निवृत्तीनंतर..
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
33
आता दिवसाचे चोवीस तास
फक्त माझे...माझेच आहेत
त्यात तुझेही चोवीस तास
जमा झाले आहेत!
दिवसाचे अठ्ठेचाळिस तास
संपता संपत नाहीत;
मुलांच्या रिकाम्या खोलीतून डोकावताना
किती पटकन संपले आयुष्य कळत नाही.
चमचाभर उपमा खायला
पुर्वी फुरसत नसायची
तुझ्यासाठी आणलेल्या वेणीतली
फुले कोमेजून जायची
रात्री झोपताना भविष्यातील
स्वप्नांची फुले तू माळायची
मुलांची गोड पापे घेऊन
कुशीत माझ्या विसावायची
आता...
करकरीत सकाळी
करकरीत तिन्हीसांजेला
तू मला विचारतेस,
"एक कप चहा, बशीभर उपमा करु?"
निवांत दुपारी म्हणतेस,
"चल जुने छायाचित्र संग्रह बघू"
रात्री झोपताना गुडग्याचे दुखणे विसरून हट्ट करतेस
"आता वेळ आहेच तर आपण सर्वांना भेटून येऊ!"
खरयं ग!
आता दिवसाचे चोवीस तास
तू माझी.. फक्त माझीच आहे!
मी तुला मी अन् मला तू
शेवटपर्यंत उरणार आहेस!
- बी
विषय:
प्रकार:
शेअर करा
(No subject)
अतिशय अतिशय सुंदर! खालील ओळी
अतिशय अतिशय सुंदर!
खालील ओळी तर अधिक आवडल्या.
=========================
त्यात तुझेही चोवीस तास
जमा झाले आहेत!
मुलांच्या रिकाम्या खोलीतून डोकावताना
किती पटकन संपले आयुष्य कळत नाही.
चमचाभर उपमा खायला
पुर्वी फुरसत नसायची
आता...
करकरीत सकाळी
करकरीत तिन्हीसांजेला
तू मला विचारतेस,
"एक कप चहा, बशीभर उपमा करु?"
=============================
व्वा वा!
खुप छान.
खुप छान.
स्पीचलेस...
स्पीचलेस... अॅक्चुअली...!
ओळी अतिशय भावनिक करून गेल्या, त्यामुळे नो मोअर कॉमेंट्स...
बी, मला पण खूप आवडली कविता.
बी, मला पण खूप आवडली कविता.
बी,खूप गोड आहे कविता..
बी,खूप गोड आहे कविता.. आवडली..
भरून आलं वाचताना
भरून आलं वाचताना
छान! आवडली.
छान! आवडली.
मस्त जमली आहे बी!
मस्त जमली आहे बी!
आवडली
आवडली
मनाला भिडली
मनाला भिडली
अगदि वास्तववादी कविता आहे.
अगदि वास्तववादी कविता आहे.
छान आहे.
छान आहे.
खुपच सुंदर आहे कविता.. खुप
खुपच सुंदर आहे कविता..
खुप भावली..
बी , मस्त
बी , मस्त
मस्त
मस्त
मस्तय
मस्तय
आवडली.
आवडली.
ही हिंदीत ज्याला "आपबीती"
ही हिंदीत ज्याला "आपबीती" म्हणतात ती आहे-माझ्या बाबतीत
पण लाईफ गोज ऑन
अति सुंदर
फार छान!
फार छान!
मित्रांनो, तुम्हा सर्वांचे
मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आभार.
निखळ सुंदर!!! अ प्र ति म!
निखळ सुंदर!!! अ प्र ति म! अगदी डोळ्यापुढे उभं राहिलं निवृत्तीनंतरचं आयुष्य!
मस्त बी. एकदम आवडली कविता.
मस्त बी. एकदम आवडली कविता.
फारच सुंदर.. सहज पोहोचते आहे,
फारच सुंदर..
सहज पोहोचते आहे, अभिनंदन बी!
थेट पोहोचणारी..... आवडली
थेट पोहोचणारी..... आवडली
मस्त..
मस्त..:)
छान !!!!!!!! आवडली
छान !!!!!!!! आवडली
छान आहे!
छान आहे!
सुन्दर कविता !!
सुन्दर कविता !!
सुरेख आहे कविता.
सुरेख आहे कविता.
Pages