कपिलदेव यांना भारतरत्न देण्यात यावे.
भारताच्या क्रिकेटला ख-या अर्थाने नवं रूप देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते कपिलदेव यांनीच. कपिल भारतिय संघाय येण्यापूर्वी भारतीय संघ सपाटून मार खात असे. सीरीज ड्रॉ करणे म्हणजे मोठ काम समजलं जाई. बॅटसमन फक्त वैयक्तिक विक्रमांसाठी खेळत. संघ जिंकावा म्हणून कधीच कुणी प्रयत्न करीत नसायचं.
बॉलिंग तरी कशी ? एक दोन ओव्हर कुणीही टाकायचं कि लगेच स्पिन अॅटॅक सुरू. या तिकडीच्या जोरावर मायदेशात काही सामने जिंकले कि पब्लिक खूष. पण परदेशात गेले कि हे वाघ मार खाऊन येत. ऑलआउट ३६ असा विक्रमही त्यांनी गाजवला. कुठलंच टीम स्पिरीट नसलेला हा संघ . कपिल आल्यानंतर वेगवान बॉलिंग भारताला मिळाली. पाच पाच विकेटस काढून त्याने ऑपोझिशन चं कंबरडं मोडायला सुरूवात केली. लवकरच त्याची दहशत बसली.
पण आपले विक्रमवीर त्याच्या कामगिरीचा फायदा घेऊ शकत नसत. म्हणून मग त्याने बॅटींग मधेही चमक दाखवायला सुरूवात केली. तळाच्या बॅटसमनना घेऊन खेळायला सुरूवात केली. या सर्वांवर कळस झाला तो १९८३च्या वर्ल्डकप मधे. दुस-या वर्ल्डकपमधे भारताने भाग घेतला होता. सुनील गावसकरने ६० ओव्हर्स खेळून आउट न होता ४६ धावा जमवल्या पण टीम स्पर्धेतून आउट झाली.
१९८३ला कपिलच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या टीममधे जिंकण्याचा विश्वास कपिलने निर्माण केला. स्वतः तर कामगिरी चांगली केलीच पण के श्रीकांत, मदनलाल, रॉजर बिन्नी, मोहिंदर अमरनाथ या प्लेयर्सकडूनही चांगला खेळ करून घेतला. लिडिंग फ्रॉम द फ्रंट हे सिद्ध करताना झिंबावेविरूद्ध त्याने केलेली १७५ नाबाद ची खेळी आज माइलस्टोन आहे. त्या दिवशी कपिल मैदानात आला तेव्हा सीनयर्सने पुन्हा नांगी टाकली होती. पाच आउट १७ असा स्कोरबोर्ड. मॅच हरल्यास मुंबईचा रस्ता धरायचा. अंगात १०५ ताप अशा परिस्थितीत त्याणे सैद किरमाणीला साथीला घेत ती मॅच एकहाती जिंकून दिली.
त्या वर्ल्डकप नंतर भारतीय क्रिकेटचे दिवस बदलले. संघाकडे आदराने पाहिलं जाऊ लागलं. मानसिकता बदलली. देशातही क्रिकेटचं वारं जोमाने वाहू लागल. एक दिवसीय सामने लोकप्रिय झाले. सामने पहायला लोक येऊ लागले. टीव्हीचे हक्क मिळाले. जाहीरातींच उत्पन्न वाढलं. खेळाडूंना पैसे मिळू लागले. त्याआधी खेळाडू रेल्वे किंवा बँकेत नोकरी करून क्रिकेट खेळत.
भारतिय क्रिकेटला एकीकडे संजीवनी देतानाच कपिलने ४०० बळींचा टप्पाही पार केला. त्याने भारतीय बॉलिंगचा गाडा आपल्या खांद्यावर एकट्याने ओढला. त्यातूनही निम्मे सामने भारतातच झाले. अशा पाटा पीचेसवरही त्याने विकेटस काढल्या हे विशेष. त्याला दिवसभर दिवसभर बॉलिंग करूनही थकवा, दुखापती कधीही सतावत नसत. दुखापतीमुळे तो खेळला नाही अस झालच नाही.
फक्त एकदा पुण्याच्या सामन्यात सुनील गावसकरने त्याला खेळू दिल नाही त्यामुळे सलग सामने खेळण्याचा त्याचा विक्रम झाला नाही. असले विक्रम नाहीतर फालतू असतात. कपिल देशासाठी आणि संघासाठी खेळणा-यातला होता. स्वार्थी खेळाडू नव्हता.
या अशा खेळाडूला भारतरत्न द्यायची मागणी क्का झाली नाही याच आश्चर्य वाटतं. त्या वेळी कपिलच्या कोट्यावधी चाहत्यांना भारतरत्नची मागणी करायची असते हेच माहीत नव्हत. क्रिकेट खेळणा-यांना भारतरत्न दिल्याचं ऐकिवात नव्हतच मग त्यांना कसं समजणार ते ?
पण ज्यांनी त्याचा खेळाचा आनंद लुटला अशा सुशिक्षितांनी अशी मागणी त्या वेळी का केली नसावी ? कि त्याच्या या जिगरी खेळाचा आनंद त्यांना झाला नसावा ? कि त्याचं देशासाठी झोकून देणं त्यांना पसंत नसावं ? काही कळत नाही. जे झालं ते झाल.
आता भारत सरकार भारत रत्नच्या अटी शिथील करणार आहे अस ऐकलय. मग आता तरी ही मागणी का करू नये ? ज्यांना ज्यांना कपिलच्या खेळाचा अभिमान आहे , देशप्रेम आहे ते या मागणीला पाठिंबा देतीलच. ज्यांना देशाबद्दल काहीच वाटत नाही त्यांच्यावर जबरदस्ती करता येत नाही पण त्यांनी विरोध करू नये हे आवाहन आहे.
- मथुरादास दावणगिरी
मथुरादास - निषेध जज्ज करत
मथुरादास - निषेध जज्ज करत नाहीत, सामान्य माणसे करतात.
असो, मी या धाग्यावर येथे थांबतो. फार तर नुसता हसेन.
बेफिकीर, बेफकिर, सानी , चातक
बेफिकीर, बेफकिर, सानी , चातक टाटा ! बाय ! काळजी घ्या !!
कपिलदेव, सचिन का आणि कोणी.
कपिलदेव, सचिन का आणि कोणी. मंदार, दावणगिरी आपल्यासारख्या सामान्यांना विचारतय कोण ? जिथे अण्णा हजारेंना वाटाण्याच्या अक्षता दिल्या जातात तिथे सामान्य नागरिकाला कोण विचारतो ?
का उगाच व्यर्थ वाद करत आहात ?
चंप्या ते मथुराकाकांसाठी
चंप्या ते मथुराकाकांसाठी होते.....आवांतर प्रतिसादची माफी मागीतली.
आता सुवांतर प्रतिसाद...
मी आजच कळकळची विनंती करतो करतो संबंधीतांना की, भारतरत्नला परत सडुन यावे त्याला जिथुन पकडुन आणले आहे तिथे.
सडुन का सोडून ??
सडुन का सोडून ??
गप रे चातका.... खूप गंमत
गप रे चातका....
खूप गंमत झाली...चला मी तरी कल्टी...
भारतरत्न पुरस्काराची एक प्रतिष्ठा आहे...त्यामुळे काकांची गंमत करण्याच्या नादात त्या पुरस्काराचा अनादर होऊ नये आणि माझ्याकडून झालेल्या प्रमादाबद्दल माफी...
ओके "सोडुन"! खुश रहो बच्चा.
ओके "सोडुन"!
खुश रहो बच्चा.
माझे तर म्हणणे आहे की सोनिया
माझे तर म्हणणे आहे की सोनिया गांधी, राहुल गांधी आणी शरद पवार यांना भारतरत्न देण्यात यावे.
अरे वा इकडे खुप मज्जा चालू
अरे वा इकडे खुप मज्जा चालू आहे.
पुरस्काराचा अनादर होऊ नये >>
पुरस्काराचा अनादर होऊ नये >> बरोबर आहे पण राहीले तरी काय
काल सचीन होता आज कपील्...रत्न तोच.
माझे तर म्हणणे आहे की सोनिया
माझे तर म्हणणे आहे की सोनिया गांधी, राहुल गांधी आणी शरद पवार यांना भारतरत्न देण्यात यावे.>>>>>>> शरद पवारांच तर माहीत नाही पण बाकी दोघाना मिळेल आज ना उद्या.
शरद पवारांच तर माहीत नाही पण
शरद पवारांच तर माहीत नाही पण बाकी दोघाना मिळेल आज ना उद्या. >>> ते घेतील म्हणा घरातच तर असतो.
भयंकर विनोदी झालाय धागा...
भयंकर विनोदी झालाय धागा... सगळ्या प्रतिक्रिया copy करून विनोदी साहित्यात टाका (मूळ लेख टाकायची गरज नाही... फक्त "कपिलदेव यांना भारतरत्न देण्यात यावे." एवढ्यातच लेखाचं रसग्रहण होतं).
एकाच धाग्यात क्रिकेट, जातीधर्म, देशप्रेम, आरक्षण... उद्या काय करणार?!
सॅम चल बाय.... पुन्हा
सॅम
चल बाय....
पुन्हा तेच..
आप्रबमा.
भारत रत्न ची यादी वाचली .
भारत रत्न ची यादी वाचली . कपिल, सुनिल, सचिन, ध्यानचंद, अमीताभ, हे पण हवेत.
areeeee ...... I MISSSS
areeeee ...... I MISSSS THAT.....
अरे बापरे! खूप दिवसांनी एवढा
अरे बापरे! खूप दिवसांनी एवढा हसलो. दुपारी मी एक पोस्ट टाकून गेलो आणि आता बघितलं तर धागा जबरदस्त विनोदी झालेला आहे.
>>> आता आली ना घाण समोर. अरे मास्तु-या ! किती घाण रे तुझ्या मनात. कपिलदेव यांना भारतरत्न द्यायचा प्रस्ताव आला कि ती घाण उचंबळून बाहेर आली. मलाही बघायचय तू किती घाणेरडं लिहू शकतोस. लिहीच तू . त्याशिवाय आणखी किती घाण आहे हे कसं कळणार ?
अरे मथुराडास, सगळ्यांनाच तुझ्यासारखं स्वच्छ, सुंदर, चांगलं, विचारी इ. लिहायला कसं जमणार? तू, मी लिहिलेली घाण वाचू नकोस, नाहीतर पस्तावशील.
>>> तुला कपिलदेव म्हणजे कोण ते तरी माहीती आहे का ? आजचे अनेक विक्रमवीर ज्यांच्या कष्टाचं फळ खातात ते कपिलदेव ! आधुनिक भारतीय क्रिकेटचे पितामह !
नाही बाबा. कोण हा कपिलदेव? काय करतो हा?
>>> त्यांच्याबद्दलचा सगळा द्वेष तुझ्या या पोस्टमधून बाहेर उफाळून आला आणि त्याचबरोबर सगळा जातीय द्वेषही ! सुधार रे ! वेळ गेलेली नाही.
वेळ केव्हाच निघून गेलेली आहे. आमच्यात सुधारणा होणे अशक्य आहे.
>>> हा आमचा ओरिजिनल आय डी आहे. आणि माबोवरच्या घटना मला मागच्या जन्मातल्याप्रमाणे आठवत आहेत. आम्ही स्वतःचा उल्लेख कधी कधी आदरार्थी करतो.
हा मथुराडास रावणगिरी मागच्या जन्मात मधुकर या नावाने मोकाट सुटला होता. आयडी निर्माण होऊन अजून १२ तास सुध्दा झाले नाहीत आणि हा इतक्यात मोकाट सुटला आहे. समोर दिसेल त्याला डासाप्रमाणे चावतो आहे. बहुतेक मागच्या जन्मातले (अव)गुण घेऊन आलेला दिसतोय.
कपिलदेव निखंज यांना भारतरत्न
कपिलदेव निखंज यांना भारतरत्न देण्याचा विचार अत्यंत स्तुत्य आहे, पण पुन्हा क्रिकेट खेळा साठी भारत रत्न देण्याची प्रथा भारतात नाही आहे. भारत रत्न देण्याबाबत काही निकषे आहेत त्या मधे क्रिकेट किंवा क्रिडा प्रकार बसतच नाही. खेळा मधे दैदिप्यमान कार्यासाठी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार आहेत.
कपिलदेव यांनी भारतिय क्रिकेट मधे खर्या अर्थाने जान आणली. १९८३ विश्वचषकामधे ५ बाद १७ असा धावफलक असतांना नाबाद १७५ ची आजरामर खेळी मला आजही आठवते.
भारतीय संघात मुंबैचं वर्चस्व
भारतीय संघात मुंबैचं वर्चस्व असतानाही कपिल हा माझा सर्वात आवडता खेळाडू होता व आहे. जिद्दीने खेळतानाही कसलीही आढ्यता न बाळगता मैदानावरच्या प्रत्येक क्षणाचा तो मनसोक्त आनंद घ्यायचा, हे त्याचं वैशिष्ठ्य मला खूप भावायचं. आयसीएल नंतर त्याची जी आत्यंतिक मानहानी झाली [ व होत आहे ] त्याविषयीं कुणीही विशेष आवाज उठवल्याचं आठवत नाही ; आतां 'भारतरत्न'च्या वादात ओढून कांहीशा रांगड्या पण अत्यंत प्रतिभावान व खिलाडूवृत्तीच्या या महान खेळाडूच्या जखमेवर मीठ चोळूं नये असं मला वाटतं.
अर्थात, नुसती गंमत म्हणूनच जर ही चर्चा असेल, तर मात्र त्यांत मी मीठाचा खडा टाकल्याबद्दल क्षमस्व.
आतां 'भारतरत्न'च्या वादात
आतां 'भारतरत्न'च्या वादात ओढून कांहीशा रांगड्या पण अत्यंत प्रतिभावान व खिलाडूवृत्तीच्या या महान खेळाडूच्या जखमेवर मीठ चोळूं नये असं मला वाटतं.
--- अनुमोदन.
ही भारतरत्नची फॅक्ट्री कुठे
ही भारतरत्नची फॅक्ट्री कुठे आहे? एक किलोभर घेउन ठेवावेत अशी इच्छा आहे!!!!
<< ही भारतरत्नची फॅक्ट्री
<< ही भारतरत्नची फॅक्ट्री कुठे आहे >> कांहींच्या मतें ही फॅक्ट्री नसून लॉटरी आहे तर कांहींना चर्चा रंगवायला ढोसायची ही 'कंट्री' आहे, असं वाटत असावं !!
>>आयसीएल नंतर त्याची जी
>>आयसीएल नंतर त्याची जी आत्यंतिक मानहानी झाली [ व होत आहे ] त्याविषयीं कुणीही विशेष आवाज उठवल्याचं आठवत नाही ;
डोंबल. तेव्हा तो मानभावीपणे म्हणाला होता, "आयसीएल काय किंवा आणखी काय, क्रिकेटची सेवा कशीही करता येते"
तो सोयिस्कररित्या हे विसरला की त्याला बी.सी.सी.आय. ने जेव्हा खेळपट्टी समितीचा अध्यक्ष केला होता,
तेव्हा त्याने त्या संदर्भात काहीही काम केलेलं नव्हतं. तेव्हा आयसीएल नंतर त्याची जी मानहानी झाली, त्याला तोच दोषी आहे.
मुंबईकर खेळाडूंचा दुस्वास करणे, जवागल श्रीनाथसारख्या त्यावेळच्या नवोदिताला मार्गदर्शन करायच्या ऐवजी त्याला चेंडूला लकाकी कशी आणतात ते माहित नाही अशी जाहीर चेष्टा करणे, असे अनेक पराक्रम सुद्धा ह्या साहेबांच्या नावावर आहेत.
भारतरत्न म्हणजे काय भावोजींची
भारतरत्न म्हणजे काय भावोजींची पैठणी आहे ? कोणालाहि द्यायला.
सचिनला पण नको कपीलला पण नको. त्याना दैदिप्यमान कार्यासाठी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार द्या नाहीतर
एखादा नवीन सर्वोच्च क्रिडा पुरस्कार स्थापुन तो द्या,
नाही तर उद्या धोनीला परमवीर चक्र द्यायची मागणी होईल.
देशप्रेमी देशप्रेमी, मी आजच
देशप्रेमी देशप्रेमी,
मी आजच कपिलदेव यांना भारतरत्न मिळावे म्हणून आदरणीय श्रीमती गांधी यांना फॅक्स केला आहे. या मजकुराची प्रत आदरणीय प्रतिभा पाटील, अध्यक्षा, भारत सरकार आणि आदरणीय प्रधानमंत्री श्री. मनमोहनसिंह यांना देखील त्या त्या पत्त्यावर पाठवला आहे.
To:
Ms Sonia Gandhi
President AICC
INDIAN NATIONAL CONGRESS
24, Akbar Road,
New Delhi – 110011 , INDIA
TEL : 91-11-23019080
FAX : 91-11-23017047
Copy to :
Pratibhatai Patil
President of India
(presidentofindia@rb.nic.in)
Your Excellency,
I request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Kapil Dev, awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian.
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him , it is totally another level of respect.
India's legendery batsman Mr Sunil Gavaskar has dedicated one chapter in his book Sunny Days. He has mentioned that he learnt many things from Kapi Dev. He is the original God of cricket. You may pay attention to the word Dev which is in his name.
I think you as the Head of the Ruling Party should become proactive & strongly press the Government to award this Highest Civic Honour of India to Kapil.
Warmest regards,
Mathuradas Davangiri
Baner, Pune
BCC To:
Mr Man Mohan Singh,
Prime Minister of India
(pmosb@pmo.nic.in)
कपिलच्या तुलनेत कमी कर्तृत्व
कपिलच्या तुलनेत कमी कर्तृत्व असलेल्या व कपिलच्या तथाकथित चुकांच्या तुलनेत अनेक गंभीर चुका केलेल्या काही जणांची नावे आतापर्यंत "भारतरत्न" च्या मागणीच्या यादीत आहेत. जर "भारतरत्न" साठी एखादी सर्व चौसष्ट कलागुणसंपन्न व्यक्ती हवी असेल, तर, माझ्या मते, अशी व्यक्ती सापडणे अवघड आहे. कपिलद्वेषामुळे ज्यांना सचिनला "भारतरत्न" द्यायला विरोध करायचा आहे त्यांना तो करू देत. पण कपिलच्या तथाकथित चुकांमुळे तो ह्या पुरस्कारास पात्र नाही असे म्हणणे योग्य वाटत नाही.
जे जे इथे कपिलद्वेष्टे नाहीत असं म्हणताहेत ते वाचून आनंद झाला. पण कपिलला भारतरत्न द्यायला विरोध करणारे इतर काही कपिलद्वेष्टे इथे त्यांची संदर्भहीन टिंगलटवाळी करत आहेत.
>>> India's legendery batsman
>>> India's legendery batsman Mr Sunil Gavaskar has dedicated one chapter in his book Sunny Days.
गावसकरने सनी डेज लिहिले तेव्हा (१९७६ साली) तेव्हा कपिलदेव शाळकरी खेळाडू होता. त्याचे पदार्पण ऑक्टोबर १९७८ मध्ये झाले. १९७६ मध्ये सुनीलला तर सोडा, कपिल देव, हरयानातही कोणाला माहित नव्हता.
>>> I think you as the Head of the Ruling Party should become proactive
राष्ट्रपती हे पद हेड ऑफ द नेशन असते, हेड ऑफ रूलिंग पार्टी नाही.
मास्तुरे इथच तर तुम्ही चुकता
मास्तुरे इथच तर तुम्ही चुकता ना
कुठली मागणी क्उठ करायची ही साधी गोष्ट माहीत नाही आणि म्हणे कपिल कोण ?
मी सांगतो कपिल कोण ते ?
आकाशात ज्याप्रमाणे सूर्य तळपतो आणि प्रत्येक सेन्सिबल माणसाला तो दिसतो तसा भारतीय क्रिकेटच्या आकाशात स्वयंतेजाने तळपनारा एकमेव तारा म्हणजे कपिलदेव. ज्याला कुठल्याही चमच्यांची, ब्रिगेडच गरज नाही. पण डोळ्यांना आणि अकलेला एडस झालेल्या माणसाला ते दिसेलच असं नाही.
तुम्ही आणखी लिहा. आताशी एक टक्काच घाण बाहेर आली आहे. तुम्ही जितकं घाणेरडं लिहायच तितकं लिहू शकता. आम्ही तुम्हाला काय उत्तर द्यायचं हे त्या पात्रतेवरून ठरवू.
मास्तुरे Head of the Ruling
मास्तुरे Head of the Ruling Party बरोबर आहे. पत्र सोनीयाजींना आहे. म.दा. ना सरकारी process बरोवर माहित आहे. जर सोनीयाजींना वाटले तर पार्थिव पटेलला पण भारतरत्न मीळेल
कपिलद्वेष ??????????? कपिल
कपिलद्वेष ???????????
कपिल काय कसाब आहे ,त्याचा द्वेष करायला.
उगाच कायपन....
Pages