गणपती विसर्जन आणि प्रदूषण

Submitted by जागोमोहनप्यारे on 6 September, 2011 - 07:13

गणपती विसर्जन आणि प्रदूषण

आज गणपती विसर्जनाला दरवर्षीप्रमाणे नदीवर गेलो तर तिथे पोलिस आणि नगरपालिकेचे कर्मचारी उभे होते. त्यानी मूर्ती विसर्जनास प्रतिबंध केला. त्याऐवजी जवळच्या एका हिरवेगार घाण पाणी असलेल्या खंदकाचा पर्याय दिला किंवा नदीजवळ एक छोटी काहिल होती त्यात गणपती सोडायला सांगितला. निर्माल्य टाकायला वेगळी ट्रॉली होती.

हरताळका विसर्जनाच्या वेळी नदीकाठी भात, निर्माल्य, फुले आणि मूर्ती यांचा राडा-चिखल झालेला होता, म्हणून असे केले असे साम्गण्यात आले.

१. घरगुती गणपती आणि निर्माल्य विसर्जनाने फार मोठे प्रदूष्ण खरेच होते का?

२. हेच शासन कारखान्यांची प्रदूषिते नदीत जाऊ नये म्हणून काय उपाय करते?

३. हे शासनाने लोकांच्या धार्मिक प्रथेवर केलेले आक्रमण नाही काय?

४. याबाबत इतर शहरे/ गावे यात आपला काय अनुभव आहे?

५. याबाबत अनिस वाल्याना मूर्ती दान करणे योग्य होईल का?

६. याबाबतचे आणखी काही विचार असल्यास इथे मांडावेत

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमित्रमित्रा,

इथे रसायनशास्त्र तज्ञ आहेत ते प्ल ओ पॅ चे गुणधर्म साम्गतीलच .

पण साती , इब्लिस आनि मी डॉक्टर आहोत.

प्लॅ ओ पॅ मध्ये पानी घातले की ते काही वेळाने घट्ट होऊन अगदी दगड बनते. ही एक्झोथर्मिक रिअ‍ॅक्शन असुन उष्णता बाहेर पडते.

ते झाले की ते अगदी दगडच होते. कापायला कटर लागतो. या गुणद्।अर्माचा वापर करुन मूर्तीही बनवतात.

त्यानन्तर ते पाण्यात विरघळत नाही.

इतके बेसिक ज्ञान डॉक्टरानाही असते..

आजच्या परिस्थितीत घरटी एक पार्थिव गणपती असणे मला तरी योग्य वाटत नाही . केवळ दिड दिवसांकरता एवढी उठाठेव करण्यापेक्षा सऱळ एक धातूची मुर्ती ठेऊन पुजायची दरवर्षी. कित्येक जण हल्ली करतात असे.

मला नाही वाटत १०० वर्षांपुर्वीपर्यंत घरटी एक गणपती आणि मग विसर्जनाला नदीकाठी गर्दी वगैरे असेल असे. सणांचा व्यापार ही गेल्या दहा वर्षातली देण आहे.

रेसर्च रिपोर्ट मिळतो की नाही हे कळेलच.
पण डकवलेल्या मजकुराचा स्रोत हा असावा. पाच वर्षे जुना आहे.

फक्त पाच वर्षांपूर्वी गणेशमूर्तीविसर्जनाने पाणी नद्या प्रदूषित होत नाहीत असा निष्कर्ष होता, तो पाच वर्षांनी गणेशमूर्तीविसर्जनाने नद्यांमधील प्रदूषणाचे प्रमाण कमी होते असा बदललाय्/सुधारलाय.

ओ जामोप्या, सारखी संपादित करू नका बरं पोस्ट.
हिंदूजागरणसमितीसमर्थक नाही येणारेत इथे प्रतिवाद करायला आता.

मयेकर - या 'संशोधना'बद्दल धन्यवाद Happy
आणि आशुचॅम्पने दिलेल्या लिंकमधून कळलं की पूजेने गणेशमूर्तीत 'पवित्रके' (??) निर्माण होतात ती विसर्जनाबरोबर पाण्यात मिसळून पाण्यातलं प्रदूषण कमी होतं किंवा तत्सम कायतरी होतं.
रीसर्च रिपोर्ट काय इथे येत नाही. तुम्ही फार वाट बघू नका

माझ्या माहितीप्रमाणे प्लॅस्टर ऑफ पॅरीस हे जिप्सम नावाच्या एका सॉफ्ट रॉक च्या हार्डनिंग प्रॉसेस मधून (त्यातील H2O molecules 1500 degree Celsius ला काढला) तयार करतात. त्या पावडर मधे पाणी घातलं की पुन्हा जिप्सम तयार होतो. प्लॅस्टर ऑफ पॅरीस पाण्यात विरघळत नाही.

वर उल्लेख केलेल्या संस्था (खाजगी), त्यांची संकेतस्थळं वगैरे पाहिली. पण असे काही शोधनिबंध (रिसर्च पेपर्स), ते कुठे प्रकाशित (सायंटीफीक जर्नल्स ची नावं, व्हॉल्यूम्स वगैरे) झाले, त्याची माहिती, किंवा संबधित प्रयोगाचा डेटा सापडला तरी नाही.

एक मात्र खरं की, प्रचंड प्रमाणात वाढलेल्या उत्सवामुळे, कचरा, प्रदुषण खूप होतं आणी ते नियंत्रणाखाली आणणं हे मला माझ्या धर्माविरुद्ध वाटत नाही. किंबहूना ते न करणं / त्या प्रदुषणाला आणी कचर्याला हातभार लावणं मला माझ्यापुरतं धर्मविरोधी वाटतं.

केवळ दिड दिवसांकरता एवढी उठाठेव करण्यापेक्षा सऱळ एक धातूची मुर्ती ठेऊन पुजायची दरवर्षी. कित्येक जण हल्ली करतात असे. >>> आम्ही असेच करतो.

त्यापेक्षा सगळ्या सणासाठीचे पैसे बाजुला ठेवावेत.

मग आपले लाखभर पैसे + सरकारी ग्रँट वापरुन मक्का मदिना फिरुन यावे.

... जागो मोघल प्यारे.

कालच आयबीएन लोकमत वर याची चर्चा झाली.
आम्च्या मते आता धातुची मुर्ती असावी. व विसर्जन हे सुपारीचे करावे. कुठलाही उत्सव हा पर्यावरणपुरक असावा.
गणपती नुसता नावाला |
चैन पाहिजे आम्हाला ||

Pages