बाबा रागावले, मीही मग चिडलो
त्यानी थप्पड मारली
मी त्यांची नव्या कवितांची पानं फाडली
त्या पानांच्या होड्या बनवल्या
आणि एका ओहळात नेउन सोडल्या
दु:खांच्या होड्या सोडत मी मोठा झालो
पुढेपुढे तो ओहळ बनला पुरता दु:खाचा्च
प्रेमभंग, प्राध्यापकानी केला अपमान वर्गात, ट्राफ़िक हवालदारानं रस्त्यात
पहिली बाटली रिचवली तेव्हा बाबानी दिलेला लुक
पर्रिक्षेत फेल झालो तेव्हा आईनं मारलेली चपराक
चढत्या भाजणीची दु:खंच दु:खं
होड्याच होड्या,विविधरंगी लाल, पिवळ्या, काळ्या
विविधाकार,लहानमोठ्या
एक तर बनवलेली भली दांडगी अख्ख्या महाराष्ट्र टाइम्सची-आत्महत्येची
एकदा ठरवलं बघुया तरी ह्या होड्या कुठं जातात
माझ्या दु:खाचे ओहळ कुठवर वाहतात
सरळ कडेकडेनं चालत गेलो
ओहळ, मोठा ओहळ, ते तलाव, ते थेट नदी
दु:खाची नदी पाहून चकरावलो
सारी माझी दु:खं तरंगत होती तिथं
लहान,मोठी, लाल, पिवळी, काळी
पण अखेर माझ्याच दु:खांची होती ती नदी
वाटलं ती आत्महत्येची होडी सोडावी का या नदीत
पण नकोच, आपण जावे महानगरात, सोडुया तिला सागरात
प्रवास केला सागरापर्यंत
पाहतो तो काय
माझ्या दु:खाच्या नदीसारख्या असंख्य नद्या होत्या तेथे प्रवेशासाठी खोळंबून
माझी दु:खं दिसत होती दूरवर, अगदीच सटरफटर, रंगही येत नव्हता समजून
आणि इतर नद्या? महाभयंकर
हबकलो.
इतरांच्या दु:खांचे रंग बघुनच हादरलो
ते नुसते लाल, पिवळे नव्हते
त्यांत होत्या सरमिसळीच्या अनेक छटा
नावंही नव्हती ठाउक मला त्या छटांची
वेड्यासारखा हसलो, घरी परतलो
बंद केलं होड्या करणं
सुरू केलं इमले बांधणं
सांगू काय देतात हे इमले?
सुखाचं गाणं गुणगुणणं
आणि
दु:ख विसरुन जाणं
तात्पर्य,आपल्यापेक्षा जास्त
तात्पर्य,आपल्यापेक्षा जास्त दु:खित माणसांकडे पाहिल्यास आपली दु:खे आपल्याला सामान्य वाटतात.
सत्य आहे विभाग्रजजी
सत्य आहे विभाग्रजजी
छान कविता.आशय जुनाच पण तुम्ही
छान कविता.आशय जुनाच पण तुम्ही होड्यांच्या रुपकातुन छान मांडलीत.
फालकोरजी आभार
फालकोरजी आभार
दु:खांच्या होड्या सोडत मी
दु:खांच्या होड्या सोडत मी मोठा झालो.......
चढत्या भाजणीची दु:खंच दु:खं
होड्याच होड्या,विविधरंगी लाल, पिवळ्या, काळ्या.......
माझ्या दु:खाच्या नदीसारख्या असंख्य नद्या होत्या तेथे प्रवेशासाठी खोळंबून
माझी दु:खं दिसत होती दूरवर, अगदीच सटरफटर, रंगही येत नव्हता समजून.........
सुखाचं गाणं गुणगुणणं आणि दु:ख विसरुन जाणं...........
सुंदर कल्पनाविलास. छान कविता.
छान कविता....
छान कविता....
छान. होड्या तरंगणार्या पण न
छान. होड्या तरंगणार्या पण न बूडणार्या.
"दुसर्याच्या दु:खाचा समुद्र
"दुसर्याच्या दु:खाचा समुद्र बघितला म्हणजे आपल्या दु:खाची नदी खूप लहान वाटते" ह्या माझ्या लहानपणापासूनच्या आवडत्या वाक्यावर कुणाला तरी काव्य सुचेल असे कधी वाटले नव्हते. मला स्वतःला कधी सुचले नव्हते. (तेथे पाहिजे जातीचे) खूप छान कविता. ह्या वाक्याचा मला आयुष्यात खूप फायदा झाला. कारण मला दुसर्याचं दु:खं बघायची सवय लागली आणि कायम दुसर्याची दु:खं मोठी वाटली आणि माझी मोठी दु:खंही छोटी वाटली.. त्यामुळे अशा छोट्या दु:खाकडे दुर्लक्ष करायचं आणि जीवनातला आनंद घ्यायचा अशी सवय लागली.
खूप छान कविता.
>>>>>>>>>>दु:खांच्या होड्या
>>>>>>>>>>दु:खांच्या होड्या सोडत मी मोठा झालो.......
छान कविता.
वा..!! खुप सुंदर जमलीये
वा..!! खुप सुंदर जमलीये कविता... !!
खरच द्रुष्टीकोन विशाल झाला की
खरच द्रुष्टीकोन विशाल झाला की आपली दु:ख लहान वाटतात,
दुनिया में कितना गम हैं मेरा
दुनिया में कितना गम हैं
मेरा गम कितना कम हैं
दुनिया का गम देखा तो,
मै अपना गम भुल गया