या इथे कधी काळी... (तरही)

Submitted by आनंदयात्री on 19 September, 2011 - 00:49

माणसांमधे इथल्या एक देवघर होते
या इथे कधी काळी देखणे शहर होते

या इथे तिचे माझे चिमुकलेच घर होते
या इथे कधी काळी देखणे शहर होते

भेटतो कधीकाळी, त्यातही तुझे नखरे!
बातमी उगाचच पण पूर्ण गावभर होते!

वाढली महागाई, हरवले जुने पैसे
मोजके जिव्हाळे पण नेहमी हजर होते

सर्व भरजरी नाती मी लपेटली देही
नेमके मनावरचे घसरले पदर होते

एकट्या सुन्या वाटा, झुंजल्यात दिवसांशी
सोबतीस स्वप्नांचे खूळ रातभर होते

ओळ मागते काही, शब्द उमटती काही
हे असेच आताशा रोज पानभर होते

दु:ख खोल गेले की, जीव पोरका होतो
संपतात जाणीवा, कोरडी नजर होते

एकटाच जगलो पण, शेवटी सुखी झालो
(एकट्याच स्वप्नांचे मरणही सुकर होते)

- नचिकेत जोशी

गुलमोहर: 

वा वा! सुंदरच!

माणसांमधे इथल्या एक देवघर होते
या इथे कधी काळी देखणे शहर होते

वाढली महागाई, हरवले जुने पैसे
मोजके जिव्हाळे पण नेहमी हजर होते>>> मस्त!

सर्व भरजरी नाती मी लपेटली देही
नेमके मनावरचे घसरले पदर होते>>> दुसरी ओळ फारच आवडली.

एकट्या सुन्या वाटा, झुंजल्यात दिवसांशी
सोबतीस स्वप्नांचे खूळ रातभर होते>>> यातही दुसरी ओळ फारच मस्त!

ओळ मागते काही, शब्द उमटती काही
हे असेच आताशा रोज पानभर होते>>> मस्त शेर! वा वा!

एकटाच जगलो पण, शेवटी सुखी झालो
(एकट्याच स्वप्नांचे मरणही सुकर होते)>>> व्वा!

-'बेफिकीर'!

सुंदर गझल Happy

देवघर हा मतला सगळ्यात अप्रतिम!!

पोस्ट झालेल्या सर्व तरहींत मला आवडलेला मतला.

गावभर हा शेर गंमतीशीर वाटला - थोडा उर्दू स्टाईलचाही Happy

खासच Happy

छान Happy

छान

मतला...
पदर्,नजर्,पानभर अप्रतिम....!!!

वाढली महागाई, हरवले जुने पैसे
मोजके जिव्हाळे पण नेहमी हजर होते......आवडले!!!

सर्व भरजरी नाती मी लपेटली देही
नेमके मनावरचे घसरले पदर होते

एकट्या सुन्या वाटा, झुंजल्यात दिवसांशी
सोबतीस स्वप्नांचे खूळ रातभर होते

ओळ मागते काही, शब्द उमटती काही
हे असेच आताशा रोज पानभर होते

दु:ख खोल गेले की, जीव पोरका होतो
संपतात जाणीवा, कोरडी नजर होते

काय शेर का काय!!! अशक्य शेर आहेत!!
अप्रतिम!!

सुरेख गझल, नचिकेत. अनेक शेर आवडले.

वाढली महागाई, हरवले जुने पैसे
मोजके जिव्हाळे पण नेहमी हजर होते

ओळ मागते काही, शब्द उमटती काही
हे असेच आताशा रोज पानभर होते

मस्त वाटले. Happy

एकट्या सुन्या वाटा, झुंजल्यात दिवसांशी
सोबतीस स्वप्नांचे खूळ रातभर होते

ओळ मागते काही, शब्द उमटती काही
हे असेच आताशा रोज पानभर होते

मस्तच गझल.

एकट्या सुन्या वाटा, झुंजल्यात दिवसांशी
सोबतीस स्वप्नांचे खूळ रातभर होते

ओळ मागते काही, शब्द उमटती काही
हे असेच आताशा रोज पानभर होते

>> क्या बात..!

>>सर्व भरजरी नाती मी लपेटली देही
नेमके मनावरचे घसरले पदर होते

व्वा!!

>>एकट्याच स्वप्नांचे मरणही सुकर होते

आह!! क्या बात है!! अप्रतिम मिसरा...! Happy

सुंदर गझल यात्री Happy आशय खूप आवडला... Happy
(बाकी टेक्निकॅलिटीज मध्ये मी पूअर आहे :()
असो...

>>भेटतो कधीकाळी, त्यातही तुझे नखरे!
बातमी उगाचच पण पूर्ण गावभर होते!

वाढली महागाई, हरवले जुने पैसे
मोजके जिव्हाळे पण नेहमी हजर होते

सर्व भरजरी नाती मी लपेटली देही
नेमके मनावरचे घसरले पदर होते >>

हे तीन शेर एकदम खास आहेत. Happy

आणि देवघरापासूनची सुरूवात आवडली Happy

<<<सर्व भरजरी नाती मी लपेटली देही
नेमके मनावरचे घसरले पदर होते>>>
खास!!!

छान Happy

नचिकेत अजून एक मस्त गझल...

या इथे तिचे माझे चिमुकलेच घर होते
या इथे कधी काळी देखणे शहर होते

सर्व भरजरी नाती मी लपेटली देही
नेमके मनावरचे घसरले पदर होते

ओळ मागते काही, शब्द उमटती काही
हे असेच आताशा रोज पानभर होते

एकटाच जगलो पण, शेवटी सुखी झालो
(एकट्याच स्वप्नांचे मरणही सुकर होते) >>> हे सर्वच शेर मस्त जमलेत..

भेटतो कधीकाळी, त्यातही तुझे नखरे! >>> भेटतो कधीकाळी तेहि फक्त स्वप्नातच.. असे काहीसे सुचेल.. अजून टोकदार होईल असे वाटले ह्या बदलाने.. अर्थात एक सूट घेतली आहे...