हानामी (花見) : साकुरा

Submitted by सोकाजीरावत्रिलोकेकर on 7 September, 2011 - 07:03

हानामी (花見) : साकुरा

हानामी(花見), जपान मधे साधारण सातव्याशतकापासून चालू झालेली ही परंपरा आजही कसोशीने आणि हौसेने पाळली जाते. हाना(花)म्हाणजे साकुरा(桜、चेरी)चे फूल आणि मी(見) म्हणजे पहाणॆ. साकुराचा आलेला बहर पहायला जाणे म्हणजे हानामी. ही झाली पुस्तकी व्याख्या, पण जपानी लोक़ांची खरी व्याख्या आहे, हानामी म्हणजे मौज मजा, जत्रा, कुटुंबकबिल्यासोबत, मित्र-परिवारासोबत जीवनाचा आनंद लुटण्याचा काळ.

साकुरा

वसंत ऋतुच्या आगमानाची सुरुवात साकुराच्या बहराने होते. हा बहर एक आठवडा टिकतो अणि मग साकुराची फुले गळून पडतात, जपान मधल्या साकुराच्या झाडांना चेरीची फळॆ येत नाहीत. 

जपानी ललनांचे गाल साकुराच्या फुलांप्रमाणे गुलाबी कि साकुराच्या फुलांचा रंग जपानी ललनांच्या गालाप्रमाणे गुलाबी हे मला एक न उलगडलेले कोडे :~

साकुराचा बहर

 

 

हानामीचे वेध एक आठवड्यापसून लागतात, ऑफिच्या साकुरा लंचच्या पार्ट्या ठरून सामुदाइक साकुरा लंच साकुराच्या झाडाखाली ठरवून केला जातो.

साकुराच्या पार्क मधे पार्ट्या आयोजीत केल्या जातात. साकुरा आणि साके (お酒、जापनीज वारुणी, तीला दारू म्हणणे हे पाप समजले जाते जपानमधे) हे एक अतूट नाते आहे. साकेच्या बाटल्यांवर बाटल्या रिचवून, गाणि म्हणत, चकट्या पिटत सर्व जपानी जनता जीवाचा साकुरा करीत असतात.

लाल स्वेटरमधे मी व सौ आणि माझे दोन बछडे जीवाचा साकुरा करताना Lol

हा जपानी सदगृहस्थ साकेदेवतेला शरण जाउन, डोळयात साकुरा साठवून, बायकोच्या मांडीवर डोके ठेउन स्वर्गिय सुखात रममाण होउन गेला आहे. हीच खरी साकुरा भोगल्याची पावती आहे.
धन्य तो साकुरा, धन्य ती साके आणि धन्य तो धन्याता पावलेला जपानी. मला तर लइच हेवा वाटून राहिलाय राव Happy

बहरलेल्या साकुराचे विहंगम दृष्य

माझ्या नशिबाने जपानला रहाण्याच योग येउन हानामी याचि देही याचि डोळा पहण्याचे भाग्य लाभले. जपानी लोक़ांच्या समवेत त्यांच्या अंतर्गत गोटात जाउन हानामी अक्षरश: भोगली, साकेच्या पवित्र डोहात डुंबुन :-p
स्वर्ग जर असेल तर तो नेमका असाच असेल. 0:)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो अन वर्णन दोन्ही सुरेख. रस्त्याच्या दुतर्फा अशी फुललेली झाडे तर खास.

एक दोन टायपो खटकले ते दुरुस्त कराल का ?
कसोशीने आणि हौसेने पाली जाते. हाना(花)म्हाणजे साकुरा(桜、चेरी)चे फूल आणि मी(見) म्हणजे पहाणॆ. साकुराचा आलेला बहर पहायला जाणे म्हणजे हानामी. ही झाली पुस्तकी व्याख्या, पण जपानी लोक़ांची खरी व्याख्या आहे, हानामी म्हणजे मौज मजा, जत्रा, कुटुंबकबिल्यासोबत - मित्रपरिवारासोबत जीवनाचा आनंद लुटण्याचा काळ.

हे केव्हाचे फोटोज आहेत ? साकुराचा सिझन मार्च एन्ड, एप्रिल स्टार्ट असा असतो.
आसाकुसा किंवा ताचिकावा आहे की वेगळेच ठिकाण आहे ?

@मेधा:
धन्यवाद! चुकीची दुरूस्ती केली आहे.

@ महेश:
जुने फोटो आहेत. कसाइ रिंकाइ कोएन मधले फोटो आहेत.

सुरेख. फोटो आणि परीचय उत्तम आहेत. सगळा जल्लोष आणि उत्सव खूप छान मांडलाय आपण.

सर्वांत महत्त्वाची वाटली ती आपली फोटो टाकण्यातली कल्पकता. अतिशय वाखाणण्यासारखी! एका फुलापासून सुरूवात करून हळूहळू अधिकाधिक व्यापक होत जाणारे फोटो ... आणि सर्वांत शेवटचा वरून घेतलेला फोटो ... अतिशय उत्कृष्ट मांडणी!

माझी दाद या आपल्या कल्पकतेला.

मस्त साकुराची मस्त प्रकाशचित्रे ! त्याहुनही मस्त चित्रवर्णन !!!!!!!!!!! Happy

मस्त Happy

सोत्रि नाना,

तो माणुस (बायकोच्या मांडीवर डोके टेकलेला) माझ्यालेखी जपान डिफाइन करतो! वर्षभर नेमका अवयव फाटुस्तोवर काम करणारे जॅप्स व्यग्र चेहरे करून कामात असतात असा एकच दिवस सापडतो जो त्यांस सैल करू शकतो किंवा सैल होणे अलाऊड करतो!

हानामी!! आवडला सण पण अन त्या मागचा विचार पण