जरा वेगळे वाटते

Submitted by कल्पी on 11 February, 2012 - 10:49

जरा वेगळे वाटते ,गावकुस दुखरी वाटते
डोंगरास व्यापलेला अन एकांत त्रासलेला

जरा वेगळे वाटते ,कातरवेळेत घरी जाताना
पाचोळा उधळलेला अन आकांत ग्रासलेला

जरा वेगळे वाटते ,वाळक्या वनात चालताना
वणवा जळलेला ,अन मी भ्रांत विसरलेला

जरा वेगळे वाटते ,गाव अंधारात झोपलेला
लगबगीत मी अन मंत्र मातला जागलेला

जरा वेगळे वाटते अशा वेणा ऊसवताना
आठवणीचे गाव माझ्यातूनही उगवताना

कल्पी जोशी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

प्रद्युम्नसन्तु + १
त्रासलेला एकांत, ग्रासलेला आकांत, विसरलेली भ्रांत, मातलेला मंत्र, उसवणार्‍या वेणा.... सगळंच वेगळं.