कपिलदेव यांना भारतरत्न देण्यात यावे.
भारताच्या क्रिकेटला ख-या अर्थाने नवं रूप देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते कपिलदेव यांनीच. कपिल भारतिय संघाय येण्यापूर्वी भारतीय संघ सपाटून मार खात असे. सीरीज ड्रॉ करणे म्हणजे मोठ काम समजलं जाई. बॅटसमन फक्त वैयक्तिक विक्रमांसाठी खेळत. संघ जिंकावा म्हणून कधीच कुणी प्रयत्न करीत नसायचं.
बॉलिंग तरी कशी ? एक दोन ओव्हर कुणीही टाकायचं कि लगेच स्पिन अॅटॅक सुरू. या तिकडीच्या जोरावर मायदेशात काही सामने जिंकले कि पब्लिक खूष. पण परदेशात गेले कि हे वाघ मार खाऊन येत. ऑलआउट ३६ असा विक्रमही त्यांनी गाजवला. कुठलंच टीम स्पिरीट नसलेला हा संघ . कपिल आल्यानंतर वेगवान बॉलिंग भारताला मिळाली. पाच पाच विकेटस काढून त्याने ऑपोझिशन चं कंबरडं मोडायला सुरूवात केली. लवकरच त्याची दहशत बसली.
पण आपले विक्रमवीर त्याच्या कामगिरीचा फायदा घेऊ शकत नसत. म्हणून मग त्याने बॅटींग मधेही चमक दाखवायला सुरूवात केली. तळाच्या बॅटसमनना घेऊन खेळायला सुरूवात केली. या सर्वांवर कळस झाला तो १९८३च्या वर्ल्डकप मधे. दुस-या वर्ल्डकपमधे भारताने भाग घेतला होता. सुनील गावसकरने ६० ओव्हर्स खेळून आउट न होता ४६ धावा जमवल्या पण टीम स्पर्धेतून आउट झाली.
१९८३ला कपिलच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या टीममधे जिंकण्याचा विश्वास कपिलने निर्माण केला. स्वतः तर कामगिरी चांगली केलीच पण के श्रीकांत, मदनलाल, रॉजर बिन्नी, मोहिंदर अमरनाथ या प्लेयर्सकडूनही चांगला खेळ करून घेतला. लिडिंग फ्रॉम द फ्रंट हे सिद्ध करताना झिंबावेविरूद्ध त्याने केलेली १७५ नाबाद ची खेळी आज माइलस्टोन आहे. त्या दिवशी कपिल मैदानात आला तेव्हा सीनयर्सने पुन्हा नांगी टाकली होती. पाच आउट १७ असा स्कोरबोर्ड. मॅच हरल्यास मुंबईचा रस्ता धरायचा. अंगात १०५ ताप अशा परिस्थितीत त्याणे सैद किरमाणीला साथीला घेत ती मॅच एकहाती जिंकून दिली.
त्या वर्ल्डकप नंतर भारतीय क्रिकेटचे दिवस बदलले. संघाकडे आदराने पाहिलं जाऊ लागलं. मानसिकता बदलली. देशातही क्रिकेटचं वारं जोमाने वाहू लागल. एक दिवसीय सामने लोकप्रिय झाले. सामने पहायला लोक येऊ लागले. टीव्हीचे हक्क मिळाले. जाहीरातींच उत्पन्न वाढलं. खेळाडूंना पैसे मिळू लागले. त्याआधी खेळाडू रेल्वे किंवा बँकेत नोकरी करून क्रिकेट खेळत.
भारतिय क्रिकेटला एकीकडे संजीवनी देतानाच कपिलने ४०० बळींचा टप्पाही पार केला. त्याने भारतीय बॉलिंगचा गाडा आपल्या खांद्यावर एकट्याने ओढला. त्यातूनही निम्मे सामने भारतातच झाले. अशा पाटा पीचेसवरही त्याने विकेटस काढल्या हे विशेष. त्याला दिवसभर दिवसभर बॉलिंग करूनही थकवा, दुखापती कधीही सतावत नसत. दुखापतीमुळे तो खेळला नाही अस झालच नाही.
फक्त एकदा पुण्याच्या सामन्यात सुनील गावसकरने त्याला खेळू दिल नाही त्यामुळे सलग सामने खेळण्याचा त्याचा विक्रम झाला नाही. असले विक्रम नाहीतर फालतू असतात. कपिल देशासाठी आणि संघासाठी खेळणा-यातला होता. स्वार्थी खेळाडू नव्हता.
या अशा खेळाडूला भारतरत्न द्यायची मागणी क्का झाली नाही याच आश्चर्य वाटतं. त्या वेळी कपिलच्या कोट्यावधी चाहत्यांना भारतरत्नची मागणी करायची असते हेच माहीत नव्हत. क्रिकेट खेळणा-यांना भारतरत्न दिल्याचं ऐकिवात नव्हतच मग त्यांना कसं समजणार ते ?
पण ज्यांनी त्याचा खेळाचा आनंद लुटला अशा सुशिक्षितांनी अशी मागणी त्या वेळी का केली नसावी ? कि त्याच्या या जिगरी खेळाचा आनंद त्यांना झाला नसावा ? कि त्याचं देशासाठी झोकून देणं त्यांना पसंत नसावं ? काही कळत नाही. जे झालं ते झाल.
आता भारत सरकार भारत रत्नच्या अटी शिथील करणार आहे अस ऐकलय. मग आता तरी ही मागणी का करू नये ? ज्यांना ज्यांना कपिलच्या खेळाचा अभिमान आहे , देशप्रेम आहे ते या मागणीला पाठिंबा देतीलच. ज्यांना देशाबद्दल काहीच वाटत नाही त्यांच्यावर जबरदस्ती करता येत नाही पण त्यांनी विरोध करू नये हे आवाहन आहे.
- मथुरादास दावणगिरी
.
.
मंदार पार्थिव पटेल आणि
मंदार
पार्थिव पटेल आणि कपिलदेव यांची तुलना करून तुम्ही काय घेतलय हे सांगायची तरी गरज आहे का ? तुमची उतरली कि मी सांगेना हा मी काय करणारे ते
(No subject)
अरे हे महाशय देशप्रेम,
अरे हे महाशय देशप्रेम, देशद्रोह, राष्ट्रीय धर्म वगैरे सुसाट सुटले आहेत.
ही पूर्वापार परंपरा आहे हो. मी फक्त त्या परंपरांचा पाईक होण्याचा क्षीण प्रयत्न करतोय
मथुरादास, आपण फेणी + व्होडका
मथुरादास, आपण फेणी + व्होडका + देशी दारू
एकदम घेऊ शकता आणि इथे टाईपही करु शकता याची खात्री झाली.>>>
>>पार्थिव पटेल आणि कपिलदेव
>>पार्थिव पटेल आणि कपिलदेव यांची तुलना करून तुम्ही काय घेतलय हे सांगायची तरी गरज आहे का ?
पुन्हा तेच. मी कुठे तूलना केलीये? त्यालाही द्या असं म्हटलं फक्त.
असो. आता कपिलदेवचं काय करायचं? धागा तर काढला आहात, आता पुढाकारही घ्या.
>>असो. आता कपिलदेवचं काय
>>असो. आता कपिलदेवचं काय करायचं? धागा तर काढला आहात, आता पुढाकारही घ्या.
ते सोडून बोलताय तुम्ही सगळं. मुद्द्यावर या.
कपिलदेवच्या जोडीला पार्थिव
कपिलदेवच्या जोडीला पार्थिव पटेलचं नाव ? याआधी कधी नाही आठवलं ते ? काय म्हणता ?
तुमची उतरली कि सगळया पोस्तस पुन्हा वाचा. तोपर्यंत जयहिंद !
मुद्द्यावर या.
मुद्द्यावर या.
असो. आता कपिलदेवचं काय
असो. आता कपिलदेवचं काय करायचं? धागा तर काढला आहात, आता पुढाकारही घ्या.<<<<<<<
देशप्रेम, देशद्रोह, राष्ट्रीय धर्म सध्यातरी त्यांची गाडी यावर गेलेय.
माझे तर म्हणणे आहे, किमान एक
माझे तर म्हणणे आहे, किमान एक डझनभर पुरस्कार गणूलाच मिळावेत...नुसते भारतरत्न काय घेऊन बसलात.
त्याचे अवांतर काम इतके प्रचंड आहे की ते पुरस्कारही कमी पडावेत>>>
नको हो नको. तुम्हि जास्त लायक आहात त्यासाठी. मी प्रयत्न करिन तुम्हाला पुरस्कार मिळण्यासाठी. तुम्हि फक्त पुरस्काराचे नाव सांगा.
अरे काय चाल्लय... मी उद्याच
अरे काय चाल्लय...
मी उद्याच घोषणा करतो....."भारतरत्न ज्याचा आहे त्याला परत देउन टाका म्हणुन" नको ती लफडी....एक 'कोंबडी' नी हजार चोमडी.
कपिलदेवचं बोला राव आता.
कपिलदेवचं बोला राव आता.
या चातकराव, आपले स्वागत या
या चातकराव, आपले स्वागत या भरगच्च धाग्यावर!
मी आता एक स्पर्धा जाहीर
मी आता एक स्पर्धा जाहीर करतो...मूळ धाग्याशी संबधित पोस्ट शोधून दाखवणार्यास
फेणी + व्होडका + देशी दारू , माझ्यातर्फे
याचबरोबर, बेफकिर आणि बेफिकीर यांच्यातील सूक्ष्म आणि स्थूल फरक ओळखून दाखवणार्यास ही हे बक्षीस लागू (श्रीराम नव्हे ) राहील
तुमची उतरली कि सगळया पोस्तस
तुमची उतरली कि सगळया पोस्तस पुन्हा वाचा. तोपर्यंत जयहिंद ! <<<<<<<
मग तुम्ही आता चढवयाला जाताय का?
(No subject)
बाकी काही म्हणा, धागा हीट
बाकी काही म्हणा, धागा हीट होणे याला म्हणतात.
>>याचबरोबर, बेफकिर आणि
>>याचबरोबर, बेफकिर आणि बेफिकीर यांच्यातील सूक्ष्म आणि स्थूल फरक ओळखून दाखवणार्यास ही हे बक्षीस लागू (श्रीराम नव्हे ) राहील
रीमा विसरलात
बाकी दावणगिरी यांना कपिलदेवमधे रस नसून नुसताच वाद घालण्यात रस असल्याने मी त्यांना फक्त कार्ल्याचा रस देणार आहे. (कारण सद्ध्या कार्ली स्वस्त आहेत असे ऐकतो.)
चला मी जातो घरी. चँपाशु, मला सांग रे काय झालं नंतर ते. कुठल्या रत्नाला भारत मुकला वगैरे.
मला इथं सगळ्यांचं अंतरंग
मला इथं सगळ्यांचं अंतरंग समजल्यामुळं आता ते प्रयत्न मी स्वतःच्या हिंमतीवर करीन. इथं कुणाला सांगायची गरज नाहि. पार्थिव पटेलला कपिलबरोबर पुरस्कार देणा-यांनी आता जो बूंदसे गई ते लक्षात ठेवून मोठ्या गर्जना करायचं थाबवावं. फार हास्यास्पद होत चाललय ते.
मला वादविवाद आवडत नाहीत म्हणून टाटा ! फार वाईट वाटल> एका पात्र नावासाठी मागणी काय केली लोक डायरेक्ट जातीपातीपर्यंत पोहोचले
चंप्या कॉकटेल बेक्कार
चंप्या कॉकटेल बेक्कार झालाय..
याचबरोबर, बेफकिर आणि बेफिकीर यांच्यातील सूक्ष्म आणि स्थूल फरक ओळखून दाखवणार्यास ही हे बक्षीस लागू (श्रीराम नव्हे ) राहील
>>> बेफकिर आणि बेफिकीर
मथुरादास, तुमची कळकळ
मथुरादास, तुमची कळकळ पोहोचली.... कपिलदेव यांना भारतरत्न देण्यात यावे अशी तुमची इच्छा आहे आणि लोकांनी त्याला सहमतीदर्शक प्रतिसाद लिहावे अशीही तुमची इच्छा आहे, हे समजले. आता हा विषय इथेच वाद आणि चर्चेच्या रुपात रंगून नंतर हा धागा कुठेतरी मागे जाऊन बसेल. त्याआधी तुम्ही जर मंदारने सुचवल्याप्रमाणे एक पत्रक (petition) तयार केलेत आणि तुमच्याच म्हणण्याप्रमाणे मा. प्रतिभा पाटील यांच्या पत्त्यावर ते पोहोचेल अशी व्यवस्था केलीत, तर त्याचा कदाचित काही उपयोग होऊ शकतो. लोकांना पत्र लिहायला सांगण्यापेक्षा हा सोपा उपाय आहे आणि (बहुदा) परिणामकारकही.
तुम्हाला पेटिशन कसे बनवायचे, हे माहिती नसल्यास थोडा गुगल सर्च केल्यावर समजू शकेल. मला एक संकेतस्थळ सापडले आहे, जिथे मोफत असे पत्रक काढणे शक्य आहे. http://www.petitiononline.com/create_petition.html हेच ते संकेतस्थळ. आता असे पत्रक बनवतांना तुम्हाला काही अडचण आल्यास मायबोलीवर विचारु शकता. ज्यांनी असे पत्रक आधी बनवले आहे, ते तुम्हाला या बाबतीत मार्गदर्शन करु शकतील.
मंद्या खोटारड्या आप्रबमा.
मंद्या खोटारड्या
आप्रबमा.
काका तुम्ही फारच सेंटी होता
काका तुम्ही फारच सेंटी होता बुवा....
सोशल साईटवर असे राहून कसे चालेल...इथल्या काही आयडींचा आदर्श घ्या...निब्बर कातडीयुक्त, निगरगट्ट वगैरे म्हणतोय मी...
बघा पटतंय का
खालील पोस्टचा निषेध!
खालील पोस्टचा निषेध! (मथुरादास यांच्या)
==============================
या इच्छुकांमध्ये १५ टक्के अनुसूचित जाती, ७.५० टक्के अनुसूचित जमाती, २७ टक्के इतर मागासवर्गीय, १० टक्के अल्पसंख्याक व ३३.३३ टक्के महिला उमेदवारांचा समावेश असावा.
ये ब्बात !
आता आली ना घाण समोर. अरे मास्तु-या ! किती घाण रे तुझ्या मनात. कपिलदेव यांना भारतरत्न द्यायचा प्रस्ताव आला कि ती घाण उचंबळून बाहेर आली. मलाही बघायचय तू किती घाणेरडं लिहू शकतोस. लिहीच तू . त्याशिवाय आणखी किती घाण आहे हे कसं कळणार ? तुला कपिलदेव म्हणजे कोण ते तरी माहीती आहे का ? आजचे अनेक विक्रमवीर ज्यांच्या कष्टाचं फळ खातात ते कपिलदेव ! आधुनिक भारतीय क्रिकेटचे पितामह ! त्यांच्याबद्दलचा सगळा द्वेष तुझ्या या पोस्टमधून बाहेर उफाळून आला आणि त्याचबरोबर सगळा जातीय द्वेषही ! सुधार रे ! वेळ गेलेली नाही.
==================================
-'बेफिकीर'!
आणि सानी यांना सर्वोत्तम
आणि सानी यांना सर्वोत्तम संबंधित पोस्ट पुरस्कार जाहीर होत आहे...
अर्थात तो मीच ओळखल्यामुळे त्याचे बक्षीस मीच काही फरक करून घशाखाली घालीन
आप्रबमा. चातका, म्हणजे रे काय
आप्रबमा.
चातका, म्हणजे रे काय
:हाहा:
बेफिकीर जज्ज पण झालात का ?
बेफिकीर
जज्ज पण झालात का ? मासुरेला मग कुठला पुरस्कार देणार त्या पोस्टबद्दल ?
मास्तुरेच्या त्या पोस्टला योग्य तीच ट्रीटमेंट दिली आहे.
जज्ज पण झालात का ? मासुरेला
जज्ज पण झालात का ? मासुरेला मग कुठला पुरस्कार देणार त्या पोस्टबद्दल >>>>>>>
मासुरेला ? ? ?
Pages