मोहमद रफी - विसरलेले सोनेरी पान

Submitted by मनीषा- on 29 July, 2011 - 12:40

मोहमद रफी या नावाची महत्ता सांगायची खरे तर गरज नाही. पण तरीही....

सध्याचे टीवी वरचे संगीत विषयक कार्यक्रम, किंवा स्पर्धा, इंटरनेट व इतर माध्यमामदले चित्रपट संगीत विषयी लेख या सर्व मध्ये रफी साहेबांचा अनुल्लेख आढळून येतो.
इंटरनेट वरती शोध घेतला तर रफी साहेबांविषयीची माहिती , लेख अथवा कौतुक इतर गायक गायिकांच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणात आढळते.
लता मंगेशकर गानसरस्वती आहेत. आशा भोसले रसिकांच्या अतिशय आवडत्या गायिका आहेत. किशोरकुमार यांना तरुणाच्या मनात विशेष स्थान आहे. ह्या सगळ्यांचा पुन्हा पुन्हा उल्लेख, त्यांची महती अनेकदा वृत्त माध्यमातून ऐकू येते. पण तितक्या प्रमाणात रफी साहेबांची थोरवी गायलेली आढळत नाही.

विरोधाभास असा की ४-५ वाहिन्यांवर जी जुनी हिन्दि गाणी लावतात त्यात मोहम्मद रफींना पर्याय नसतो. कार मधे, बस मधे , मोबाईल मधे भरून गाणी ऐकणार्‍यांमधे रफीसाहेबांचे अगणित चाहते सापडतात. असे रफीसाहेब आपल्यामधे अजूनही सर्वार्थाने जिवंत असताना, माध्यमामधे त्यांना अशी वागणूक का असावी?

खरे तर मोहमद रफी खेरीज हिंदी चित्रपट संगीत अपूर्ण आहे. पण तरीही भारताच्या या सर्वश्रेष्ठ पार्श्वगायकाच्या वाट्याला अशी उपेक्षा का येत असावी? तुम्हाला काय वाटते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा किस्सा खरा वाटत नाही. कारण रफीसाहेबांचा एक नियम होता. कोणत्याही संगीतकाराकडून ते पहिल्यांदा गाताना त्या चित्रपटाचे मानधन घेत नसत. नवीन संगीतकारांकडे ते आवर्जून गात असत.

लता असतानाच अनुराधा पौडवाल या एक दशकभर क्रमांक एकच्या गायोका होत्या.>>>>
अनुराधा मलाही खूप आवडते. तिने गायला सुरवात केली तेव्हापासून मी ऐकतेय तिला. तेव्हा दूरदर्शनवर आरोही नावाचा कार्यक्रम असायचा त्यात सगळे गायक हजेरी लावायचे. अनुराधाला खूप ऐकलंय त्या कार्यक्रमात. तेव्हा ती चित्रपटात प्रसिद्ध झाली नव्हती. आम्ही तिच्या आवाजाची खूप चर्चा करायचो. तेव्हाच्या लता-आशापेक्षा वेगळा होता तिचा आवाज.

पण ती एक नंबर गायिका झाली त्यात गुलशनकुमारचा मोठा वाटा आहे. ऐंशीच्या दशकात एक काळ असा आला की टी सिरीजच्या घोडदौडीपुढे एचएमव्ही मागे पडली. टी सिरीजवर बहुतेक चित्रपटांची गाणी प्रदर्शित व्हायला लागली आणि त्यात गुलशनकुमारने गायिका अनुराधाच असणार ही अट घातली. नाईलाजाने सगळ्यांना तिलाच गाणी द्यावी लागली. शिरीष कणेकरांनी गुलशनकुमारचा 'समस्त स्त्री सुरांचा नाश करणारा' म्हणत निषेध केलेला वाचलेला. नेमके शब्द आता आठवत नाहीयेत. अनुराधासमोर अलका यादनिक तेवढी उभी होती. लताने अंग काढून घेतले होते आणि आशाचे मार्केट डाऊन झाले होते. जतीन-ललितसोबत खिलाडीमध्ये आशा परत गायली. तिने खूप कौतुक केले होते दोघांचे व आभारही मानले होते. नंतर रंगीला आला आणि आशा परत चमकायला लागली.

हा किस्सा खरा वाटत नाही>>>

मी गेल्याच आठवड्यात जे ऐकले ते लिहिले. ही मुलाखत 20 वर्षांपुर्वीची असावी.

गायिकानी जेवढे राजकारण केले असेल नसेल त्याहीपेक्षा जास्त वाईट राजकारण संगीत कंपन्यांनी केलेले आहे. कित्येक उमेदीच्या कलावंतांना यांनी कायमचे झोपवलेले आहे. पण याबद्दल कोणीही बोलत नाही. संगीतक्षेत्रातील राजकारण म्हटले की सगळ्याना फक्त लताच आठवते.

साधनाताई , मी त्या मुलाखतीतला किस्साच खरा वाटत नाही असे म्हणाले. कुणाची मुलाखत होती हे सांगू शकाल का ?

कारण जितेंद्राने इंडीयन आयडॉल आणि रफी साहेबांच्या एका कार्यक्रमात किस्सा सांगितला आहे कि दीदार -ए यार या त्याने बनवलेल्या चित्रपटाच्या गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यावर त्याने किशोरकुमार आणि रफी यांच्या पैशांची पाकीटे पाठवून दिली. किशोरकुमार त्या वेळी २०,००० रूपये एका गाण्याचे घेत. म्हणून २०,००० रू ची दोन पाकिटे पाठवून दिली. थोड्या वेळाने रफींचा मेहुणा १६००० रूपये परत करायला आला. पाठोपाठ रफीसाहेबांच फोन आला. ते पंजाबीत म्हणाले कि जित्ते बहोत पैसा आ गया क्या ? मै एक गाने के ४००० रूपये लेता हूं ये दुनिया जानती है.

दीदार ए यार प्रदर्शित झाला १९८२ साली. रफीसाहेब गेले १९८० साली. म्हणजे जाण्याच्या आधी कधीतरी रेकॉर्डिंग झाले असावे. तर मग १६००० रू फीस कधी झाली त्यांची ? मला वाटते हाच किस्सा ऐकण्यात काहीतरी फरक झाला असावा किंवा सांगण्यात.

इथे पाहू \ ऐकू शकता हा किस्सा
https://www.youtube.com/watch?v=VJictqVe-ZM

रानभूली, मी 10 मिनिटांच्या कार प्रवासात जातायेता सतत रेडिओ ऐकते, त्यामुळे मुलाखत असेल तर कित्येकदा कोणाची मुलाखत सुरू आहे हे कळत नाही. आणि वि.भा. वर ताज्या मुलाखती नसतात तर जुन्या मुलाखती पुनःप्रक्षेपित असतात.
त्या कितीही जुन्या असू शकतात.

काल सुरेय्याबद्दल एक कार्यक्रम होता. तिच्या मुलाखतीचा एक तुकडा ऐकवला, त्यात तिचा आवाज प्रचंड तरुण वाटत होता, म्हणजे किमान 50 वर्षांपूर्वीची तरी मुलाखत असावी.

Pages