स्पेशल वार्डातल्या म्हातार्या
आमच्या घरात बैठकीच्या खोलीला लागूनच बेडरूम आहे. घरात कुणी आजारी असलं की पेशंटचा मुक्काम त्याच खोलीत असतो. सध्या आमच्या म्हातारीची रवानगी त्या 'स्पेशल' वॉर्डात. दरवर्षी श्रावणात आईला दम्याचा खूप त्रास होतो. दर काही वर्षांनी त्या खोलीत मुक्काम पडेल इतका जास्त होतो. आईच्या दिमतीला बहिणी एक एक करून राहून आल्या. सध्या मावशी तिथे गेलीये. सात वर्ष देशाबाहेर व्यतीत केल्यावर तिच्या आजारपणावर ब्लॉग लिहिण्याइतका कोडगेपणा येत असावा. तर काल मावशीशी बोलत होते. ह्या दोघी बहिणी एका कॉटवर एक अशा गप्पा करत 'पडल्या' होत्या आणि मी फोन केला. आईच्या भेटीस जाता येत नाही हा सल आहेच. त्यात ह्या दोन म्हातार्यांच्या काय सुख-दु:खाच्या गोष्टी चालल्या असतील त्या ऐकायला मिळत नाहीत ह्या विचाराने कळ !!! जीव तरी कशाकशात अडकवावा माणसाने. हरिकेन येणार म्हणून दोडक्याची वेल आत आणायची होती. एक दोन नाही चांगली चार दोडकी लागलीत. गजांना घट्ट चिकटून बसलेली वेटोळी काढताना बाग आठवली. तिथे शेकड्याने घोसाळी लागली असतील. पानांच्या गच्च दाटीत लटकलेली घोसाळी शोधायची, आकडीने नेमकी ओढून काढायची. सुरुवातीला कौतुक. मग शेजारी सुद्धा कंटाळतात. शेजार्यांची संख्या पण कमी होतेय. कुणाकुणाची मुलं बाहेरगावी पडलीत नोकरी निमित्ताने. आई-वडिलांना तिकडेच बोलावून घेतात. काहींना देवाने बोलावून घेतले. आईला बरं नाही म्हटल्यावर ठुबे काकूंनी रोज भाजी-आमटी पाठवली असती. लोकरीचे गुंडे, सुया असा लवाजमा घेऊन संध्याकाळी येऊन बसल्या असत्या. आईशी गप्पा करायला. ह्या बाया सगळ्या भारी. एखादी जुनी कविता आठवत बसतात. त्यांच्या बालवाडीत शिकलेली. तेव्हाचे मास्तर बाई ह्यांच्या आठवणी काढून हळहळतात. चांभार चौकश्या, सुनांच्या कागाळ्या सहसा नाहीत. आता ठुबे काकू नाहीत. पण बाकीच्या जमतातच. त्यांच्या गप्पा ऐकण्यात पण मजा असते. त्या ऐकायला मिळत नाहीत म्हणून हळहळ !
माझा जीव तिथे आणि त्यांचा इथे. त्यांचा(?) बाळकृष्ण माझ्या ताब्यात. हा लहान होता तेव्हा मी पाच एक महिने मुक्कामी होते तिथे. सगळ्यांचा संध्याकाळचा विरंगुळा म्हणजे येऊन त्याच्याशी गप्पा(?) मारणे. ईशानने पण छान खळीदार हसून ह्या गोपींना वेड लावलं होतं. विशेषतः शेजारच्या जोशी काकूंना फारच लळा लागला ईशानचा. आई आणि काकू मिळून सारख्या ह्याच्या आठवणी काढतात आणि त्यांच्यापासून इतक्या दूर घेऊन आले बाळाला म्हणून मला दुष्ट ठरवतात. पुढच्या वेळी आला की त्याला जाऊच द्यायचं नाही असं तर त्यांचं अनेकदा ठरतं. त्यानेच लिहिलेलं पेक्षा रचलेलं एक गाणं(?) देतेय. गेल्या शनिवारी उठल्या उठल्या की-बोर्ड घेऊन आला. डॅडी त्याला आणि मला हॉस्पिटलमध्ये (कधी ? तो ३ वर्षाचा असताना. Remember when I was 3 years old... अशी सुरुवात करत अनेक आठवणी सारख्या सांगतो. त्याबद्दल नंतर कधी किंवा कधीच नाही.) सोडून गेला तेव्हाचं गाणं म्हणतो म्हणे. मग अगदी कसलेल्या गवयाच्या थाटात एकच की वाजवत काळी छप्पन्न मध्ये हे म्हटले:
Daddy left at the hospital
When me and mamma played at home
When I was a baby
Then it was getting dark
When you rock me to sleep
We sleep for a long time
Then it was a day
Daddy came back home
And We all played together !!
दीssssssss एंड !!!
त. टि.: गाण्याचा शेवट असाच लांबलचक दीssssssss म्हणत करणे बंधनकारक आहे.
कशलं गोऽऽऽऽऽऽड गाणं ग
कशलं गोऽऽऽऽऽऽड गाणं ग ते!!!!
म्हातार्यांबद्दाल अगदी अगदी. आमची म्हातारी पण एकटीच असते घरी. आजारी पडली तर सांगतही नाही. मग मीच फोनवर आवाज बदललेला ऐकून खोदून खोदून विचारून घ्यायचं. आणि मग 'आता कशी आहेस? औषधं घे' म्हणायचं![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
(No subject)
(No subject)
आमच्या घरातल्या व नात्यातल्या
परवा आईच्या बॅचच्या मैतरणींचे गटग झाले तर अग्गदी अश्शाच प्रकारे 'श्रावणमासी', 'बाळ जातो दूर देशा', 'लाडकी बाहुली' वगैरे (शाळेतल्या) चालीत घडाघडा म्हणून झाले, गेलेल्या बाईंच्या आठवणींनी हळहळून झाले.
लेकाचे गाणे क्रिएटिव्ह आहे अगदी!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ईशानचं गाणं आवडलं
ईशानचं गाणं आवडलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद स_सा म्हणजे फदि का ?
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स_सा म्हणजे फदि का ?
पोस्ट उडवण्यात आहे आहे
पोस्ट उडवण्यात आहे आहे
काळी छपन्न >> आईची तब्येत
काळी छपन्न >>![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आईची तब्येत बरी आहे का आता ?
आता पुष्कळ बरी आहे. देसाई,
आता पुष्कळ बरी आहे.
देसाई, का बरं ? मला नाही कळले.
का बरं ? मला नाही कळले. <<<
का बरं ? मला नाही कळले. <<< हे माझं वैयक्तिक मत आहे.. पण 'आई' ही नेहमीच 'आई' असते. तिला 'म्हातारी' म्हणणे मला पटत नाही.. पण मला न पटणे तुमच्यावर बिंबवणे सुध्दा चुकीचेच तेव्हा पोस्ट उडवतो आहे ...
आईला बोलीभाषेत/गावाकडे
आईला बोलीभाषेत/गावाकडे म्हातारी म्हणतात म्हणून तसा उल्लेख आहे. बबनच्या वडलांनी पहिल्यांदा 'बाबां'ना 'तुझा म्हातारा' संबोधलेलं तेव्हा माझी अशीच प्रतिक्रिया होती. मी अगदी तिरिमिरीत आईला त्यांचे 'नाव' सांगितले होते तेव्हा आईने त्यामागचे कारण सांगितले होते.
सिंडे गाणं कसलं गोड आहे ईशान
सिंडे गाणं कसलं गोड आहे ईशान चं.
आई ची काळजी असतेच. काही झालं तर पत्ता पण नाही लागू देत. म्हणे तुला लांब बसून काळजी कशाला?
छान आहे सिडरेला. पण आटोपतं
छान आहे सिडरेला. पण आटोपतं घेतलय का?
स्पेशल वार्ड चा १ आणि इशान च्या गाण्याच्या स्टोरी चा १ असे २ पोस्ट्स हवे होते.
(No subject)
आईला बोलीभाषेत/गावाकडे
आईला बोलीभाषेत/गावाकडे म्हातारी म्हणतात <<< मीही हे ऐकलं/ पाहिलं आहे. अगदी प्रेमाने 'माझा म्हातारा' /'माझी म्हातारी' वगैरे म्हणणारे. पण अजून पटत नाही, काय करू?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बाकी तुझा पेशल निशेध.. कारण नंतर सांगीन![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्त आहे.
मस्त आहे.
भारी गाणं
भारी गाणं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा! कविता करणारे बाळकृष्ण
वा! कविता करणारे बाळकृष्ण भलतेच गोड आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चान्गल लिहीलय! स्वतःच्या
चान्गल लिहीलय! स्वतःच्या आयुष्यात देखिल डोकावुन बघावेसे वाटावे इतपत मोटीव्हेशन आहे यात!
) रुखरुख लागणार नाही]
[पण हे मनोगत वा स्फुट अशा स्वरुपातच घ्यावे लागेल कारण मग शीर्षक अन एकन्दरीत गोषावरा यान्चा मेळ बसत नाही याची (कायदेशीर वा चिकित्सक समिक्षाखोर
>>>पण अजून पटत नाही, काय
>>>पण अजून पटत नाही, काय कर>>><<< पटवुन घ्या!
खर तर मलाही पटत नाही, प्रेमाने असो वा रागाने, पण तसे म्हणणे प्रशस्त्/संयुक्तिक/सांसदीय/सभ्य वाटत नाही.
मात्र अधिक विचार करता असे जाणवुन येते की ठराविक वयानन्तर तोन्डावर काय की पाठीमागून काय, स्वतःच्या वयस्कतेचे भान आपल्याला नाही आले तरी बाकिच्यान्ना आलेले अस्ते! व ते निरनिराळ्या ठिकाणी / प्रसन्गात, त्यातल्या त्यात सभ्य भाषेत्/परंपरेत दाखवुन देतच असतात. असे दाखविणे हे देखिल मी उपकारकारक मानतो. मग प्रश्न केवळ शब्दान्चाच उरतो, जसे की जे नियमित वापरात असतात, सवईचे झालेले असतात, वापरुन वापरुन इतके गुळगुळीत झालेले असतात की मनाच्या नाजुक त्वचेवर त्याचे ओरखडे उमटत नाहीत टोचत नाहीत, त्या त्या शब्दान्ना आम्ही सभ्य मानुन चालवुन घेतो. अन इथेच भौगोलिक/सांस्कृतिक दरी जाणवुन येते.
म्हातारा वा म्हातारी असे संबोधणे हे आम्ही कायम हिटाईयुक्तच ऐकले असेल तर आम्हाला साहजिकच ते पटणार नाही. पण ग्रामिण संस्कृतीमधे हे सर्रास वापरले जाणारे संबोधन आहे.
पटत नसेल तर मग असा विचार करा की "थेरडा / थेरडी" हे संबोधन कसे वाटते? ते तर वापरत नाहीना सहजासहजी कोणी? ते तर सर्वदूर रागातच वापरले जाते ना? मग त्यापेक्षा म्हातारा/म्हातारी त्यातल्यात्यात चान्गले नाही का?
असो.
गोड गाणं!!! सिंडे.. आवडला
गोड गाणं!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सिंडे.. आवडला लेख!!
माझा जीव तिथे आणि त्यांचा
माझा जीव तिथे आणि त्यांचा इथे>> हे अगदी खरे. अंतरंगातली एक हळवी बाजू व्यक्त झाली आहे. गाणे पण गोड, तरीही सर्व लेखावर एक विषण्णतेची छाया आहे. उद्या मी आईला घेउन इकडे येत आहे तेव्हा तिची तिच्या मैत्रिणी, शेजारणींपासून ताटातूट होइल ते जाणवते आहे. लेख वाचल्यावर जास्तच.
शीर्षक अन एकन्दरीत गोषावरा
शीर्षक अन एकन्दरीत गोषावरा यान्चा मेळ बसत नाही >>>> अशी रुखरुख वगैरे मला अजिबात नाही.
बाकी सर्वांना धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडले
आवडले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दोन किस्से एकत्र लिहिलेस की
दोन किस्से एकत्र लिहिलेस की गं. दोन्ही मस्त आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
म्हातारी हा शब्द खटके एकेकाळी. हल्ली खटकत नाही.
सिंडरेला लेख अतिशय
सिंडरेला लेख अतिशय चांगला.
नगर जिल्ह्यात म्हातारा / म्हातारी संबोधन हे एक लाडक संबोधन आहे.
मी माझ्या दोन वर्श्याच्या मुलाला माझ्यागावी घेऊन गेलो होतो. तेव्हा सगळेजण माझ्याबद्द्ल बोलताना तुझा म्हातारा असेच विचारायचे.
(No subject)
माझा जीव तिथे आणि त्यांचा
माझा जीव तिथे आणि त्यांचा इथे.>>> एका वाक्यात खूप काही!