पुन्हा एकदा देश गांजला

Submitted by छाया देसाई on 13 July, 2011 - 20:20

पुन्हा आर्त गणवेश गांजला
पुन्हा एकदा देश गांजला

पुन्हा धावते मन मन रडले
जपत जपत आवेश गांजला

सहिष्णू मने स्तब्ध जाहली
पुन्हा गाढला द्वेश गांजला

खचत पिचत उन्मत्त चालिला
प्रगत प्रगत उन्मेश गांजला

पुन्हा स्मशानी गेली प्रेते
चिता ,चित्त ,चित्तेश गांजला

जगी सुन्न पाऊल खूणही
कळवळुनी परदेश गांजला

पुन्हा एकदा देश गांजला
पुन्हा एकदा देश गांजला

गुलमोहर: 
शब्दखुणा: