आरोग्यदुर्गा

Submitted by क्रांति on 1 October, 2011 - 05:23

आज सकाळी सकाळमध्ये विवेक सरपोतदार यांचा 'नवदुर्गांची औषधी रूपे' हा अतिशय मोलाचा लेख वाचला आणि त्याचं सार काव्यरूपात मांडून नवरात्रात अंबेच्या चरणी आजची माळ अर्पिली.

प्रथम दुर्गा शैलपुत्री, अमृता
श्रेयसी, आरोग्यदायी सर्वथा

द्वितीय दुर्गा ब्रम्ह्चारिणि शारदा
स्वर मधुर करि, स्मरण वाढवि सर्वदा

तृतिय दुर्गा चंद्रघंटा पूजिता
लाभते आरोग्य हृदया रक्षिता

ही चतुर्था, नाम कुष्मांडा असे
रुधिर रक्षी, देत संजीवन असे

स्कंदमाता पार्वती ती पाचवी
कफविकारा, वात-पित्ता घालवी

अंबिका, कात्यायनी षट् रूपिणी
कंठरोगा घालवी मधुभाषिणी

सप्तमा ही कालरात्री योगिनी
रक्षिते मस्तक, मनोबल दे झणी

अष्टदुर्गा ती महागौरी असे
तुलसिरूपे रक्तशुद्धी करितसे

सिद्धिदात्री नवमदुर्गा शोभते
बुद्धिबल नारायणीचे लाभते

जाणुनी आरोग्य शाश्वत संपदा
साधणे नवरात्र व्रत हे सर्वदा!

गुलमोहर: 

परत वाचली
सुंदर ,सोपी,सुटसूटीत्,सरळ शब्द माला गुंफण.