दिनेशदा - निसर्ग गटग - २२ जानेवारी - महाराष्ट्र निसर्ग उद्यान, माहिम.

Submitted by साधना on 11 January, 2012 - 02:58
ठिकाण/पत्ता: 
माहिमचे महाराष्ट्र निसर्ग उद्यान

आपल्या सगळ्यांचे आवडते व्यक्तीमत्व श्री. दिनेशदा यांचे मुंबईत आगमन झाले आहे.

या भेटीदरम्यान मायबोलीकरांना आणि विशेषतः निसर्गाच्या पारावर गप्पा ठोकणा-यांना भेटायला ते उत्सुक आहेत. (जिस्प्याच्या प्रदर्शनात काही मायबोलीकरांना त्यांनी आधीच दर्शनाचा लाभ दिलाय ते वेगळे Happy )

कोणाच्या घरी भेटण्यापेक्षा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी भेटणे सगळ्यांना सोईचे पडेल असा विचार करुन यावेळी माहिमचे "महाराष्ट्र निसर्ग उद्यान" हे ठिकाण निवडले आहे.

तारिख : २२ जानेवारी २०१२
वेळ : सकाळी ९ ला गेटभेट.

ज्या कोणाला भेटायचे आहे त्यांनी हात वर करावेत. अजुन काही चांगले स्थळ सुचत असले तर तेही सुचवावे. उत्सवमुर्तींना संध्याकाळी लवकर घरी परतायचेय हे लक्षात ठेऊन स्थळ सुचवा. (ते कुर्ल्याला राहतात आणि रात्री उशीराचे परतीचे विमान आहे.)

निसर्ग उद्यानाबद्दल अजुन माहिती - http://www.mumbai77.com/city/1018/gardens-parks/maharashtra-nature-park/

उद्यान रविवारीही सकाळी ८.३० पासुन सं. ४ पर्यंत सामान्य जनतेकरता उघडे असते. ३० पेक्षा अधिक लोकांचा ग्रुप असेल तर गाईडचीही व्यवस्था उद्यान व्यवस्थापक करतात.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 22:30 to रविवार, January 22, 2012 - 02:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि आता खूप उशीर झालाय प्रत्येकाने आणण्याचं ठरवायला.
मला आज संध्याकाळी विकतची खादाडी आणायला पण वेळ नाहीये. Happy

ह्म्म गर्दीच्या ठिकाणी मला येता येणे मुश्कील आहे. पार्कींग शोधत फिरणे, आड्वे तिडवे विचित्र पार्कींग या भानगडीत मी पडणार नाही. मी कल्टी मारेन त्यापेक्षा. Happy

अगं जेवायला कल्टी मार, गटग्ला यायला नको <<
जेवायचंच म्हणत होते मी. Happy

रविवारी दुपारी तिथे काही <<
मामीसा तिथे म्हणजे कुठे? Wink

बादवे, रविवार असल्याने मला वाटतं सरसला सगळं काही चालू असेल. तिकडे जेवायचे स्टॉल्स पण सॉलिड असतील. आणि जो जे वांछिल तो ते लाहो होईल Happy

<< मला जाणून घे, मला जाणून घे, म्हणणार्‍या चराचराला जाणून घेण्यात मलाही रुची आहे! >>

मला खाउन घे, मला खाउन घे, म्हणणार्‍या चरण्याचरण्याला खाउन घेण्यातच मला 'रुची' आह'. Wink

अत्यंत खेळीमेळीत, गप्पाटप्पा करत, निसर्गाच्या सान्निध्यात हा गटग संपन्न झाला. सविस्तर वृतांत येईलच (कोण लिहतंय ते माहित नाही :फिदी:) तो पर्यंत हि एक फोटो झलक. Happy

(वरच्या फोटोत कोण काय शोधतंय ते विचारू नका Proud वृतांतात सगळं येईलच.)

विसु: "खादाडी"चे फोटोही असणार"च". Happy

जिप्सी, सुरवात तर मस्त करुन दिलीस रे...

(निसर्गउद्यानात माबोकर सोडुन इतर क्राऊडमध्ये कावळ्यांचा भरणा जास्त असल्याने वरच्या फोटोत फक्त माबोकर दिसताहेत. हाच फोटो राणीबागेतला असता तर माना वर करुन झाडे पाहात असलेले माबोकर आणि त्यांच्या आजुबाजुला गोळा होऊन ही मंडळी वर काय शोधताहेत हे पाहात असलेले अजुन १५-२० राणीबागकर हा सिन दिसला असता. Happy )

रच्याकने, वृत्तांत लिहिण्याची जबाबदारी माबो प्रथेप्रमाणे गटग भेटीचा पहिल्यांदा आनंद घेणारे माबोकर संभाळतात. तत्सव, ही जबाबदारी उजु व रिमा या दोघींवर आहे. दोघींनीही आपापले वृतांत इथे किंवा नविन धागा उघडुन, जसे जमेल तसे लिहावेत ही विनंती. Happy इतरजण नंतर टाकतीलच त्यात आपापल्या कथा. Happy

हाच फोटो राणीबागेतला असता तर माना वर करुन झाडे पाहात असलेले माबोकर आणि त्यांच्या आजुबाजुला गोळा होऊन ही मंडळी वर काय शोधताहेत हे पाहात असलेले अजुन १५-२० राणीबागकर हा सिन दिसला असता >>> Lol

वरच्या फोटोत कोण काय शोधतंय ते विचारू नका वृतांतात सगळं येईलच.>>>> Biggrin हे निरीक्षण भारीये जिप्स्या.

हाच फोटो राणीबागेतला असता तर माना वर करुन झाडे पाहात असलेले माबोकर आणि त्यांच्या आजुबाजुला गोळा होऊन ही मंडळी वर काय शोधताहेत हे पाहात असलेले अजुन १५-२० राणीबागकर हा सिन दिसला असता >>> Biggrin

इंद्रधनुष्य, झक्कास फोटो. तुला वाघ दिसला की काय? कित्ती तु नशिबवान. श्या, आम्हाला फक्त डरकाळ्याच ऐकू येत होत्या. Wink

इन्द्रा फोटो मस्त आहेत. तो पाउडर पफ वाला छोटु कोण?
श्रीशैल का?

बहावा लिहिलेला फोटो बरोबर आहे का? ते तर झुडुप दिसतय.

वृतांत कुठेय??

जिप्स्या फोटो भारीय.

Pages