Submitted by deepak_pawar on 2 February, 2012 - 08:52
आले भरुनी आभाळ, आला आला पावसाळा
आज दाटुनिया येइ मनी दु:खाचा उमाळा.
मेघ दाटले दाटले, जग अंधारले सारे
आज जुन्या आठवांचे मनी वाहती का वारे?
लागे मातीस तहान, फुटे नभास पाझर
तसा दु:खासही माझ्या मिळे अश्रुंचा आधार.
जाता पडुनी पाऊस, सुटे मातीला सुवास
राहतात आठवणी तशा भारुनी मनास.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
जाता पडुनी पाऊस, सुटे मातीला
जाता पडुनी पाऊस, सुटे मातीला सुवास
राहतात आठवणी तशा भारुनी मनास
दिपक फारच सुंदर
छान वाटली
छान वाटली
pradyumna जी, विभाग्रज जी
pradyumna जी, विभाग्रज जी धन्यवाद.....