Submitted by यःकश्चित on 5 February, 2012 - 01:47
व्यथित
========================================
आडवळणाने सदोदित मी शोधीत काही
का बरे सुख माझ्या नशिबात नाही
दुःखानेही सोडून साऱ्या मलाच हेरावे
दुःखसागरात नाव माझी खाई हेलकावे
भेटेल का सागरात मला सुखाचा किनारा
प्राणपणाने मारीन वल्हे साथ देईल का वारा
का रे देवा तुलासुद्धा नाही येत माझी दया
हरेक बापाची असे त्याच्या लेकरावर माया
नव्हते सुख नशिबी माझ्या का दिली ही काया
जशा बिनपंखी पाखराला सांगशी उडाया
बालपण तरुणपण म्हातारपण मी बघतो आहे
पक्त दुःख आणि वनवास भोगतो आहे
थोड्याश्या सुखाची मी करतो अपेक्षा
नाही मला सुखामध्ये लोळण्याची आशा
उरल्या आहेत आता फक्त आशा आणि अपेक्षा
उरला नाही उपाय पाहण्या सुखाची प्रतिक्षा
शोधण्याचा सुख मला विकार जडला
जगताना जगण्याचा विसर पडला.....!
-यःकश्चित
गुलमोहर:
शेअर करा
आडवळणाने सदोदित मी शोधीत
आडवळणाने सदोदित मी शोधीत काही
का बरे सुख माझ्या नशिबात नाही>>>>आडवळणाने शोधल्यामुळे सुख मिळत नसेल सरळमार्गाने शोधा सुख नक्कीच मिळेल.
सरळमार्गाने मिळाले नाही
सरळमार्गाने मिळाले नाही म्हणून तर आडवळणाने शोधत आहे...
हम्म्म कुछ बाते उसपें छोडनी
हम्म्म कुछ बाते उसपें छोडनी पडती है दोस्त
होय विशालदा, अगदी बरोबर...
होय विशालदा, अगदी बरोबर...