'देऊळ'चे संगीत

Submitted by माध्यम_प्रायोजक on 18 October, 2011 - 04:22
'वळू' आणि 'विहीर' या उमेशच्या चित्रपटांमध्ये गाणी नव्हती. या दोन्ही चित्रपटांमध्ये संगीताचा उत्कृष्ट वापर मात्र केला गेला होता. 'देऊळ'मध्ये मात्र उमेशनं गाण्यांचा कथानक पुढे नेण्यासाठी, त्यातून विचार मांडण्यासाठी वापर केला आहे.

या चित्रपटात तीन गाणी असून त्यांपैकी एक गाणं ज्येष्ठ गीतकार श्री. सुधीर मोघे यांनी तर दोन गाणी श्री. स्वानंद किरकिरे यांनी लिहिली आहेत. संगीत श्री. मंगेश धाकडे यांचं आहे.

DEOOL - RE-RE-RE-REV-AUDIO CD OUTERBOX 28TH SEPT .jpg


या चित्रपटातल्या गाण्यांविषयी श्री. मंगेश धाकडे यांचं मनोगत -

’देऊळ’ या चित्रपटात तीन प्रमुख गाणी आहेत. ही गाणी एकमेकांपेक्षा अगदी वेगळी आहेत. त्यांचे स्वभाव तर वेगळे आहेतच, पण त्याचबरोबर त्यांच्यामागचा दृष्टिकोनही भिन्न आहे. या तीनही गीतांचा आलेख चढत्या श्रेणीतला आहे. यात सगळ्यांत आधी भजन आहे. ’देवा तुला शोधू कुठं’ हे या भजनाचे शब्द आहेत, आणि त्यात पारंपरिकता जपली आहे. या मातीशी असलेलं नातं हे भजन स्पष्ट करतं. ’वेलकम’ या दुसर्‍या गाण्यात पारंपरिक वाद्यांबरोबरच पाश्चिमात्य वाद्यांचाही वापर केला आहे. शहरीकरणाचे ग्रामीण संस्कृतीवर होत असलेलं अतिक्रमण आणि याच अंगानं होत असलेलं वैचारिक आक्रमण दाखवताना या गाण्यात अनेक छटांचा विविधरंगी वापर झालेला दिसेल. तिसर्‍या गाण्याचे शब्द आहेत ’फोडा दत्त नाम टाहो’. हे गाणं आधीच्या दोन गाण्यांच्या तुलनेत चित्रपटाची गरज या अर्थानं वरचढ ठरावं, असं आहे. या आण्यात वाद्यकल्लोळ आहे, तसंच सूरही चढत्या श्रेणीतले आहेत. हे गाणं उत्साहवर्धकही आहे आणि अस्वस्थ करणारंही. चांगभलं!!!

***


'देऊळ'मधल्या दोन गाण्याची झलक खास तुमच्यासाठी ...

'देवा तुला शोधू कुठं'




'वेलकम'


***
Groups audience: