फरहान अख्तर फॅन क्लब
दिल चाहता है.
लक्ष्य.
रॉक ऑन!!
कार्तिक कॉलिंग कार्तिक.
जिंदगी ना मिलेगी दोबारा.
अॅण्ड काऊंटिंग...
रायटर
नॉट सो बॅड सिंगर
नॉट सो बॅड डान्सर
डायलॉग रायटर
डायरेक्टर
अॅण्ड काऊंटिंग...
'दिल चाहता है' पहायला गेलो ते आमिर खानमुळे. नुकताच त्याचा 'लगान' पाहिला होता. तो प्रचंड आवडला होता. 'दिल चाहता है' पाहिला आणि 'लगान' विसरलो. तुलना करण्याची चुक अजिबात करत नाहीये. पण सगळ्यांना 'लगान' विसरून 'डी. सी. एच.' च्या प्रेमात पाडणारा फरहान अख्तर नव्या दमाचा, आत्मविश्वास असलेला वाटला.
'लक्ष्य' पडला तेव्हा फार वाईट वाटलं. मला चित्रपटाच्या यशापयशाचं गणित समजत नाही, समीक्षाही जमत नाही. पण चांगलं की वाईट ते (*माझ्यापुरतं) समजतं. मला लक्ष्य आवडला.
रॉक ऑन बघायला गेलो, तेव्हा मात्र 'वेळ जात नाही म्हणून बापाकडचा पैसा वापरून चित्रपट काढला असेल' अशा अत्यंत चुकीच्या समजूतीने गेलो. चित्रपट पाहण्यापेक्षा मित्रांच्या टवाळक्या करत चित्रपट वाया घालवला. नंतर घरी वीसीडीवर पाहताना चूक समजली. रॉक ऑन ची गाणी थिएटर मधे ऐकण्याची संधी घालवली होती.
त्या विषयावर विचार करण्याची एक संधी घालवली होती.
कार्तिक कॉलिंग कार्तिक.
पैसा टाकला की सगळ्या सुंदर सुंदर गोष्टी मिळतात. सुंदर हिरॉईन्स, छान लोकेशन्स. ३००० स्वे. फूटचे फ्लॅट्स ज्यात एकटीच हिरॉईन राहते. जिथल्या सोफ्यावर चुकुनही बसावे असे वाटू नये असे बुटके पण उंची सोफे.
असलं सगळं असतं फरहान अख्तरच्या चित्रपटात. हे खोटं करून दाखवलं.
जिंदगी ना मिलेगी दोबारा.
लोकेशन्स. डायलॉग्स. स्टोरी, कास्ट.
कॅरॅक्टर्सकडून अचूक निभावून घेतलेले काम. चित्रपटाचं सोनं.
आणि आपण विचार करत बाहेर... गाडीवरुन घरी परतताना डोक्यात एकच विचार :
'खरंच साऽलाऽऽ ... जिंदगी ना मिलेगी दोबारा...'
एका बाजूला "बडे बाप के फक्त 'बाप के नाम पे इण्डस्ट्रीमे टिके हुए' बच्चे" आणि दुसर्या बाजुला
~ फरहान अख्तर ~
जिंदगी ना मिलेगी दोबाराची
जिंदगी ना मिलेगी दोबाराची व्हर्जिनल डीव्हीडी/सिडी आली म्हने.. डोळा मारा कोनी घेतलीय कावोऽ???>>
नाही. खर्च कश्श्शाला. मी शोकेस मधे आला तेव्हा पिच्चर टेप करून घेतला. ह्रितिक अन अभय पण फुकटात. लैला पण. अरे प्रीटी ने फरहान भाईची मुलाखत घेतली होती तीपण टेप केली. छान होती. फरहान आता डॉन च्या प्रोमो मध्ये बिजी आहे.
अरे मला तो आवडायला लागला,
अरे मला तो आवडायला लागला, त्या पिक्चर चे नाव नाही आठवत आहे रे
काय, कोंकणा, डिंपल पण होती...
तो 'लक बाय चान्स.' आज किंवा
तो 'लक बाय चान्स.'
आज किंवा उद्या आहे जिंदगी ना मिलेगी दोबारा टीव्हीवर.
अमिताभच्या डॉनपुढे फरहानच्या डॉनला कितीही नावं ठेवली, तरी मला फरहानच्या डॉनचा ट्विस्टही आवडला होता. तोही बिलिव्हेबल वाटतो. अमिताभचा डॉन एका जागी, आणि हा पूर्ण वेगळा सिनेमा. तुलना नकोच. ह्यातली पात्रनिवडही भारी आहे. बोमन इराणी तर पर्फेक्ट. त्याच्या कॉमेडी भूमिकांमधून मोठाच टॅन्जन्ट. डॉन १च्या वेळी शाहरूख बरा होता. आता मात्र सोसावं लागेल त्याला!
आता मात्र सोसावं लागेल
आता मात्र सोसावं लागेल त्याला!>> मोदक. शाहरूक आता प्रीझर्वड दिसतो. इतके वर्षे सिगरेट प्यायल्याचे दुष्परिणाम चेहर्यावर दिसत आहेत. त्यामानाने सल्लु आमीर टुकीत आहेत अजूनही.
हो सोसावा लागेल. इतकंच काय पण
हो सोसावा लागेल. इतकंच काय पण रावणचा भलामोठा तोटा देखील सोसावा लागेल त्याला.
मामी, ते अभयसोबत फरहान आणि हृतिक फ्रीमध्ये- असं म्हणा.
इतकंच काय पण रावणचा भलामोठा
इतकंच काय पण रावणचा भलामोठा तोटा देखील सोसावा लागेल त्याला.>> मला पण अगदी तसंच वाट्तंय.
गल्ली चुकलंय शारुक. आणि आता रोम्यांटिक राज रोहित प्रेम करायचं वय गेलं पळून. विनोद येत नाही. अॅक्षन ला बाडी नाही. सेन्सिटिव रोल त्याला कोण देइल. करेगा क्या प्राणी?
इतके वर्षे सिगरेट प्यायल्याचे
इतके वर्षे सिगरेट प्यायल्याचे दुष्परिणाम चेहर्यावर दिसत आहेत.
फक्त सिगरेटमुळे नाही तर ओम शांती... च्या २ सेकंदाच्या दृष्यासाठी त्याने ६ पॅक अॅब्स बनवायचा जो प्रयत्न केला त्यानंतर त्याचा असा अवतार झालाय... रावणचे काय होणार देव जाणे, मला उगीच आता वाईट बोलायचे नाहीय.
रावण पिक्चर तूफान हिट होइल.
रावण पिक्चर तूफान हिट होइल. आफ्टर ऑल, रजनीसर पण आहेत त्यामधे.

जिनामिदो आज रात्री नऊ वाजता स्टार प्लसवर.
ए शारूकबद्दल इकडे नको
ए शारूकबद्दल इकडे नको बोलायला.
फरहानमुळे शारूकही सुसह्य होतो, असे म्हणा फारतर
जिनामिदो आज रात्री नऊ वाजता
जिनामिदो आज रात्री नऊ वाजता स्टार प्लसवर.
बघणार बघणार. तशी मी कधी नव्हे ती डिविडी पण विकत घेतलीय याची तरी टिवीवरही बघणार नी पुनः पुनःप्रत्ययाचा आनंद घेणार ....
मेकिंग ची डिविडीही सोबत आहे. मस्त माहिती आहे त्यात.
अश्विनीमामी करेगा क्या
अश्विनीमामी

करेगा क्या प्राणी?
फरहान अख्तरचा क्लबच वेगळा!
फरहान अख्तरचा क्लबच वेगळा!
http://m.loksatta.com/manoranja-news/farhan-akhtar-a-different-club-of-1...
त्यामानाने सल्लु आमीर टुकीत
त्यामानाने सल्लु आमीर टुकीत आहेत अजूनही.>>>>>>>>>> शाहरुख सर्वांदेखत पितो...आणि सल्लु नाही म्हणुन तो स्मोकर आहे हे खुप कमी लोकांना माहित आहे........
फक्त सिगरेटमुळे नाही तर ओम शांती... च्या २ सेकंदाच्या दृष्यासाठी त्याने ६ पॅक अॅब्स बनवायचा जो प्रयत्न केला त्यानंतर त्याचा असा अवतार झाला>>>>>>>>> +१०००
मी पण इथे तो शबानाचा मुलगा
मी पण इथे



तो शबानाचा मुलगा नाही हे मला आत्ता कळालं
इथे फालतू कमेण्ट्स नसत्या तर बरच काही नवीन कळालं असतं फरहान बद्दल
त्या कमेण्ट्समुळे सगळं वाचायची इच्छा होईना
भाग मिल्खा भाग मध्ये तर तो ऑसमेस्ट आहे
इथे फालतू कमेण्ट्स नसत्या तर
इथे फालतू कमेण्ट्स नसत्या तर बरच काही नवीन कळालं असतं फरहान बद्दल.
त्या कमेण्ट्समुळे सगळं वाचायची इच्छा होईना >>>>>>>>>>> रिया, अगदी अगदी.
इथे फालतू कमेण्ट्स नसत्या तर
इथे फालतू कमेण्ट्स नसत्या तर बरच काही नवीन कळालं असतं फरहान बद्दल.
त्या कमेण्ट्समुळे सगळं वाचायची इच्छा होईना >>>>>>>==> १११११
सुरुवातीच्या काही कॉमेण्ट्स कसल्या अतिप्रचंड टुकार आहेत!
भाग मिल्खा भाग मध्ये फरहान अक्षरशः जगलाय ते पात्रं.
असो, बंदर क्या जाने अद्रक का स्वाद!
Pages