कसं जमतं तुला?

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मला चौकटीत बसवणारा तू
आणि माझी चौकट उसवणाराही तूच
लक्ष्मणरेषेची भलामण करणारा
पण आतून कीचकासारखा असणारा तू...
नावं वेगळी पण जात तीच...
बाईच्या जातीने कसं असावं हे टाहो फोडून सांगणारी
आणि त्याच वेळी तिला ओरबाडायला टपलेली

कौतुक आहे ते याच गोष्टीचं
स्वतःला देवत्वाच्या पायरीवर बसवून
राजरोसपणे असं अर्वाच्च्य जिणं
कसं जमतं तुला?

प्रकार: 

>>>>>स्वतःला देवत्वाच्या पायरीवर बसवून
राजरोसपणे असं अर्वाच्च्य जिणं
कसं जमतं तुला?<<<<<<

फारच छान!!