Submitted by तोषवी on 26 December, 2011 - 17:55
माझे सासू सासरे आणि नणंद यायच ठरवतायत, त्यामुळे त्याना आसपास /दूर फिरवण्यासाठी ७ सीटर वाहनाची गरज लागणार आहे.महीना भरा साठी अशी गाडी रेंट करणं किवा विकेंड्स ना रेंट करण्याचा विचार करतोय, पण नेट वरून रेट काढले तर दिवसाला ७०-८० $ कमीतकमी होतील असं दिसतय.याशिवाय मायलेज/टॅक्स्/इन्शुरन्स वैगरे वेगळ होईल.
कुणाला लॉग टर्म रेंटल / किवा डिस्काऊंट्स असलेली कार रेंटल्स माहीती आहेत का?
तसंच नॉर्थ कॅरोलीना मधून नायगरा/न्यूयॉर्क्/डीसी ई. तरी कमीत कमी त्यांना पाहायचय. अशा टूर्स असतात का?(एकटेच फिरून या असं म्हणण बरोबर वाटत नाहीये पण निदान एखाद्या ठिकाणा साठी जरी सोय झाली तर...)
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
तोषवी बजेट वाल्यांची वेबसाईट
तोषवी बजेट वाल्यांची वेबसाईट चेक कर.
तोषवी तू म्हणतेस ते सगळे
तोषवी तू म्हणतेस ते सगळे मुद्दे [इंश्यूरन्स वगैरे] लागू होतात. पण आठवड्याभरासाठी वगैरे डील्स मिळतात ऑनलाईन.
काही साईट्स http://www.expedia.com/
http://www.kayak.com/
http://www.hotwire.com
http://www.priceline.com
check kar.
तसेच तुम्ही सॅम्स क्लबचे सदस्य असाल, तर त्यांच्या वेबसाईटवरही डील्स दिसतील.
काहीवेळेस, क्रेडीटकार्ड कंपन्या असे इंशूरन्स काही ठराविक फी महिन्याला आकारून देतात, तुमच्या क्रेडीटकार्ड कंपनीला विचारून चौकशी करा.
टूर्स कंपनीबद्दल :
Raleigh to New York Bus Tickets & Schedules Info - GotoBus
अशा स्वरुपाच्या काही टूर कंपन्या असतात. काही वेळेस चायनीज कंपन्यांचे पॅकेज डील्सही असतात. थोडे गूगल करून शोधावे लागेल मात्र.
धन्यवाद. ४ विकेंड्स रेंट
धन्यवाद.
४ विकेंड्स रेंट करणे हे महीन्या च्या रेंटल पेक्षा स्वस्त असते का? मी अस ऐकलंय की विकेंड्स ना डिल्स असतात.
मी गो टू ची साइट पाहीली , त्यांच्या सार्या टूर्स न्यूयोर्क नाहीतर डीसी तून आहेत पण. लोकल नोर्थ कॅरोलिनाचा ओप्शन असता तर नक्कीच छान होत्या.
तोषवी, एकटे फिरून या सांगायला
तोषवी, एकटे फिरून या सांगायला ऑड वाटते खरे पण माझा मुलगा लहान असताना माझे आई-बाबा आले होते.मुलाला घेऊन फिरायला जाणे अवघड असल्याने माझ्या आई-बाबांनी वरच्या ठिकाणांसाठी केसरीची टूर घेतली होती.उत्तम सोय झाली.जेवणाचा प्रश्न राहिला नाही आणि त्यांची काळजी वाटली नाही.त्यांनी ती टूर खूप एंजॉय केली.