Submitted by छाया देसाई on 13 July, 2011 - 20:20
पुन्हा आर्त गणवेश गांजला
पुन्हा एकदा देश गांजला
पुन्हा धावते मन मन रडले
जपत जपत आवेश गांजला
सहिष्णू मने स्तब्ध जाहली
पुन्हा गाढला द्वेश गांजला
खचत पिचत उन्मत्त चालिला
प्रगत प्रगत उन्मेश गांजला
पुन्हा स्मशानी गेली प्रेते
चिता ,चित्त ,चित्तेश गांजला
जगी सुन्न पाऊल खूणही
कळवळुनी परदेश गांजला
पुन्हा एकदा देश गांजला
पुन्हा एकदा देश गांजला
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
खरच! चांगली आहे गझल.
खरच!
चांगली आहे गझल.
खरय अगदी गझल छान आहे.
खरय अगदी
गझल छान आहे.
भावनांची तीव्रता पोचली. फार
भावनांची तीव्रता पोचली.
फार वाईट प्रकार घडलेला आहे.
छायातै मनापासून लिहीलयस तू.
छायातै
मनापासून लिहीलयस तू. तळमळ पोहोचली..
छायाताई... डोळ्यात पाणी
छायाताई... डोळ्यात पाणी आले.....
खरच काय होणार या आपल्या प्रिय देशाचं
अगदी खरे आहे
अगदी खरे आहे
भावना पोहचल्या..........!
भावना पोहचल्या..........!
भा. पो.
भा. पो.
सर्वच शेर आवडलेत.
सर्वच शेर आवडलेत.