व्यग्र चित्तवृत्ती अन प्रश्न खूप अंतरी
घेउन मी फिरणारा बागेतील अधिकारी
फिरताना दिसली ती नाजुक अन सावरी
खूपशा फुलांमधली, हसरी आणि बावरी
घट्ट मिटून घेतली जिने हरेक पाकळी
स्वच्छ शुभ्र-पांढरी ती, होती नाजुक कळी
*
काही सांगू पाहणार्या मंद झुळकी वाहल्या
उभा जिथे मी राहिलो कळी समोर साथीला
दृष्य स्वप्नवत सारे खूप रसिक फिरणारे
सर्व फिरत जोडीने, सोबत मुली-मुले
फुलण्याची वाट बघत राहिलेली एकुली
स्वच्छ शुभ्र पांढरी ती, होती नाजुक कळी
*
भराभर निशा चढली मध्यरात्र जाहली
रात्रीच्या प्रीतीने कळी निस्तब्ध थांबली
मनोवृत्ती माझीही अधिक गडद होताना
भिती भविष्याची त्यात मनी दाटली
निसर्गास राहवेना, नाजुक फुंकर आली
फुलू लागली मग ती शुभ्र पांढरी कळी
*
सर्व पाकळ्या आल्या उमलुन समरसून
केशर-छडी आतुनी उभारली थरथरून
इवलेशे पराग-कण छोटेपण विसरले
गंध जगी उधळला मुक्तहस्त भरभरून
मना वाटले की मज काही शिकवून गेली
फुलू पाहणारी ती शुभ्र पांढरी कळी
*
केशर छडी सांगते की ताठ उभा तू रहा
पाकळीचा आधार जरी गेला तरी पहा
देवाने दिधले मज परागकण पेलण्या
अल्पशक्ती करते मी यत्न हे पुन्हापुन्हा
खूष ठेवतो आम्ही फुलाची झळझळी
हसली हे ऐकुनिया फुलणारी ती कळी
*
पाकळीने खुलताना दिधले मज शहाणपण
ठेवू नको लपवुनी दु:ख तुझे जगापासुन
स्फूर्तीदायी बनले मज छोटेसे केशर-कण
पुष्परंगगंधाचे जगामधी करिती प्रसरण
बागेतुन पावले मी घरी वळविली
दु:ख वर्णुन माझे, सुंदर कविता रचली
*
वळुन पाहता मागे दु:ख भासले सुंदर
मनी झाकतो तो बनलेले एक मंदिर
ह्र्दयातून पाकळी पाकळी उमललेली
एक लाजरी कळी इतके शिकवून गेली
शुभ्र पांढरी कळी
Submitted by pradyumnasantu on 28 January, 2012 - 13:37
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
प्रद्युम्न, केशर छडीचे रूपक
प्रद्युम्न, केशर छडीचे रूपक नीट आकलन झाले नाही.
कदाचित लांबी जास्त झाली त्यात हरवलो असावा. छोटी करता आली तर पहावे. आणि रचनेला जरा पॉलिशचीही आवश्यकता वाटते.
मनात चिंता, दुख, अस्थिरतेची
मनात चिंता, दुख, अस्थिरतेची वेदना घेउन नायक, जेथे काम करतो त्या बागेत गेलेला आहे. आपल्या समस्यांचे निराकरण व्हावे असा काही त्याचा उद्देश नाही. उमलत्या कळीला पाहताना त्याला काही शिकण्यासारखे वाटते. आपल्या मनानेच तो त्यातून काही अर्थ काढू पहातो. साहजिकच तो अर्थ फार सुस्पष्ट असणार नाही. केशर-छडी मुळात नाजुकच असते. ती कुठलाही भार सहन करू शकणार नाही तरीही पराग्-कणांचा भार ती मिटलेल्या पा़कळ्यांचा आधार निघून गेला तरीही सहन करत असते. (मिटलेल्या पाकळ्या ही केशर, केशर्-छडीसाठी एक संरक्षक आधार-भिंतच असते.) पराग्-कण तर आकाराने नगण्य अस्तित्वाचे, तेही फुलपांखरांच्या साथीने फुलाच्या रंग्-रुपाचा प्रसार सर्वत्र करतात. कळी सदैव कळी रहात नाही. उमलणारी कळी उमलून आपले अंतरंग जगापुढे उघडे करते.
नायकाचे अन्तर्मुख मन हा आविष्कार डोळसपणे स्वीकारते. उमलण्याच्या प्रत्येक क्रियेत पॉझिटिव्ह अर्थ शोधून, आपल्या वेदनांमध्ये जगाला सहभागी करून घेतल्याने दु:ख कमी होउ शकेल हे समजून नायक घरी जातो. घरी तो एकटाच आहे म्हणून तो कविता रचून जगाला आपल्या वेदनेत सहभागी करून घेतो.
अभिव्यक्तीत मी कमी पडलो आहे यात शंका नाही. कविता तशी निष्कारण गडबडीत केली. आपण सुधारणा केल्यास अगत्यपूर्वक स्वागत.
होय, कविता थोडी लांबली आहे खरी. पण मी रसिकांना आश्वासन देतो की पहिल्या भागानंतरच ती आपल्याला टाटा करेल, दुसरा,तिसरा, अगर चौथा भाग प्रस्तुत होणार नाही.
अप्रतिम कविता
अप्रतिम कविता
आवडली,टाटा वगैरे करायच्या
आवडली,टाटा वगैरे करायच्या भानगडित पडू नका.
तुम्ही लिहित जा,चांगलं वाईट आम्हाला(वाचकाना) ठरऊ द्या.
प्रद्युम्न, खूप छान प्रकारे
प्रद्युम्न,
खूप छान प्रकारे सारांश (याला मायबोलीवर 'रसग्रहण' असे म्हटले जाते असे दिसते) लिहिला आहे तुम्ही. त्यामुळे कविता समजायला मदत झाली आणि ती आवडलीही. तरीसुद्धा लांबी आणि झळाळी देण्याची आवश्यकता यावर युअर्स ट्रूली चे मत कायम आहे. राग नसावा. तुमच्या परवानगीने थोडे "कचकड्याचे शल्यकर्म" करीन म्हणतो सवडीने. अशा परवानगीबद्दल आभार.
प्रद्युम्न तुम्ही केलेलं
प्रद्युम्न तुम्ही केलेलं कवितेचं रसग्रहण खूप छान आहे. पण कविला कवितेतून काय सांगायच आहे हे, त्याला काय अभिप्रेत आहे हे वाचकाला समजायला पाहिजे. कवीने त्याचं सपष्टीकरण देऊ नये. विभाग्रजनी म्हट्ल्याप्रमाणे वाचकाला चांगलं वाईट ठरवू द्या.( हे माझं वैयक्तिक मत. क्षमस्व.) कविता लांबली आहे पण छान आहे.
कवितेत गहन अर्थ सामावलेला
कवितेत गहन अर्थ सामावलेला आहे. एकप्रकारचे आशादायक वक्तव्य त्यात आलेले आहे.
किरण, विभाग्रज, सुरेखाजी,
किरण, विभाग्रज, सुरेखाजी, पाषाणभेद, एम. कर्णिकः जानदार प्रतिसादांबद्दल हार्दिक आभार.
सुरेखा यांच्याशी
सुरेखा यांच्याशी सहमत...पु.ले.शु!!
कविता थोडी लांबली,पण छान आहे
कविता थोडी लांबली,पण छान आहे तुमच्या कविताना रसग्रहणाची गरज कधिच नव्हती.जे असतं ते सहज सोपं,छान.
शामजी, फालकोरजी: मनःपूर्वक
शामजी, फालकोरजी: मनःपूर्वक आभारी आहे.
आवडली. रूपक आणि यमक मुख्यतः.
आवडली. रूपक आणि यमक मुख्यतः. कडव्यातील यमकामधील तिसरी ओळ भिन्न असणेही आवडले.
छान आहे कविता. आवडली.
छान आहे कविता. आवडली.
आवडली...........
आवडली...........
चांगली आहे !
चांगली आहे !
सुन्दर कविता!!!!!! नेहमी
सुन्दर कविता!!!!!!
नेहमी प्रमाणे आवडली.
छान आहे पण तुम्ही अजून छान
छान आहे पण तुम्ही अजून छान लिहू शकला असता. अशी खात्री. कवितेचा विषय सुंदर. आशय सुंदर. पण मांडणीत थोडी कमी पडलेय.