Submitted by deepak_pawar on 16 January, 2012 - 09:00
कुणी कुणी येत होतं मतं मागत होतं
हे देऊ ते देऊ, काहीबाही सांगत होतं.
डांबरी रस्ते..घरात पाणी..वीज देऊ
जगासंगे आपणसुध्दा पुढे पुढे जाऊ.
एवढा मोठा माणूस, खोटं कसं बोलेल,
वाटलं होतं गावासाठी काहीतरी करेल.
दिली होती मतं ,आला होता निवडून,
गावामध्ये विजयाचा गुलाल गेला उधळून.
एक वर्षी पाऊस आला सारं काही धुऊन नेलं
दुसर्या वर्षी सुका दुष्काळ कुणी नाही बघून गेलं.
अजून गावात वीज नाही रस्त्यात उडतेय धुळ
कधी तरी पेटत असते आता इथली चूल.
पाच वर्षे झाली आता पुन्हा येऊ लागलेत
काहीबाही सांगून पुन्हा मतं मागू लागलेत.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
आता येऊ घातलेल्या
आता येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छान कविता........
दीपकः Excellent !!
दीपकः Excellent !! परिस्थितीवर विचारगर्भ भाष्य करणारी व चटका देणारी कविता.
लाखो शेतकर्यानी आत्महत्त्या
लाखो शेतकर्यानी आत्महत्त्या केल्या,पण त्यांच्या नातेवाईकानी निवडुन कुणाला दिल्?
शेतकरी मोर्च्यांवर गोळीबार झाले,त्यात काही गोळी लागून मेले,निवडुन कोण आले?
आपण जर परत परत त्यानाच निवडुन देत रहानार असू तर ते परत परत येनारच,मत मागायला.
प्रदीपजी, pradyumna
प्रदीपजी, pradyumna जी,विभाग्रजजी धन्यवाद
मतदाराला जागृत करायचा चांगला
मतदाराला जागृत करायचा चांगला प्रयत्न.
पण, कवितेत अधिक आशयघनतेची अपेक्षा.
धन्यवाद भिडे साहेब
धन्यवाद भिडे साहेब .......
आपल्या सुचनेचा नक्कीच विचार करेन........
आजवर कितीतरी निवडणुका झाल्या.
आजवर कितीतरी निवडणुका झाल्या. पण हे वास्तव काही बदललं नाही. बदलणारही नाही कारण ते आपणच निर्माण करत असतो - अपात्र उमेदवाराना निवडुन देवून प्रत्यक्षपणे किंवा मतदानाला न जाऊन अप्रत्यक्षपणे.
कविता चांगली जमली आहे.