टॅटिंग

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 14 February, 2012 - 01:37

टॅटिंग..... माझं अतिशय आवडतं काम. लग्न व्हायच्या आधी बरंच काही केलं होतं........अगदी मान मोडेस्तोवर बैठक........ चक्क ४-४ तास एका जागी बसून. लग्नानंतर इतका वेळच मिळाला नाही. बर्‍याच वर्षांनी पुन्हा शटल हातात घेतलं......... जुनं प्रेम पुन्हा उफाळून वर आलं Happy

DSC00446-1.JPGDSC00450-1.JPGDSC00453-1.JPGDSC00460-1.JPGDSC00463-1.JPGDSC00467-1.JPGDSC00469-1.JPGDSC00474-1.JPG

गुलमोहर: 

खलास.
हे शटल आहे आईच्या वस्तूंमधे.
एखादा व्हिडिओ वगैरे मिळाला तर शिकेन आणि प्रॅक्टीस करेन

तहे दिल से शुक्रिया Happy

हो...... चांगलंच जिकीरीचं असतं.

ह्यात दोन गाठींची मिळून एक गाठ तयार होते. ती आली की तुम्हाला टॅटिंग येणारंच. ती गाठ शिकायला मात्र बरीच मेहेनत करावी लागते. एकदा ती करता आली........ की तुम्ही जगातलं कुठलंही डिझाइन करु शकता. फक्त फारच वेळखाऊ प्रकरण आहे हे. क्रोशेसारखं पटापट वाढत नाही अजिबात.

शिवाय जर रंग असे गोड वापरले की सुरवात करायच्या आधी हात, बोटं अगदी स्वच्छ धुवावी लागतात. नाहीतर पाकळ्या करताना हाताच्या मळाने काळपट होतात. उन्हाळ्यात मी करायचे तेव्हा (नागपूरचा कडक उन्हाळा) हाताला घाम यायचा. मग थोड्या थोड्या वेळाने हात पुन्हा धुवून करायचे.

ह्यात सफाई तेव्हाच दिसते जेव्हा तुमच्या पाकळ्यांचे आकार सारखे होतात.

सुंदर!! Happy

मस्त!!
ट्रेनमध्ये बायका असं टॅटिंग करत असतात. ते टॅटिंगचं यंत्र कुठून कुठे कसे फिरवतात ते काही केल्या समजत नाही, पण पाहत रहावं असं कसब आहे हे.

जयश्री,खुपच सुंदर्..टेटिंग ची गाठ बनवताना मी नेहमी तळ्यात -मळ्यात असे म्हणायची म्हणजे गाठ चुकत नाही.मी साडी लेस व सेंटर तेबल चा सेंटर्-पीस ओव्हल शेप मधे केला होता ते आठवले..

वा! कला सुंदरच आहे. आवडली.

कला असावी अशी, गाठींतून उकलत यावी |
सैल कुठे अन घट्ट कुठे, विण बांधत जावी ||

अतिशय सुंदर! रंगपण मस्त दिसतोय.

ह्यात दोन गाठींची मिळून एक गाठ तयार होते. ती आली की तुम्हाला टॅटिंग येणारंच. ती गाठ शिकायला मात्र बरीच मेहेनत करावी लागते. एकदा ती करता आली>>> मी पण केला होता शिकायचा प्रयत्न.

परत नव्याने शिकायची ईच्छा झालीय हे पाहून. शटल मिळवण्यापासून सुरवात करावी लागणार.

Pages