पंढरीचे सुख वर्णावे किती

Submitted by परिमल गजेन्द्रगडकर on 5 February, 2012 - 10:08

लावोनिया चंदन उटी मणी कौस्तुभ शोभे कंठी|
भक्ताचिया साठी युगे अठ्ठावीस उभा जगजेठी |

शोभे तुळशी माळ ज्याचे गळा|
राजस सुकुमाराचा मज लागो लळा|

वाळवंटी जमे वैष्णवांचा मेळा|
पाहावा सुख सोहळा डोळे भरोनिया |

पंढरीत होती साऱ्या संतांचिया भेटी |
वैकुंठ अवतरे भूवरी चंद्रभागे काठी |

अवघे संत गाती ज्या पंढरीचे महती |
फिकी तिच्यापुढे इंद्राची अमरावती |

©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
माघ शुक्ल एकादशी शके १९३३
(२ फेब्रुवारी २०१२)

गुलमोहर: 

पंढरीरायाचा महीमा अन त्यांच्या नगरीची महती वर्णावी तेव्हडी कमीच . छान लिहीलेस

पण

अवघे संत गाती ज्या पंढरीचे महती |
फिकी तिच्यापुढे इंद्राची अमरावती |

आमच्या अमरावतीला फिकी म्हणणे पटले नाय बुवा . Happy

अमरवती हे इन्द्राच्या राजधानीचे नाव होते ..........त्यवरूनच अमरावती असे नाव आजच्या अमरवतीला मिळाले असेल ((cpoy -pest पद्धतीने. )

परिमलः खूप सुन्दर रचना . अभिनन्दन!!