युवा महोत्सव
यंदाचा १७वा राष्ट्रीय युवा महोत्सव यंदा मंगलोरमधे १२ ते १६ जानेवारी साजरा करण्यात आला. भारतातील सर्व राज्याचे तसेच केंद्रशासित प्रदेशामधील विविध शालेय तसेच कॉलेजवयीन मुले या महोत्सवामधे सामील झालेली होती. लोक नृत्ये, लोकसंगीत तसेच शास्त्रीय नृत्य, गायन-वादन, एकांकिका स्पर्धा अशी विविध कार्यक्रमाची लयलूट होती. त्याशिवाय साहसी खेळ व प्रात्यक्षिके देखील होती. मात्र एकाच वेळी अनेक ठिकणी कार्यक्रम असल्याने सर्वत्र जाता आले नाही.. तरीपण मंगला स्टेडियम घरापासून अगदी जवळ असल्याने (म्हणजे बघा, भाषणे संपली, आता कार्यक्रम चालू होतोय, हे घरात ऐकू येतं इतक्या जवळ) तिथले सर्व कार्यक्रम बघता आले.
महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे फूड फेस्टिवल. इथे सर्व राज्यानी स्वतःच्या खाद्यसंस्कृतीचे स्टॉल लावलेले होते. अक्षरश: पोटभर खादंती.
या महोत्सवाची सुरूवात विविध मान्यवराच्या उपस्थितीत झाली. पूर्ण कार्यक्रम जरी बघितला तरी तेव्हाची भाषणे वगैरेचा वृत्तांत द्यायची इच्छा नाही. पण यावेळेला सामिल झालेल्या सर्वच टीमनी मार्चपास केला. स्वतःच्या राज्याची सांस्कृतिक वारसा मोठ्या मानाने मिरवत ही तरूण मुलेमुली जल्लोषामधे फिरत होती. या वेळची ही काही क्षणचित्रे.
==============================================
कर्नाटकातील लोककलाकारानी शंख, तुतारी, झांज व ढोल अशा पारंपारिक वाद्यगजरात मोर्चाची... परेडची सुरूवात केली.
=============================================
या मंगलोरच्या शाळेतील मुली. मस्त ड्रेस घालत या मुली सारे जहासे अच्छा वाजवत गेल्या, तेव्हा पूर्ण स्टेडियम त्यांच्या धुनमधे हे गाणं म्हणत होतं.
===============================================
ही अंदमान निकोबारची लहानशी टीम. का कुणास ठाऊक? ही मुलं थोडी बुजल्यासारखी वाटत होती. कदाचित त्यांचाच पहिला नंबर असल्यानेदेखील असेल..
================================================
नंतर आलेल्या आंध्र प्रदेशची टीमने पांढरेशुभ्र ड्रेस घातले होते. असेच दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यानी स्पोर्ट्सवेअरमधे परेडमधे भाग घेतला. त्यामुळे त्यांचा फोटो देत नाहीये.
================================================
उगवत्या सूर्याचा प्रदेश-अरूणाचल प्रदेश. या टीमने खरी धमाल फूड फेस्टिवलमधे उडवली होती. त्याबद्दल नंतर सांगेन.
==============================================
आसामच्या नृत्यांगना पारंपारिक नृत्य बिहू सादर करताना. यांच्या लोकनृत्याच्या टीमला नंतर बक्षीसदेखील मिळाले.
===============================================
ओ जरा तनिक हम बिहारियो का डान्स तो देखो.
गुलाल उधळत आणि नाचत गात ही टीम खर्या अर्थाने धम्माल करत निघाली होती.
==============================================
चंदीगढकी मस्त कुडिया..
===============================================
आणि हा गुजरातचा गरबा.
================================================
पहाडी लोकगीते खड्या आवाजात म्हणत जाणारी ही हिमाचलची टीम. कुडकुडत्या थंडीतून मंगलोरच्या दमट वातावरणात आल्यावर याना मज्जा वाटली की सजा असं मला विचारायचं होतं. पण चान्स मिळालाच नाही.
================================================
भारताच्या नंदनवनातील पर्या रंगीबेरंगी ड्रेस घालून "बूमरो" म्हणत निघाल्या होत्या. त्यातली ही एक...
काश्मिर की कली.
================================================
केरळ म्हणजे निवांत बॅकवॉटर्स आणि तोंपासू सीफूड. मात्र इथे त्यानी त्यांची सांस्कृतिक वारसा फारच छान दाखवला होता. मोहिनीअट्टमच्या पारंपारिक मधली नृत्यांगनाआणि मागे कथकलीचा परफॉर्मर.
या केरळच्या आदिवासी तरूणी
आणि हे केरळचे मार्शल आर्टचे कलरीपायट्टूचे प्रात्यक्षिक दाखवणारा हा ग्रूप. अगदी थरारक आणि अत्यंत चपळतेने यानी विविध प्रात्यक्षिके दाखवली. ही युद्धकला हजार वर्षापेक्षा जास्त जुनी आहे.
=============================================
जय भवानी जय शिवाजी
जय महाराष्ट्र!!!!!!
कीर्तनाचे रंगी रंगला श्रीरंग.
===============================================
ही मणिपुरी युवती. यांची साडी नेसायची पद्धत आपल्यापेक्षा थोडी वेगळी आहे, मात्र ही पद्धत जास्त सुटसुटीत आणि कंफर्टेबल वाटते. फॅशनवाले लोक ही पद्धत फॅशनमधे यावी म्हणून का प्रयत्न करत नाहीत?
================================================
या मेघालयामधील युवती. अत्यंत शांत आणि शिस्तबद्धरीत्या हे सर्वाना अभिवादन करत गेले.
================================================
ओडिशा लोकनृत्यकलाकार.
=================================================
बल्ले बल्ले पंजाबीयोंदा रंग देख लो
बोले जो निहाल
सत श्री अकाल
तलवारी, दांडपट्टा यांचे प्रात्यक्षिक करणार्या मुली.
================================================
केसरिया बालमा.. पधारो म्हारे देस रे
राजस्थानची रंगीबेरंगी टीम
=============================================
सिक्किमवरून आलेल्या या छोट्याशा मुलाने केलेली मार्शल आर्टची प्रात्यक्षिके थरारक होती.
===============================================
तमिळनाडूमधील लोककलाकार. या नृत्याला काराकम्म म्हणतात. नंतर या नृत्याबद्दल सविस्तर लिहिणार आहे.
================================================
की होलो?
पश्चिम बंगालमधली दुर्गापूजेचे नृत्य.
================================================
सर्वात शेवटी आला यजमान कर्नाटक संघ. आणि यांची भलीमोठ्ठी टीम होती...
यक्षगानामधील हा एक यक्ष.
आणि हा महिषासुर. उंचच्या उंच आणि आडदांड (वरचा मुखवटा डोक्यावर घातलेला आहे. आतील कलाकारचे डोके छातीच्या पदकाच्या तिथे आहे) हा महिषासुर अचानक अंगात आल्यासारखा हा प्रेक्षकामधे धावत सुटला. त्यामुळे सुनिधीने घाबरून रडायलाच सुरूवात केली. म्हणून या नंतरचे फोटोच काढले नाहीत. पण यामधे जास्तकरून मंगलोरमधील शाळा-कॉलेजची पथके सामील झालेली होती.
हे बँडवाले मधेच कशाला आले होते कुणास ठाऊक? पण कोलावेरी डी वाजवत निघाले होते.
================================================
सर्वात शेवटी प्रत्येक राज्याची एन एस एसची टीम अभिवदन करत गेली. त्यातल्या एका पंजाबच्या मुलीला सुनिधीशी खेळावेसे वाटले. सुनिधीने तिची टोपी काढून घेतली आणि ती आपल्या डोक्यावर घालून घेत मस्ती केलीच. नाही तरी दोन तीन तास माझ्याच हातामधे राहून राहून वैतागली होती. तेवढंच जरा तिला बरं वाटलं असावं. मग त्या मुलीने तिच्या कॅमेरामधून सुनिधीचे फोटो काढले, मग तिच्या मैत्रीणीनी या दोघीचे फोटो काढले. एवढे फोटोसेशन होइस्तोवर बहुतेक टीम निघून गेल्या होत्या. मग या धावत पळत स्वत:ची टीम शोधत गेल्या.
==============================================
पुढच्या भागात फूड फेस्टिवल आणि काही लोकनृत्याबद्दल लिहेन.
(No subject)
मस्त रंगबेरंगी धमाल....
मस्त रंगबेरंगी धमाल....
नंदू.. पुढचा भाग लवकर टाकणे...
हिम्स. आज किंवा उद्या नक्की.
हिम्स. आज किंवा उद्या नक्की.
मस्त फोटो. मणिपुरी साडी
मस्त फोटो.
मणिपुरी साडी नेसायला सोपी, वावरायला प्रचंड कॉन्शस करणारी.
पुढचं लिही.
मस्तच पुढचा भाग लवकर टाक.
मस्तच पुढचा भाग लवकर टाक.
नी, नेसायला सोपी असते का? मला
नी, नेसायला सोपी असते का? मला ते कॉकटेल साड्या असतात ना त्याला हा प्रकार एकदम सूट वाटतो. थोडेसे बदल करून अजून सुटसुटीत करता येइल का?
तशी सोपी आहे. कॉकटेल डिनरसाठी
तशी सोपी आहे. कॉकटेल डिनरसाठी व्हेरिएशन पण करता येईल पण ते टॉवेल गुंडाळल्यासारखे जास्त आणि साडीसारखे कमी दिसेल.
अप्रतिम.
अप्रतिम.
मस्त नंदिनी. येवू देत पुढचे
मस्त नंदिनी. येवू देत पुढचे भाग
छान
छान