तांदळाचे पिठ ३ वाट्या
फुटाणा डाळीचं पिठ १ वाटी
लोणी २ चमचे
तिळ २ मोठे चमचे
ओवा २ मोठे चमचे
तिखट मिठ चवीनुसार
तळण्यासाठी तेल
मुरुक्कु म्हणजे आपल्या चकलीची साउदींडीयन मावस बहिण.
महाराष्ट्रात जशी दिवाळीला चकली हवीच हवी. तसेच इथे कर्नाटकात कृष्णजन्माष्ठ्मीला आणि "बोंबे हब्बा" (म्हणजे बाहुल्यांचा उत्सव्-नवरात्रात दसर्या पर्यंत दहा दिवस घरात देविपुढे तर्हेतर्हेच्या बाहुल्या मांडून आरास करतात). साठी मुरुक्कु खास. ह्या खास वेळी घराघरांतुन ह्या मुरुक्कुचा खमंग दरवळ येत असतो.
योग्य ते प्रमाण घेउन भाजणी करा, ती गरम पाण्यात भिजवा, मग चकल्या करा हा सगळा कुटाणा नवशिक्यांना फार कठीण. म्हणून ही एक सोप्प्या प्रकारची चकली. नो कटकट, मुरुक्कु झटपट !
सर्वप्रथम फुटाणा डाळीचे पिठ करून घ्यायचे. मग हे पिठ, तांदळाचे पिठ, लोणी, तिखट, मिठ, ओवा, तिळ हे सगळे व्यवस्थित एकत्र मरुन घ्यायचे. पाणी न घालताच लोणी सगळ्या पिठात निट एकसारखे एकत्र होईल असे मिसळून घ्यायचे. मग गरजे नुसार पाणी टाकुन चकलीला भिजवतो तसे पिठ भिजवून घ्यावे. कढईत तेल तापायला ठेउन एकसारख्या दोन किंवा तिन वेढ्याच्या चकल्या कराव्यात. कडकडीत तेल तापवुन मग मध्यम आचेवर कुरकुरीत मुरुक्कु तळाव्यात. हलका गोल्ड्न ब्राउन रंग आल्यावर काढुन पेपर टॉवेल वर जास्तिचे तेल निथळायला ठेवाव्या. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात. (ठेवायला उरतच नाहीत )
चकल्या तळतानाच्या सगळ्या टिपा ह्याला लागू जसे
प्रखर आचेवर मुरुक्कु तळल्याने लवकर तळले जाउन थंड झाल्यावर मउ पडतात.
पिठ मळताना लोण्याचे प्रमाण जास्त झाल्याने तळताना चकल्या हसतात (तेलात विरघळतात)
फुटाणा डाळीचे पीठ म्हणजे
फुटाणा डाळीचे पीठ म्हणजे डाळ्याचे पीठ (ना) (का) गं?
छान सोपी वाटतेय पाककृती..
अगदीच सोप्पा आहे कि हा प्रकार
अगदीच सोप्पा आहे कि हा प्रकार !
हो मंजु तेच डाळ्या आपण
हो मंजु तेच डाळ्या आपण इडलीच्या चटणीला किंवा चिवड्यात घालतो त्या डाळ्या मिक्सर वर वाटून त्याचे पिठ करायचे.
लय भारी
लय भारी
छान
छान
मस्त लागतात ह्या. सोर्यातून
मस्त लागतात ह्या. सोर्यातून न पाड्ता हाताने वळून पण घालतात. ह्याच मिश्रणाची छोटी बोरे पण बनवून तळली तरी मस्त लागतात चहा बरोबर. रोंबा नल्ला.
मस्त. हवीच होती मला ही कृती.
मस्त. हवीच होती मला ही कृती. इकडे बटर चकरी म्हणून वर दिसतात तशा चकल्या मिळतात तशी लागेल असे वाटते. आजच करून पहाते.
छानच.
छानच.
मस्त!!
मस्त!!
काय मस्त दिसत आहेत. अमांनी
काय मस्त दिसत आहेत. अमांनी सांगितले तशी ह्याच कॄतीने बोरे करुन पाहायला हरकत नाही
फुटाणा दाळिचे पिठ
फुटाणा दाळिचे पिठ म्हणजे?????
ते कोठे मिळते?
मस्त रेसिपी. पण लोण्याला काही
मस्त रेसिपी.
पण लोण्याला काही पर्याय आहे क?
बटर चालेल का?
अनास्पुरे_जर्मनीकर>> हो बटर
अनास्पुरे_जर्मनीकर>> हो बटर चालेल.
अमृता गायकवाड >> म्हणजे तेच डाळ्या आपण इडलीच्या चटणीला किंवा चिवड्यात घालतो त्या डाळ्या मिक्सर वर वाटून त्याचे पिठ करायचे.
हा साहित्याच्या फोटो डाळ्या साठी
ठान्कू ते जिन्नस मधे फक्त
ठान्कू
ते जिन्नस मधे फक्त "लोणी" वाचले
म्हनुन इचारल
तस तो फोटो दिसतो बटर चा पण खात्री करुण घेतली......;)
बिन्धास्त करा. पण बटर सॉल्टेड
पण बटर सॉल्टेड असेल तर.. मिठाच्या प्रमाणात फरक पडेल.
संपदा, हे आईने केले होते.
संपदा, हे आईने केले होते. फारच मस्त झाले. आई आता दिवाळीला पण हेच करणारे
मुलांना प्रचंड आवडलयं. खुप धन्यवाद!
हा आवडता प्रकारेय. धन्यवाद
हा आवडता प्रकारेय. धन्यवाद रेसिपी साठी
हे चकलीपेक्षा कडक असते का?
हे चकलीपेक्षा कडक असते का?
पेरू नाही गं चकली सारख्याच
पेरू नाही गं चकली सारख्याच खमंग खुसखुशीत होतात.
ह्या पद्धतीने चकल्या केल्या.
ह्या पद्धतीने चकल्या केल्या. मस्त झाल्या. खुप खुप धन्यवाद!
सहीच! छानच लागतात हे.
सहीच! छानच लागतात हे.
मी आज केले हे मुरुक्कू. मस्त
मी आज केले हे मुरुक्कू. मस्त झाले आहेत.
एकदम सोपे आहेत. फार पसारा/ रगाडा झाला नाही
डाळ्या (दाळवा) उपलब्ध नसेल तर
डाळ्या (दाळवा) उपलब्ध नसेल तर दुसरा काही पर्याय आहे का?
अल्टिमेट झालेत मुरुक्कु
अल्टिमेट झालेत मुरुक्कु !
प्ले डेट ला आलेल्या पोरांनी दहा मिनिटात फन्ना उडवला.
धन्यवाद डॅफो!
तळताना चकल्या हसतात <<< मस्त
तळताना चकल्या हसतात <<<
मस्त आहेत मुरुक्कु.
अप्रतिम प्रकार दिसतोय... आणि
अप्रतिम प्रकार दिसतोय... आणि लिहीला पण छान आहे:) धन्यवाद एका नविन पाकृ.बद्दल...
करुन बघणार आहे पण एक शंका .
करुन बघणार आहे पण एक शंका . भिजवताना पाणी गरम घालायचे की नॉर्मल ?
मी पण करुन बघणार
मी पण करुन बघणार आहे.
भिजवताना पाणी गरम घालायचे की नॉर्मल ? .. हेच विचारायला आली होती.
चकलीला भिजवतो तसे पिठ भिजवून घ्यावे... खुपच अनाडी प्रश्न तरीही नक्की कसे पिठ भिजवावे म्हणजे थोडे घट्ट का?
डॅफो उत्तर देईलच. पण मी सरळ
डॅफो उत्तर देईलच. पण मी सरळ रूम टेंपरेचरचे पाणी वापरले होते.
रविवारी वर दिलेल्या
रविवारी वर दिलेल्या प्रमाणाच्या अर्धे प्रमाण घेऊन मी मुरुक्कु बनविण्याचा प्रयत्न केला पण तो पार फसला. चकली वरुन कडक आतुन नरम झाली


तेल कडकडीत तापवुन नंतर मध्यम आचेवर तळल्यातरी. साबा म्हणाल्या तेल गरम करुन घालायला हव होते. मी त्यांना बटर चकली आहे असे सांगितल्यावर 'कसली ही हल्लीच्या सुनांची थेरे, सासुचे काही एकतील तर शपथ' असा लुक दिला मला
माझ्या मते चकलीचा साचाच जाड होता. (नाचता येईना अंगण वाकडे)
या चकल्या बनविण्यासाठी मोठा शहाणपणा करुन आधीच प्रत्येकी १ किलो फुटाणा डाळ व तांदुळ आणुन ठेवलेत. पण नशिब आधी थोड्याच बनवुन पाहिल्या
Pages