Submitted by निवडुंग on 4 July, 2011 - 11:57
काल रात्री तुफान पाऊस पडला इथे.
खिडकीच्या आतून,
तावदानावरचे ओघळलेले थेंब पाहताना,
काहीतरी जळत होतं खोलवर.
तुझ्यासारखं चिंब भिजावसं वाटलं अनेकदा.
पण त्याची राख होऊ द्यायला,
धजावलं नाही मन.
नकळत खिडकी उघडली तेव्हा,
दोन चार थेंब,
ओघळलेच हातावर.
कसल्याश्या तंद्रीतून चटकन भानावर आणत.
नाही म्हटलं तरी,
खिडकी बंद करणं,
एवढंच हातात होतं मग.
तो मात्र कोसळत राहिला रात्रभर..
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
तो मात्र कोसळत राहिला
तो मात्र कोसळत राहिला रात्रभर.... >> म्हं.....आवडली रचना, निवडुंगा!
आवड्ली...
आवड्ली...
<नाही म्हटलं तरी, खिडकी बंद
<नाही म्हटलं तरी,
खिडकी बंद करणं,
एवढंच हातात होतं मग.>
ह्म्म... मन असाहय्य झालं की, हातात उरतील तेवढ्याच गोष्टी मूकपणे कराव्या लागतात!
पटलं... मस्त
चातक, ममता, खूप धन्यवाद..
चातक, ममता,
खूप धन्यवाद..
बागे,
फंडे?!
आवडली.
आवडली.
क्रांति.. खूप धन्यवाद..
क्रांति..
खूप धन्यवाद..