Closet

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

गेले दोन महीन्यांपासुन रुम आवरेल आवरेल म्हणत होतो, आज योग आला. मला माहीत होते माझ्याकडे जरुरीपेक्षा जास्त कपडे आहेत. पण किती जास्त आहेत हे आज कळाले.

काही महीन्यांपुर्वी टुलीप ने तीच्या closet मधल्या pink साम्राज्या बद्दल ब्लॉग लिहीला होता. तसे माझ्याकडे stripes आणि black चे साम्राज्य दिसतेय. Happy
I seriously have to stop purchasing cloths.

विषय: 
प्रकार: 

हे एका लग्न न झालेल्या पुरुषाचं क्लोजेट? विश्वास बसत नाहीये. मस्त घडी बिडी केलेले कपडे. क्या बात है!!!!

माणसा, नविन कपडे घेणे थांबवु नकोस. तर जुने झालेले clothing bin मधे टाकुन ये. तुझ्या घराच्या रस्त्यावर mobil गॅस स्टेशन आहे ना, तिथे आहेत दोन मोठ्ठे डबे !!!!!
.
मला माहीत होते माझ्याकडे जरुरीपेक्षा जास्त कपडे आहेत. पण किती जास्त आहेत हे आज कळाले >>> असे सगळ्यांनाच होते म्हणुनच काही लोक आपले कपाट आवरतच नाहीत Wink

एवढे कपडे एका पुरुषाचे? मला तर वाटले होते, मुलींच्याकडेच फक्त एवढे कपडे असतात..................

चांगलं मोठं walk-in-closet आहे की. कुठे राहतो बाबा तु? NJ मध्ये तरी कधी कुठल्या apartment मध्ये अशी room पाहीली नाही.

खरचं किती मोठं walkin closet आहे..आणि कपडे एका bachelor चे आहेत असे ठेवणी वरुन खरचं वाटतं नाही.

वर लिहीलेले वाचले नाही का, दोन महीन्यांपासुन आवरेल आवरेल म्हणत होतो Happy

मी CT मधे रहातो, NJ त देखील आहेत की चांगल्या जागा, उलट मी तर म्हणतो NJ तल्याच चांगल्या आहेत. फक्त edison च्या बाहेर पडावे लागेल Wink

नविन कपडे घेणे थांबवु नकोस>>> हो मी Vouge magazine subscribe करायचा विचार करतोय Happy

माणसा, कपडे नीट ऑर्गनाईझ कर. हिवाळ्याचे वेगळे (लान्ब बाह्याचे शर्ट, जाड कापडान्चे शर्ट, गडद रन्गाचे शर्ट, स्वेटर्स, वूलनच्या पॅन्ट्स), उन्हाळ्याचे वेगळे. (अर्ध्या बाह्यान्चे, लाईट कलरचे, कॉटनचे कपडे, खाकी, लाईट कलरच्या पॅन्ट्स, हाफ पॅन्ट्स) या दोन्हीमधे परत, ऑफिसला जाण्याचे वेगळे, इतर ठिकाणि जाण्याचे वेगळे. भारतीय लोकान्च्या पार्टीला जाण्याचे वेगळे, इतरत्र जाण्याचे वेगळे. सगळे टी शर्ट्स वेगळे, जीन्स वेगळ्या. असे केलेस म्हणजे मग लक्षात येईल की खरेच खूप कपडे आहेत का? नि कुठल्या कॅटेगोरीत कपडे कमी पडताहेत, नि कुठे जास्त आहेत? मग जास्तीचे कपडे मन घट्ट करून साल्व्हेशन आर्मीला देऊन टाक. टॅक्सेस आयटेमाईझ करत असशील तर पावती घ्यायला विसरू नकोस.

माणसा, closet छानच आहे, पण किती अडकायचं त्यात ? आता तरी closetमधून बाहेर ये Proud

    ***
    It is the spirit of the age to believe that any fact, no matter how suspect, is superior to any imaginative exercise, no matter how true.
    - Gore Vidal

    मागच्याच आठवड्यात हाच कपाट आवरा-आवरी चा कार्यक्रम केला मी पण Happy
    ३६ शर्टस अन २२ पँटस ... आता ठरवलय दोन वर्ष कपडेच नाही घेणार Happy
    पण माणसा तुझ क्लोजेट छानच आहे , आवडलं .
    ****************************
    जसे वाजती नुपुर सुखाचे ...

    झक्की म्हणताहेत ते करच पण सेलेब्ज कलर प्रमाणे को-ऑर्डिनेट करतात तेव्हा तसंही करुन बघ. म्हणजे तुझं क्लो़जेट कसं चमकून जाईल.

    अच्छा, अच्छा. अस्संय होय.
    मघाशी तुमच्या त्या 'You are never free in US' चा अर्थ कळलाच नव्हता.
    आत्ता कळला.
    ***
    हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
    सुंदर साजिरा, श्रावण आला..!

    एखाद्या पुरुषाकडे इतके कपडे असु शकतात??????

    टण्या, अरे असु शकतात काय पुरुषांकडेच जास्त कपडे असतात असे माझे मत आहे, निदान आमच्या घरात तरी हेच चित्र आहे
    माझ्या नवर्‍याचे कपडे ३/४ क्लोजेट व्यापतात आणि माझे कपडे फक्त १/४. Happy
    हा सागरपण माझ्या नवर्‍याच्या कॅटेगरीतला (मराठी शब्द?) दिसतोय, वीकेंडला सारखे सारखे शॉपिंगला जाणारा. Happy
    --------------------------------------------
    Mothers are the necessity of invention.
    -Calvin and Hobbs

    टण्या, अरे असु शकतात काय पुरुषांकडेच जास्त कपडे असतात असे माझे मत आहे, निदान आमच्या घरात तरी हेच चित्र आहे
    माझ्या नवर्‍याचे कपडे ३/४ क्लोजेट व्यापतात आणि माझे कपडे फक्त १/४. Happy
    हा सागरपण माझ्या नवर्‍याच्या कॅटेगरीतला (मराठी शब्द?) दिसतोय, वीकेंडला सारखे सारखे शॉपिंगला जाणारा. Happy
    --------------------------------------------
    Mothers are the necessity of invention.
    -Calvin and Hobbs

    हीहीही रुनी, सहमत. आमच्याकडेही हीच अवस्था आहे. मधे मी एकदम चिकाटीने मोजले. तर फक्त उन्हाळ्याचेच ३० शर्ट्/टीशर्ट निघाले.
    बाकी थंडीचे, ऑफिसचे ह्यांचं मोजमाप व्हायचंच आहे.

    सायो मी तर मोजायचे कष्टपण घेत नाही, या उन्हाळ्यात नवर्‍याने स्वतःच नविन कपडे ठेवायला जागा नाही म्हणुन
    ३ बॉक्स कपडे साल्व्हेशन आर्मीला दिलेत, तरीही जैसे थे अशीच अवस्था आहे कपाटाची Happy

    अगं रुनी आपल्याकडे नक्की आकडा असला ना की वेळप्रसंगी ऐकवायला उपयोगी पडतो. म्हणजे नवर्‍‍यांच्याही लक्षात येतं की
    आपण उगाच काही बाही बडबडत नाही आहोत. Proud

    अरे बाप रे.. तसे मी काही नमुने वसतीगृहात बघितले आहेत.. कपाट भरुन कपडे, टेबल वर अनेक डीओ, क्रिमच्या बाटल्या, डोक्यावर थापायची स्टायलिंगची क्रिमं वगैरे वगैरे.. तरीही वरती माणसाने टाकलेला फोटो अजब आहे.. माझ्या इंजीनिअरींगच्या होस्टेलच्या अख्ख्या लॉबीत सुद्धा एव्हडे कपडे नव्हते Lol

    माझी कपडे खरेदी ही पुर्णतः कानबान पद्धतीवर होते Happy .. आधीचा कपडा फाटल्याशिवाय पुढचा येत नाही.. रेक्विझिशन निघाल्याशिवाय पीओ नाही Happy

    थोडक्यात काय तर आणीबाणीची परिस्थिती. बरं एक सांग, तू नवीन कपडे घ्यायला जाताना जुने फाटके कपडे घालून जातोस कां? Wink

    मन घट्ट करून साल्व्हेशन आर्मीला देऊन टाक >>>>
    नाही शक्य नाहीय, दोनदा घालत नसलेले कपडे भारतात घेवुन गेलो होतो, पण जीव अडकला होता म्हणुन परत आणले Happy

    वीकेंडला सारखे सारखे शॉपिंगला जाणारा. >>>
    मला दर दोन एक महीन्यांने एक <फीलींग> येते की मी फक्त घरांतल्यांसाठी काम करतोय, व माझ्यावर काहीच खर्च करत नाही. असे feeling आले की मग राजा बाबू चित्रपटातली गोविंदाची entry आठवायची आणि मॉलमधे जायचे Wink

    माझी सवय मी शीतला देखील लावली आणि मग आता तीचा नवरा म्हणत असतो, येवुंदे तुझी बायको मग मी तिला सगळी दुकाणे दाखवतो आणि तुझे credit card चे बिल वाढवतो Happy

    बापरे .. ! गांधीजींनी हे पाहीले असते तर ?

    बाप रे !! एवढ्या लोकांना closetमध्ये रस असेल असे वाटले नव्हते... मग कधी येताय closetमधून बाहेर ? Happy

      ***
      It is the spirit of the age to believe that any fact, no matter how suspect, is superior to any imaginative exercise, no matter how true.
      - Gore Vidal

      मी पण या यादीत नाव लावू शकते. कमीत कमी ३० पंजाबी ड्रेस... जीन्स आणि टॉप वेगळेच! Wink
      ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
      जीवन जगण्यात धाडस आहे.. मृत्यूला शरण जाण्यात नाही.

      मग कधी येताय closetमधून बाहेर >>>>>
      स्लार्टी तुला "coming out of the closet" म्हणायचय का?
      ह्म्म्म्म... Proud
      --------------------------------------------
      Mothers are the necessity of invention.
      -Calvin and Hobbs

      मी नक्की चोरी करणार आहे या माणसाचा वारड्रोब Happy

      मुलींलडे भरपूर चपला आणि सँडल्स असतात असे मी ऐकून आहे Happy आहे का इथे कुणी अशी बया Happy

      रुनी Proud

        ***
        It is the spirit of the age to believe that any fact, no matter how suspect, is superior to any imaginative exercise, no matter how true.
        - Gore Vidal

        अरेच्या..'बापरे इतके कपडे' अशी कमेंट काय करताय सगळे ?:)
        माणसाने पहिला जो फोटो 'वॉक इन च्लोजेट' चा फोटो टाकलाय त्यात एकूण दोन भींतींना लागून स्टोरेज आहे.
        आणि त्याच दोन भींतीचेच क्लोज अप आहेत पुढचे दोन फोटो .
        म्हणजे फोटो एकूण तीन असले तरी चार भींती भरून कपडे नाहीयेत, दोन च भींती भरून आहेत , किमान तेवढे तर हवेतच ना Happy !

        मला दर दोन एक महीन्यांने एक <फीलींग> येते की मी फक्त घरांतल्यांसाठी काम करतोय >>>> हे तर येकदमच भारी feeling आहे की...
        घरच्यांसाठी नक्की काय केलं म्हणजे असं feeling येतं रे माणसा ?

        माणूस, तुमचे closet आवडले, अमेरिकेत स्वतःचे काम स्वतः करावे लागत असूनही, तुम्ही ज्या पद्धतीने कपडे ठेवले आहेत त्यावरून तुमच्या नीटनेटकेपणाचा अंदाज येतो. Happy
        एकूण तुम्ही सर्वं रंग वापरता असं दिसतं. Happy कारण जनरली पुरूष हे निळा सोडून इतर कोणता रंग वापरत असतील असं मला नाही वाटत. चांगलं आहे, keep it up!
        .
        माझ्याकडे ही खूप कपडे आहेत, पण तुमच्या इतके नाहीत बुवा. आणि मी अधून-मधून कपडे देऊन टाकत असते, म्हणजे कसं नविन आणताना काही गिल्ट येत नाही, शिवाय कपाटात नविन कपड्यांसाठी जागाही होते. Proud
        बाय द वे, मला २/३ शंका आहेत, खाली तो HP चा box दिसतोय, त्यातही कपडे भरलेत का तुम्ही? तुम्हाला ६ महिन्यामागचे कपडे बसतात का? (आम्हाला नाही बसत. :P)
        आणि तिसरी शंका ही होती की तुम्ही आपण कपडे लाँड्रीत टाकलेत हे विसरता का? (मग परत एकदा आठवलं की तुम्ही अमेरिकेत आहात आणि कपडे घरीच धुता, त्यामूळे लाँड्रीत कपडे विसरण्याची शक्यता केवळ अशक्य आहे.)
        कारण मी कायम लाँड्रीत टाकलेले कपडे विसरते, मग कधीतरी कुठलातरी शर्ट आठवतो, तो घरात सापडत नाही, मग एकच ठिकाण. धोबी 'त्या' शर्ट बरोबर, अणखी बरेच, विस्मरणात गेलेले शर्ट्स देतो... Proud
        .
        >>>मुलींलडे भरपूर चपला आणि सँडल्स असतात असे मी ऐकून आहे आहे का इथे कुणी अशी बया>>>>>> बी तुम्हाला ही असली 'चपलावाली' बया कशाला हवीय? Proud

        अरे बापरे, ईतक्या प्रतिक्रीया येतील असे वाटले नव्हते. Happy

        किमान तेवढे तर हवेतच ना >>> हो तर, किमान एवढे हवेच Happy तरी अजुन माझ्याकडे चांगल्या jean नाहीत, त्या घ्यायच्यात.

        नक्की काय केलं म्हणजे असं feeling येतं रे माणसा >>> हे सांगण्यास फी लागेल, एक कॉफी.

        Thanks Dakshina Happy
        HP चा box दिसतोय, त्यातही कपडे भरलेत का तुम्ही? >>>> तुम्ही, कवळा तरुण आहे अजुन मी.
        त्यात नाही पण त्या मागे एक-दोन सुटकेस आहेत, त्यात असतील Happy

        आमच्याईथला लाँड्रीवाला कपडे घरी आणून देतो, त्यामुळे विसरण्याची चींता नाही Happy

        Pages