गणपती विसर्जन आणि प्रदूषण
आज गणपती विसर्जनाला दरवर्षीप्रमाणे नदीवर गेलो तर तिथे पोलिस आणि नगरपालिकेचे कर्मचारी उभे होते. त्यानी मूर्ती विसर्जनास प्रतिबंध केला. त्याऐवजी जवळच्या एका हिरवेगार घाण पाणी असलेल्या खंदकाचा पर्याय दिला किंवा नदीजवळ एक छोटी काहिल होती त्यात गणपती सोडायला सांगितला. निर्माल्य टाकायला वेगळी ट्रॉली होती.
हरताळका विसर्जनाच्या वेळी नदीकाठी भात, निर्माल्य, फुले आणि मूर्ती यांचा राडा-चिखल झालेला होता, म्हणून असे केले असे साम्गण्यात आले.
१. घरगुती गणपती आणि निर्माल्य विसर्जनाने फार मोठे प्रदूष्ण खरेच होते का?
२. हेच शासन कारखान्यांची प्रदूषिते नदीत जाऊ नये म्हणून काय उपाय करते?
३. हे शासनाने लोकांच्या धार्मिक प्रथेवर केलेले आक्रमण नाही काय?
४. याबाबत इतर शहरे/ गावे यात आपला काय अनुभव आहे?
५. याबाबत अनिस वाल्याना मूर्ती दान करणे योग्य होईल का?
६. याबाबतचे आणखी काही विचार असल्यास इथे मांडावेत
सबळ आणि शास्त्रीय
सबळ आणि शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे वरच्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत. जमल्यास तशाच सबळ आणि शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे खोडून काढावे. जमलंच तर हां
<<
तुम्ही असले कुठलेही पुरावे दिलेले दिसत नाहीत. केवळ स्टेटमेंट्स केलेली आहेत. त्याच प्रकारे तुम्ही खोटे बोलत आहात, असे मी स्टेटमेंट केलेले आहे.
दुसरे, वरती निवांत पाटील यांनी सांगितलेला प्रयोग कराच तुम्ही.
सर्वात महत्वाचं,
"धर्मशास्त्रा"प्रमाणे नदीतच विसर्जन करा म्हणताहात ना तुम्ही? मग कोणत्या धर्मग्रंथात प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती बनवा, व त्या रासायनिक कृत्रीम रंगांनी रंगवा, असं लिहिलंय ते देखिल संदर्भासहित लिहा इथे.
- इब्लिस आयडी पोस्ट्स -
- इब्लिस आयडी पोस्ट्स - इग्नोअर्ड -
अल्पना, इथे पोस्ट्स
अल्पना, इथे पोस्ट्स लिहिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्या धर्मग्रंथात प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती बनवा, व त्या रासायनिक कृत्रीम रंगांनी रंगवा, असं लिहिलंय ते देखिल संदर्भासहित लिहा इथे.>> +१
जेव्हा ते नियम केले गेले तेव्हा सीमित लोकसंख्या होती. पार्थिवातून साध्या मातीतून - मूर्ती करून ती परत पाण्यात विसर्जित करायची म्हणजे पार्थिवातच परत द्यायची अशी संकल्पना आहे. आता इतके सगळे संदर्भ, आसपासची परिस्थिती, कालमानानुसार बदललेली असताना, आपण घातक रासायनिक रंगांचा वापर करून मूर्ती बनवत असताना, आधीच प्रदूषित असलेल्या पाण्याच्या सीमित स्रोतात आणखी परत मूर्ती 'विसर्जित' करणं धर्मशास्त्राला खचितच अपेक्षित नव्हतं/नाही.
तशीही गणपतीची अशी दहा दिवसांची पूजा वगैरे मध्ययुगानंतर अस्तित्वात आलेल्या प्रथा आहेत. तोपर्यंत गणेश हीन देवतांमधेच मोडत होता. तेव्हा प्राचीन धर्मशास्त्रांचे इतके दाखले वगैरे देणंच मुळात फारसं सुसंगत नाही.
त्या अहवालांची शीर्षके आणि नेमकी प्रकाशनस्थळे कळली तर नेटबाहेरही आम्हाला मिळतीलच. इथल्या बर्याच लोकांना नेटव्यतिरिक्त संदर्भ शोधता येत नसले तरी अजून असे संदर्भ शोधून अभ्यास करता येईल अशा लायब्ररीज भारतात आहेत, त्यांचा अॅक्सेस मिळवणं इतकंही अवघड नाही.
धर्मशास्त्राचेही अचूक संदर्भ मिळाले तर आवडतील. धर्मशास्त्र एक नाही. त्यामुळे नक्की कुठल्या धर्मशास्त्रात कुठल्या मूर्ती विसर्जनाबद्दल काय लिहिलंय तेही जरा संदर्भासकट कळलं (निदान पुस्तक, अध्याय इ. चा क्रमांक) तर बरं होईल. का स्मृतीग्रंथांमधे आहे? कुठल्या?
ज्यांना 'इग्नोर' मारायची आहे ही पोस्ट त्यांनी खुश्शाल मारा.
मारली
मारली
संदर्भ द्यायची तयारी नसल्याने
संदर्भ द्यायची तयारी नसल्याने हे होणार हे माहित होतंच
शास्त्रीय संशोधनावर विश्वास न
शास्त्रीय संशोधनावर विश्वास न ठेवणारे संशोधक असले की असं होणारच
धर्मशास्त्रातले द्याकी
धर्मशास्त्रातले द्याकी संदर्भ. ते काही शास्त्रीय संशोधन नाहीये. राहिले ते संशोधन तर विश्वास ठेवायचा की नाही ते कळायला आधी अहवाल हातात असावे लागतात, किंवा त्यांचा अचूक संदर्भ. नुसतं हवेत बोलून काही साध्य होत नाही.
जौद्यात. तुम्हाला द्यायचे नाहीयेत ना? नका देऊ. आमचा वाचनाचा वेळ वाचला. बरं झालं
अहो ते शास्त्रिय संशोधन कुठे
अहो ते शास्त्रिय संशोधन कुठे दिसलं तर विश्वास ठेवू ना? नुसतंच शास्त्रिय संशोधन केलंय असं म्हटलं की झालं असं नसतं ना?
अहवाल काय मी खिशात घेऊन फिरत
अहवाल काय मी खिशात घेऊन फिरत नाही. हवे असतील तर त्या संस्थेत जा. इच्छा नसल्यास अजिबात वाचू नका. आमची काही हरकत नाही.
प्ल ऑ पॅ पाण्यात विरघळते
प्ल ऑ पॅ पाण्यात विरघळते ..
ऐकुन डोस्के सुन्न झाले.
इब्लिसभौ, मग आपले मित्र प्लॅस्टर कापायला करवत का हो वापरतात ? त्याना सांगा प्लॅस्टर लावलेला हात पाण्यात बुडवुन ठेवायचा. प्लॅस्टर मऊ लोण्यागत झाले की ते काढुन टाकायचे.
अवघडै
अवघडै
<शास्त्रीय संशोधनावर विश्वास
<शास्त्रीय संशोधनावर विश्वास न ठेवणारे संशोधक असले की असं होणारच >
अगोदर शास्त्रीय संशोधन कृपया दाखवा. हे इतकं महत्त्वाच्या संशोधनाचे आकडे संकेतस्थळावर का नाहीत? किंवा अगदी करंट सायन्ससारख्या का होईना, पण भारतीय जर्नलामध्ये का प्रकाशित केले नाहीत?
जरूर. वेळ मिळाला की संबंधित
जरूर. वेळ मिळाला की संबंधित संंस्थेत जाऊन रिपोर्ट मागतोच. बातमी चुकीची किंवा बरोबर असल्यास रिपोर्ट मिळाल्यावर काय ते समजेलच. पुण्यात असलात तर तुम्ही चौकशी कराल का कृपया? थँक्स.
नाही, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे
नाही, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गुणधर्म, रंगांमधली रसायनं मला नीट माहीत आहेत. त्यामुळे कुठल्यातरी संस्थेत जाऊन आकडे मागणं मला शक्य नाही. तुम्ही एखादा दावा जेव्हा करता, तेव्हा तो सिद्ध करण्याची जबाबदारीही तुमची असते.
तो दावा मी केलेला नाही.
तो दावा मी केलेला नाही. माझ्याकडे एका बातमीचे कात्रण आले होते त्यातले टॅक्स्ट इथे टाकले आहे. त्यांचा दावा चुकीचा असेल तर कात्रणासकट त्यांना पृच्छा करता येईल. संबंधित व्यक्तींचा संपर्क होत आहे का पाहतो.
अजून तुम्हालाच खात्री नाही
अजून तुम्हालाच खात्री नाही आणि इतरांशी वाद घालायला मात्रं तयार!
कृपया जशाच्या तसा मजकूर पोस्ट
कृपया जशाच्या तसा मजकूर पोस्ट करू नका.
@ साती खात्री असणे आणि
@ साती
खात्री असणे आणि खातरजमा करुन घेणे यात फरक आहे. वर चिनुक्स हे संशोधक आहेत आणि त्यांना त्यातली शास्त्रीय माहिती आहे. त्यामुळे त्यांना खात्री आहे. मी संशोधक नसल्याने मला खातरजमा करुन घ्यावे लागेल इतकेच.
@ चिनुक्स
ओक्के सर
veL zalach tar
veL zalach tar dharmashatratalya sandarbhanchi pan vat baghatey.
tya sambandhi ekdam mithachi guLani dharali geliye....
(No subject)
मिठाच्या गुळणीला 'ठो' द्यायची
मिठाच्या गुळणीला 'ठो' द्यायची वेळ आली आता
http://www.cpcb.nic.in/upload
http://www.cpcb.nic.in/upload/NewItems/NewItem_159_Guideline_for_Idol_Im...
या दुव्यावर सेंट्रल पल्यूशन कंट्रोल बोर्डानं दिलेली मार्गदर्शक तत्त्वं आहेत. यातली निदान पहिली तीन पानं कृपया वाचावी.
ही मार्गदर्शक तत्त्वं हायकोर्टाच्या आदेशानुसार केंद्र शासनानं तयार केली आहेत.
अहो जोशी, उगाच हिंदु धर्मातली
अहो जोशी, उगाच हिंदु धर्मातली प्रथा आहे म्हणून चांगली म्हणू नका.
साधा कॉमनसेन्स लावा. नुसतं गणेशविसर्जनाच्या दुसर्या दिवशी चौपाट्या, नद्या पाहिल्या तरी जाणवेल.
ग्रॉस गोष्टींकरिता पुरावा कशाला?
अमित्रजित - ही ज्या बातमीचे
अमित्रजित - ही ज्या बातमीचे कात्रण म्हणताय त्याचे तरी तपशील देता येतील का...तिकडे विचारणा करून खात्री करून घेता येईल.
(कृपया सनातन प्रभात सांगू नका)
मला आता याचा तपशील हवाच आहे...सोर्स जरा तरी कळला तर मी जाणारच आहे त्या संस्थेत...
मी इथल्या मजकुरावरून गूगल
मी इथल्या मजकुरावरून गूगल केलं, तर हा मजकूर असलेलं कात्रण सापडलं. मात्र त्यावर तारीख किंवा वृत्तपत्राचं नाव कुठेही नाही. शिवाय अनेक संकेतस्थळांवर हाच मजकूर आहे.
आणि ही नक्की किती
आणि ही नक्की किती वर्षांपूर्वीची माहीती आहे. कारण या लिंकवर एकाने प्रतिक्रियेमध्ये हाच मजकूर दिला आहे.
http://www.esakal.com/esakal/20100704/5750225671314339419.htm
आणि माझा संशयच खरा वाटतोय...
https://www.facebook.com/media/set/?set=a.708099735872205.1073741829.643...
हे ते कात्रण....आणि कुठेही नावगाव छापले नसले तरी एकदंरीत हा प्रकार सनातनवाल्यांचाच वाटतो आहे.
एक काहीतरी मजकूर नेटवर आला कि
एक काहीतरी मजकूर नेटवर आला कि पुढे लिंकांतून तोच पुरावा म्हणून दिला जातो.
कॉमनसेन्स ही गोष्टं हिरीरीन मुद्दा मांडताना बाजूला ठेवायचि गोष्टं आहे.
पीओपी विरघळत असेल तर
पीओपी विरघळत असेल तर गणेशविसर्जनाच्या दुसर्या दिवशी पुनर्विसर्जनासाठी आणि चौपाटी स्वच्छतेसाठी का जावं लागतं? समजा काही वर्षांनी विरघळत/डिकंपोझ/डिग्रेड होत असेल तरी वर्तमानात ते हानीकारकच आहे. त्यातून अजस्त्र मुर्त्या असल्या की अजूनच वाट.
मोठ्या प्रेमाने लोकांनी पूजलेला देव आणि गौर्या छिन्न-विच्छिन्न अवस्थेत किनार्यावर पहावे लागणे अत्यंत क्लेशदायक असते. जेव्हा असे किनार्यावर विखुरलेले अवयव पाहते तेव्हा एखाद्या विमान अपघातात माणसांचे अवयव विखुरलेले पहावेत इतके दु:ख होते. स्वतःच्या हाताने असे मुर्तीचे वेडेवाकडे पडलेले अवयव गोळा करुन पहा कसं वाटतं ते. महापालिकेच्या वाळूत फिरणार्या गाडीत ते जमा करताना वाटतं की हाच कालचा देव आज कचर्यासारखा जमा होतोय? नंतर महापालिका ते अवयव होडीत घालून खोल समुद्रात पुन्हा सोडते. पण ही वेळच का आणावी? निर्माल्यही विसर्जन करु नका असे परत परत सांगूनही लोकांना काही फरक पडत नाही. ते महापालिकेच्या निर्माल्य कुंभात किंवा अन्य व्यवस्थेच्या ठिकाणी आवर्जून जमा करावे. त्याचे कंपोस्ट केले गेले तरी ती निसर्गाची सेवा आहे. दुसर्या दिवशी हेऽऽ भरमसाठ निर्माल्य कुजलेल्या अवस्थेत किनार्यावर विखुरलेले असते.
खरंच श्रद्धावान असाल तर तीनवेळा डुबकी मारल्यावर मुर्ती २-३ तासात पुर्ण विरघळेल अशीच आणावी. किंवा सरळ धातूची आणून प्रतिकात्मक विसर्जन करावे. निदान आपल्या हातून तरी हा गुन्हा घडू नये ह्याची काळजी घ्यावी.
निसर्गाची हेळसांड ही देखिल देवाचीच हेळसांड आहे. काही वर्षांपुर्वीपर्यंत हा अवेअरनेस नव्हता. पण आता अवेअरनेस आला आहे आणि वाढतो आहे त्याला अश्या उलट्या बातम्यांनी खीळ बसायला नको.
ओके अब दिमाकि बत्ती जली. बाकि
ओके अब दिमाकि बत्ती जली. बाकि पर्यावरण वाल्यांनी १० वर्षात केले नसतील तेव्ढे मतपरिवर्तन ४ दिवसात झाले असणार. चला शिकलेली लोकं काहितरीच सांगतात. गणपती विसर्जन करुन कधी प्रदूषण झाले होते का? उलट त्याने झालेले प्रदूषण कमी होते. चला ते निर्माल्य तरी बाहेर कशाला टाकयच, टाका पाण्यातच आणि जरा पाणी शुध्द होउ दे.
मोठ्या प्रेमाने लोकांनी
मोठ्या प्रेमाने लोकांनी पूजलेला देव आणि गौर्या छिन्न-विच्छिन्न अवस्थेत किनार्यावर पहावे लागणे अत्यंत क्लेशदायक असते. जेव्हा असे किनार्यावर विखुरलेले अवयव पाहते तेव्हा एखाद्या विमान अपघातात माणसांचे अवयव विखुरलेले पहावेत इतके दु:ख होते.
>>
+१
बाकी सगळं जाऊ देत पण हे कित्ती कित्ती खरं आहे
शाडूची मुर्ती आनायला काय होतं लोकांना देव जाणे
Pages