डॉन-२

Submitted by पूनम on 27 December, 2011 - 05:04

तांत्रिक सफाई, परदेशातल्या महत्त्वाच्या ठिकाणी बेतलेलं चित्रिकरण, चित्रपटाला असलेला वेग, एकानंतर एक घडणार्‍या घटना, उत्तम ३डी ईफेक्ट्स... डॉन २ सज्ज आहे हे सर्व काही घेऊन. तरीही तो काही काळानंतर असह्य होतो- आणि त्याचं कारण शाहरूख नसतं! (हे एक नवलच!) ते कारण असतं चित्रपटाला नसलेली कथा आणि चकचकाटाकडे संपूर्ण लक्ष केन्द्रित केल्यानंतर वेळ न मिळाल्यामुळे त्यावर न केलेले काम.

डॉन अंडरवर्ल्डचा बेताज बादशाह आहे. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटणे हा त्याच्या हातचा मळ, नव्हे ह्यातच त्याला 'थ्रिल' वाटतं. असा हा डॉन एक साधी ड्रग्जची कन्साईनमेन्ट, जी एका 'ब्रीफकेस'मध्ये मावते, ती घ्यायला स्वत: जाईल का? बरोबर कोणालाही न घेता? त्याला काहीही 'बॅक ऑफिस' नाही? का एन्ट्रीसाठी काहीतरी स्टंट असावा म्हणून हे तोंडीलावणे? सहाजिकच एकटा गेल्याने, त्याच्यावर हल्ला होतो आणि मग त्यातून अनेक चमत्कार करत तो सुटतो. आणि थेट इन्टरपोलच्या मुख्यालयातच येतो. स्वतःहून शरण जाण्यासाठी! त्यावेळेला मलिक रिटायरमेन्टची घोषणा करून बिल्डींगबाहेर निघतच असतो. पण नेमका डॉन शरण आल्यामुळे त्याला बिचार्‍याला तो प्लॅन पुढे ढकलावा लागतो! (अशी सोय असते का हो?)

रोमा स्वतःच्या हाताने, जातीने डॉनला तुरुंगात पोचवून येते. आता हा खतरनाक डॉन. ह्याला जगभरचे पोलिस शोधत असतात. जगभरातले गुंड ह्याच्या जीवाच्या मागे असतात. आणि ह्याला तुरुंगात एका साध्या कैद्याप्रमाणे ठेवतात? त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली असते. त्याला 'आयसोलेशन सेल' वगैरे काही नाही? शाहरूख कॅरेक्टरमध्ये असतानाही एकटा रहायला घाबरतो बहुतेक! त्याच तुरुंगात वर्धान त्याची वाट पहात असतो. आता मलिक आणि रोमा ह्याच केसवर काम करत होते की नै पूर्वी? मग त्यांना माहित असायला पाहिजे की नै की वर्धान आणि डॉन ह्यांना एकत्र ठेवण्यात धोका आहे म्हणून? जेलमधून ते पळून गेल्यानंतर रोमा विचारते- अय्या! वर्धानपण गेला डॉनबरोबर? आता काय होणार?

काय होणार? प्रियांका थेट फ्रान्समध्ये! हे बरं असतं बुवा एक चित्रपटांमध्ये! ह्यांनी ठरवलं की दुसर्‍या फ्रेमला ते त्या देशात हजर. तेही कार, सेलफोन, सुंदर कपडे, लॅपटॉप्स ह्यांसह. इथे आपल्याला एक सिमकार्ड घ्यायचं असलं तरी किमान ३ दिवस लागतात! मलिकही पाठोपाठ येतोच. (अहो, रिटायर होऊन घरी चालला होतात ना?) डॉनही पळून जातो आणि आयेशानामक सुंदरी त्याच्या स्वागताला सर्व जामानिम्यासकट हजर! कधी अरेंज करतात हे सगळं? मध्येच डॉन वाढलेले केस कुठे कापतो?

त्याच्या मग पुढची कथा घडते झुरिकमध्ये. 'युरो' जिथे छापले जातात, त्या बॅंकेतून युरोंचे साचे पळवून, नंतर खोट्या नोटा छापून खूप खूप श्रीमंत होण्याचा प्लॅन डॉन करतो. (आताची युरोची स्थिती पाहता, हा चित्रपट आणि त्याचा हेतूच फसतो आणि हास्यास्पदच वाटायला लागतं सगळं, हाही भाग आहेच. Very bad timing!) मग त्याच्या मदतीला येतो 'समीर'. हा असतो कॉम्प्युटर हॅकर. पण त्याला बहुतेक दिव्य दृष्टीही असते. कारण एकही सीन असा दाखवला नाहीये जिथे समीर काही अभ्यास करतोय, नेटवर चित्र बघतोय, लोकांशी बोलतोय वगैरे. पण बँकेच्या सॅनिटेशनच्या प्लॅनपासून युरोचे साचे जिथे आहेत त्या सेफ्टी वॉल्टपर्यंत सर्व बिल्डिंग आणि सेक्युरिटी प्लॅन्स ह्याचाकडे तयार असतात! हां. मुख्य म्हणजे पॅरिस, झुरिक, मलेशियात, बॅंगकॉक येथे लोक हिंदी बोलतात!!!

मग खुद्द चोरी. मग डॉन कसला भारी असतो हे दाखवणारे डायलॉग, मारामार्‍या. मग कोणीतरी फितूर होतो, मग डाव पलटतो वगैरे, मग परत एकदा डॉनची सरशी वगैरे सर्वकाही तेच ते. सर्वात खटकणारी गोष्ट म्हणजे इतकं सगळं करून डॉन शेवटी मुक्तच राहतो. अजून एका सिक्वलसाठीची ही महाभयंकर योजना करून ठेवलेली आहे! तेव्हा बीवेअर! Proud

दिसायला स्लीक, वेगवान. पण तरीही बंडल. ३डी ईफेक्ट मात्र चांगले आहेत. (हॅरी पॉटर पेक्षाही सरस वाटले). डॉन१ हा मूळ डॉनची शेवट वगळता असलेली कॉपी होती, म्हणून की काय, खूपच बरी होती. ह्यात ना कथा, ना कोणत्या गोष्टीचं स्पष्टीकरण. बर हे दुर्लक्ष करण्याइतपत अभिनयसामर्थ्य तरी हवं. पण शाहरूखचा अभिनय (?) तो डॉन आहे म्हणून त्याची दहशत वाटावी असा नाही. अभिनयच नाही असं म्हणूया. उलट सुरूवातीला लांब केसांमध्ये तो थोडा वेगळा दिसतो म्हणून बघवतो Proud कोणालाच काहीही छाप पाडण्याजोगं काम नाही. रोमाचं मूळ कॅरॅक्टर का आहे, कारण डॉनने तिच्या भावाला मारलेलं असतं. इथे रोमा भाऊ वगैरे विसरते आणि तिच्या मनात डॉनबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण होऊ पाहतो. हे इतकं हताश करणारं आहे! अरे, मूळ उद्देश काय, करताय काय? राहूनराहून अमिताभ आठवतोच. कशाला हवीत गॅजेट्स, की आधुनिक तंत्रज्ञान? नुसती नजर बांधून ठेवते!

तात्पर्यः नका पाहू Proud
(ह्या सिनेमानंतर शाहरूखने निवृत्ती घ्यावी. मलिकसारखी नाही, खरी!)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण शाहरूखचा अभिनय (?) तो डॉन आहे म्हणून त्याची दहशत वाटावी असा नाही. अभिनयच नाही असं म्हणूया >> इथेच या लेखाचा एकांगीपणा दिसून येतोय . चित्रपट फार खास नाही हे मान्य पण चांगल्याला चांगल म्हणायला काय हरकत आहे .
आणी अचाट म्हणाल तर आम्ही तीन लोक एका बाईला (डायरेक्ट) रक्तदान करतानाही पाहिलेत .

हम्म अजुन एक शारुखपट ! Wink
बादवे जामोप्या...
शाहरुख खान हा शिरवळकरांच्या कथेतला डॉन आहे.. प्रेव्मळ, विनोदी....>>>> मी आठवण्याचा प्रयत्न करतोय. शिरवळकरांच्या सगळ्या खलनायकांबद्दल, पण प्रेमळ विनोदी असा एकही डोळ्यासमोर येत नाहीये.
दारा बुलंदचे सगळे खलनायक, मंदार पटवर्धनचे सगळे खलनायक, अमर विश्वासचे तसेच फिरोज इराणीचे सगळे खलनायक. पण मला एकही प्रेमळ, विनोदी खलनायक आठवत नाहीये सुशिंचा ! Wink

डॉन म्म्णजे फिरोज इराणीसारखा.... डॉन हा खलनायक आहे की नायक? रुढार्थाने नायक म्हणायचा झाल्यास ओम पुरी नायक ठरेल.

पौर्निमा.....मी पर्स्नल जात नव्हतो.........मी आपण जे लिहिले आहे ते खोडुन काढतोय फक्त...कारण काही ठिकानी अतिशयोक्ती लिहिले आहे ... Happy

विजे चा लपंडाव चालु आहे...म्हणुन जास्त लिहिता आले नाही Happy

>>अभिनयच नाही असं म्हणूया >> इथेच या लेखाचा एकांगीपणा दिसून येतोय .

बरं! अभिनय केलाय पण बेक्कार, टुक्कार, फालतू, भंगार असं म्हणायचं का मग? Wink

सॉलीड चर्चा.....

येवढी चर्चा तर शाहरुख आणि फरहान अख्तर ने पण केली नसेल आपापसात.

मी डॉन-१ पाहिला न्हवता. पण डॉन२ पाहिला. माझ्या १० वर्षांच्या मुली बरोबर पाहिला. आम्ही एकदम एन्जॉय केला. डोकं बाजुला काढुन पाहिला. नो लॉजिक, ओन्ली धमाल. पॉपकोर्न खात खात केलेली मजा.
चित्रपट अतिशय वेगवान आहे. जेम्स बाँड चा ऑक्टोपसी पाहिल्या सारखे वाटते. जसा जेम्स बाँड चे चित्रपट फक्त काही लोकांन्नाच आवडतात, तसच आहे. यात गाण्या बिण्यात वेळ घालवलेला नाही. एकच असं समोर म्हंटलेलं गाणं आहे. बाकी सगळे बॅकग्राऊंड नंबर्स. तेही लक्षात रहाणारे नाहीत. दोन तासांचा नेत्र सुखद टाईमपास!!!!!!!!

>>जसा जेम्स बाँड चे चित्रपट फक्त काही लोकांन्नाच आवडतात, तसच आहे.

असहमत. अनेकांना आवडतात. हां कल्ट आहे जरूर, पण काही लोकांनाच म्हणणं थोडं धाडसाचं आहे Happy
असो. हा तो विषय नव्हे.

मी डॉन २ पाहिला नाही. फक्त ही चर्चा वाचली, सकारात्मकपेक्षाही नकारात्मक मतं अधिक दिसली, मूळात लेखाचाही सूर नकारात्मकच...न पाहण्याच्या निर्णयावर आले पण तेवढ्यावरुन... पण मग एका मैत्रिणीने पाहिला. तिला नसेलच आवडला, असं गृहित धरुन चालले होते! तिला प्रचंडच आवडला आहे.
कुठलाही चित्रपट आवडण्यात/ न आवडण्यात ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत आवडीनिवडीचा(जॉनर), हिरो हिरॉईन आवडण्या-न आवडण्याचा, चित्रपट पहायला गेलो, तेंव्हाच्या मनःस्थितीचा ई. बर्‍याच बाबींचा हात असू शकतो. त्यामुळे कोणाचे परिक्षण वाचून चित्रपट न पाहण्याचा निर्णय चुकीचाही ठरु शकतो! तेंव्हा मी पाहणार आणि ठरवणार! Happy

..असो विषाची परीक्षा घेत नाही हो आम्ही
>>
Tumhaala vish pyaaycha nasel tar tumchi marji
Pan mag vishaachi chav vaaeet mhanun badbad karu nakaa

Ekhaadaa lekhak patat naahi mhanun tyaachaa varchyaa aakasaapaayi tyacha likhaan na vaachtaa teekaa karnaaryaanchyaat ani tumchyaat kaaheehee farak naahi...
Tumhi hindi cinemaachyaa target audience madhe naahi he accept karaa ani hindi cinemaachaa anullekh karaa...

Anubhav na ghetaa positive athavaa nigative kontich teekaa karu nakaa...

कुठलाही चित्रपट आवडण्यात/ न आवडण्यात ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत आवडीनिवडीचा(जॉनर),
हिरो हिरॉईन आवडण्या-न आवडण्याचा, चित्रपट पहायला गेलो, तेंव्हाच्या मनःस्थितीचा ई. बर्याच
बाबींचा हात असू शकतो. त्यामुळे कोणाचे परिक्षण वाचून चित्रपट न पाहण्याचा निर्णय चुकीचाही ठरु शकतो! तेंव्हा मी पाहणार आणि ठरवणार!

>>
Pan he kaahi lokaannaa maanya naahee naa...
Tyaanna nustaa teekaa karnyaat aanand milto...

अँकी नं.१, तुमचे मत एकदम नं.१ आहे! अतिशय आवडले. Happy कोणीतरी आपले काही मत दिले, म्हणून आपण ते मत डोळे मिटून स्वीकारल्याने आणि ती गोष्ट न अनुभवण्याची ठरवल्याने आपण एखाद्या चांगल्या अनुभवाला मुकू शकतो. बाकी ज्याची त्याची मर्जी!

>>Tumhi hindi cinemaachyaa target audience madhe naahi he accept karaa ani hindi cinemaachaa anullekh karaa...

हे वाचून मस्त करमणूक झाली. Lol
कुणी सांगितलं हो तुम्हाला? जरा "लेखन" टॅब मधे जाऊन वाचा माझ्या. चारेक लेख हिंदी सिनेमावरच लिहीले आहेत.
पण आचरटपणा जाऊन बघा असं म्हणाल तर ते बुवा शक्य नाही. अनुल्लेख करा? तुम्ही कोण सांगणारे? आँ? टीका पण सहन होत नाही वाटते तुम्हाला?

>>Anubhav na ghetaa positive athavaa nigative kontich teekaa karu nakaa...
सिनेमा बिनडोकपणाचा कळस आहे हे इतरांच्या अनुभवाने माहित झाल्यावर पुन्हा स्वतः तोच अनुभव घेऊन बघण्याचा डबल बिनडोकपणा आम्ही तरी करत नाही.

वर "धन्यवाद पैसे वाचवल्याबद्दल" असं अनेकांनी लिहीलंय त्याबद्दल काय? या तीन शब्दात चपराक आहे चित्रपटाला.

ते अनेकजण म्हणजे संपूर्ण विश्वाचे प्रतिनिधी आहेत की काय? मला तरी डायरेक्शन छान वाटले.. षेणेमात लोकेशन छान आहेत.. आमच्या गावात थ्री डी नाही.. Sad

वर "धन्यवाद पैसे वाचवल्याबद्दल" असं अनेकांनी लिहीलंय त्याबद्दल काय? या तीन शब्दात चपराक आहे चित्रपटाला.>>> चित्रपट न पाहता (न आवडण्याची 'शक्यता' असलेल्या चित्रपटाच्या तिकिटाचे)पैसे वाचले म्हणणे म्हणजे बसमागे धावून बसच्या तिकिटाचे पैसे वाचले असं म्हणण्यासारखं आहे! Rofl

सिनेमाचं सिक्वल हे जनरेशन नेक्स्ट विचारात घेऊन बनवलाय आणि तिथेच काहीसा फसलाय. आज हॉलिवूड मधले बीग बजेट सिनेमे इथे भारतात आवर्जून प्रमोशन करायला लागलेत तेव्हा त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा डॉन २ चा प्रयत्न बर्‍यापैकी यशस्वी झालाय. DDLJ चा शाहरूस असे साहसी अभिनय करायला लागल्यावर कसं व्हायचं? त्याने बाजीगर करावा , दिवाना करावा, दिल से करावा, कुछ कुछ होता है करावा, कल हो ना हो करावा पण रा-वन , डॉन करून उगाच कोयलाच्या मुक्या अभिनयाची आठवण करून देऊ नये Wink मटणाच्या रस्याला तरी तर दिसतेय पण खाताना सगळंच अळणी याला काय अर्थ आहे राव?

समीक्षण उत्तम.

पैसे खर्च झाल्याचं दु:ख नाही पण शाहरूख सोकावतो ना ! Proud

इतरांच्या अनुभवाने माहित झाल्यावर
पुन्हा स्वतः तोच अनुभव घेऊन बघण्याचा डबल
बिनडोकपणा आम्ही तरी करत नाही.
>>
mhanje tumhaalaa swataacha mat naahi... Dusryaanchyaa ho la tumhi ho karnaar...

टीका पण सहन होत
नाही वाटते तुम्हाला? >>Anubhav na ghetaa positive athavaa nigative
kontich teekaa karu nakaa...

मित्रहो:::::

<<<<<बेफिकीर | 28 December, 2011 - 15:47 नवीन
सिनेमाचं सिक्वल हे जनरेशन नेक्स्ट विचारात घेऊन बनवलाय आणि तिथेच काहीसा फसलाय. आज हॉलिवूड मधले बीग बजेट सिनेमे इथे भारतात आवर्जून प्रमोशन करायला लागलेत तेव्हा त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा डॉन २ चा प्रयत्न बर्‍यापैकी यशस्वी झालाय. DDLJ चा शाहरूस असे साहसी अभिनय करायला लागल्यावर कसं व्हायचं? त्याने बाजीगर करावा , दिवाना करावा, दिल से करावा, कुछ कुछ होता है करावा, कल हो ना हो करावा पण रा-वन , डॉन करून उगाच कोयलाच्या मुक्या अभिनयाची आठवण करून देऊ नये मटणाच्या रस्याला तरी तर दिसतेय पण खाताना सगळंच अळणी याला काय अर्थ आहे राव?

समीक्षण उत्तम.

पैसे खर्च झाल्याचं दु:ख नाही पण शाहरूख सोकावतो ना ! >>>>>

हा बेफिकीर मी नव्हे, हा कोणी इतरच आहे

दोन बेफिकिर आहेत..... http://www.maayboli.com/user/28236 http://www.maayboli.com/user/34479 ... क्लिक केल्यावर दोन आय डी येतात.. एकात कि पहिली आहे.. एकात की दुसरी आहे..... डॉनपेक्षाही रहस्यमय आहे हे... Proud

Tulaa lokaanni dileli roses malaa pass on karnyaapekshaa tyaatun bodh ghe...

Ani kuthlihi gosht criticize karnyaa adhi ekda swatha experience kar... Aikeev maahitivarun kashaachaahi udo udo hi karu nako kinva shivyaa hi ghaalu nakos...

I hope tula point lakshaat yeil...

ये पन्ना तो पहलेसे था| नया क्यूं बनाया?

खाना फ्री है तो लगे दो दो प्लेट खाने|
साईट फ्री है तो लगे नए नए पन्ने बनाने|

Pages