होतं .

सुंदरच. Happy
काय पेशन्सचं काम आहे हे...
माझ्या आजीकडे हे उपकरण पाहिलं होतं, पण आजी ते करत असताना नव्हतं पाहिलं कधी.

हो ......... असतात ना पुस्तकं पण जास्त जपानी किंवा चिनी अशा कुठल्यातरी अगम्य भाषेत असतात. पण तुम्हाला भाषा न येतासुद्धा तुम्ही व्यवस्थित समजून करु शकता.

पण वाचून शिकता येणं मात्र अशक्य !!!!! मी व्हिडियोची लिंक दिलीये. ते बघून नक्की येऊ शकेल.

एकदा गाठ, पिकॉट्स, जोडणं हे सगळं आलं की तुम्ही कुठलंही डिझाइन करु शकता.

ते करतांना इतकं छान लयबद्ध दिसतं ना की बघणारी व्यक्ति इम्प्रेस व्हायलाच हवी Wink

शैलजा,
गुगलून बघितलत तर खूप सारे नमुने सापडतील. पण त्याची पहिली गाठ येण महत्त्वाच आहे. तेवढी व्हीडीओ वरून किंवा कोणाकडून तरी शिका.

>>>शटल, दोरा आणि कात्री एवढच साहित्य लागत असल्याने प्रवासात करायला बेष्ट!
हो माझ्या एका मैत्रिणीच्या आईने तिच्या पहिल्या अमेरिका वारीत, मुंबई ते शिकागो प्रवासात साडीची लेस केली होती. अर्थात हा ७-८ वर्षांपूर्वीचा काळ. तेव्हा तिची छोटी कात्री चालली होती सिक्युरिटी चेक मधे.
आणि इथे येऊन काकूंनी एका प्लेन साडीला ही लेस लावली तेव्हा काय सुंदर दिसत होती. भयंकर चिकाटीचं काम हे. हा प्रकार आणि क्रोशे या जन्मी शक्य नाही. Sad

मनापासून धन्यवाद Happy

खरंय......... युट्युब वर खजिनाच आहे.

धनश्री........ अगं जमणं शक्य नाही असं नाहीये गं.............. त्यासाठी फक्त रमणं गरजेचं आहे Happy

Pages