तू

Submitted by मंदार-जोशी on 8 December, 2011 - 08:52

तू......एक नि:स्वार्थ प्रेयसी
जीव ओवाळून टाकणारी
मिळेल त्यापेक्षा अंमळ
अधिकच देणारी

तुझा सुगंध
आसमंतात दरवळणारा
कवटाळायला जाताच हातून
हलकेच निसटणारा

तुझी चाहूल
नेहमीच सुखावणारी
दाराबाहेरचा कानोसा मात्र
रिकामाच ठेवणारी

तुझी वृत्ती
हात न सोडणारी
दुराव्यातही माझ्यावर
सावली धरणारी....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मंदार

वेगळाच फॉर्म रे.. सहीय्ये !!
(तू फॉर्मात यायला लागलास हे पाहून मनापासून आनंदलेला बाहुला )

प्रेयसीबद्दलचं प्रेम, कृतज्ञता चांगली व्यक्त होत आहे.

फक्त शेवटच्या कडव्यातला
'हात न सोडणारी वृत्ती' आणि 'दुरावा' हा विरोधाभास
माझ्या तरी नीटसा ध्यानात आला नाही.

किरण Lol मंदार हातात तलवार घेवुन शोधतो आहे तुला आणि तुझी सुपारी दिली आहे बर्‍याच भाई-दादांना. Happy

भिडे सर म्हणतात ते बारोबराय पण मला वाटत कि त्या शेवटच्या कडव्यातून दोन नवीन वेगवेगळी कडवी असतील तर हा आक्षेप खोडून काढता येईल.
कविता छान आहेच !!

.

खुप आवडली. मनापासून लिहिलीयेस.
मला वाटतं की अबोला काय, दुरावा काय अन विरह काय? यापैकी कोणताही शब्द तिथे असता तरी त्यामागची भावना बदलत नाही ना. मग की फर्क पैंदा हय ?? Happy
पुलेशु.

तुझी वृत्ती
हात न सोडणारी
दुराव्यातही माझ्यावर
सावली धरणारी....>>> सुं द र

छान Happy

Pages