क्रिकेट - वेस्टिंडीज वि. भारत - ६ ते १० जुलै २०११ - तिसरी कसोटी

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:13

Jul 6-10, 2011 (10:00 local | 14:00 GMT | 10:00 EDT | 09:00 CDT | 07:00 PDT)

West Indies v India 2011

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो खेळ जिंकून काय मिळणार? शेवटी सगळी माया आहे हो!! भारतीय संस्कृती. अभिमान बाळगा - इतर कुणि विचारत नाहीत, आपणच अभिमान बाळगला पाहिजे.

भारतीय संस्कृती. अभिमान बाळगा -
>>>
अभिमान असायला हवा, पण जे भारतात संस्कृतीचे धिंडवडे निघत आहे त्यावरुन भारतात संस्कृती आहे त्या विश्वासाला तडा जातो. उदा. शेतवस्तीवरील अमानुष हल्ले, रेल्वे वरील दरोडे.

विषय भरकटला. हरकत नाही.

भारत इंग्लंड सामने बघायला मजाच येइल.

<< शेवटच्या डावात साधारण ४ च्या सरासरीने कसोटी सामना जिंकल्याची ऊ.दा. फार कमी आहेत. >> योगजी, हे खरं असलं तरी तरी तें मुख्यतः ६०-७० षटकांत २५०- ३००चं लक्ष्य असेल तर योग्य ठरेल, ४७ षटकांत १७५ ला कांहीसं बचावात्मकच किंवा नकारात्मेकच म्हणावं लागेल; अर्थात तें साध्य करणं सोपं नव्हतं कारण काल वे.इंडीजचे जलद गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करत होते. पण जागतिक क्र. १ वरील संघाकडून [ पूर्ण ताकदीने खेळत नसूनही] यापेक्षां अधिक जिगरीचा खेळ, निदान प्रयत्न तरी, अपेक्षित होता, हे खरं !!

>>> तेव्हा ईं विरुध्द मला तरी भारताचे पारडे जड वाटते.

सध्या इंग्लंडचा संघ जबरदस्त फॉर्मात आहे. आपण इंग्लंडविरूध्द एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकू, पण, कसोटी मालिका हरू असा माझा अंदाज आहे.

>>> << शेवटच्या डावात साधारण ४ च्या सरासरीने कसोटी सामना जिंकल्याची ऊ.दा. फार कमी आहेत. >> योगजी, हे खरं असलं तरी तरी तें मुख्यतः ६०-७० षटकांत २५०- ३००चं लक्ष्य असेल तर योग्य ठरेल, ४७ षटकांत १७५ ला कांहीसं बचावात्मकच किंवा नकारात्मेकच म्हणावं लागेल;

बरोबर. १९ षटकांत १ बाद ६४ अशी भक्कम स्थिती असताना, उर्वरित २८ षटकांत फक्त ११६ धावा करण्याचा अजिबात प्रयत्न न करणे व पराभवाच्या भीतिने संथ खेळून सामना अनिर्णित ठेवण्यात धन्यता मानणे, ही प्रथम क्रमांकाच्या संघाकरता नामुष्कीची गोष्ट आहे.

ही प्रथम क्रमांकाच्या संघाकरता
रानटी लोकांसारखे वागून प्रथम क्रमांक कशात? रानटीपणात?
आणि इतरांना नष्ट केल्यावर प्रथम क्रमांक कुणापुढे मिरवायचा? त्यांना दया दाखवण्याइतके आपण थोर आहोत, याचा अभिमान बाळगा!

त्यातून यजमान संघाची विटंबना? अजिबात बरोबर नाही! मग आपल्यात नि आक्रमकांत फरक काय? आपण मोठे का? आपली संस्कृती उच्च का? आपले नैतिक बळ जास्त का?

आता इंग्लंडमधे याहूनहि विनम्रपणा दाखवतील, सर्व सामने त्यांनाच उदारपणे जिंकू देतील.

>>कसोटी अनिर्णीत राहिली ती भारताच्या गचाळ फिल्डींगमुळे.
संजय मांजरेकर नंतर तुम्हीच Happy

झक्की,
बा.फ. चुकलाय तुमचा... आवरा...

मास्तुरे,
>>१९ षटकांत १ बाद ६४ अशी भक्कम स्थिती असताना, उर्वरित २८ षटकांत फक्त ११६ धावा करण्याचा अजिबात प्रयत्न न करणे
कुणाच्या जोरावर? विजय, मुकुंद, आणि द्रविड ? का रैना आणि धोणी ने ओपनिंग ला यायला हवे होते असे तुम्हाला म्हणायचे आहे? २८ षटकात ११६ धावा इतकं साधं एकदिवसीय सामन्या सारखं समीकरण कसोटी मध्ये असत नाही हे काही मी सांगायची गरज आहे का मास्तुरे? Happy
>>व पराभवाच्या भीतिने संथ खेळून सामना अनिर्णित ठेवण्यात धन्यता मानणे, ही प्रथम क्रमांकाच्या संघाकरता नामुष्कीची गोष्ट आहे.
हा निश्कर्ष कशावरून काढलात? आपण नुकतेच म्हणजे गेल्याच वर्षी क्र. १ चे झालो आहोत. तूर्तास तो क्र. टिकवणे हे मला महत्वाचे वाटते. त्यासाठी अवाजवी धोका न पत्करता प्रसंगी बचावात्मक खेळ केला तर बिघडले कुठे? बचाव करायलाही तितकेच कसब लागते ना- का ते कुणीही सोम्या गोम्या करू शकतो? आपला संघ आता कंगारू थाटात ईतर देशांना पार धूळ चारत सर्व सामने मालिका जिंकेल वगैरे असा एकंदरीत अपेक्षांचा सूर सर्वत्र दिसतोय. आपल्या संघाच्या मर्यादा आणि मानसिअकता वेगळी आहे. ती नेमकी ओळखूनच आणि त्यानुसार डावपेच आखूनच धोणी ने आपल्याला अनेक मालिका-विजय प्राप्त करून दिले आहेत ही सर्वात मह्त्वाची बाब विसरली जात आहे असे मला वाटते.
असो.
खरी मेजवानी तर आता ई. विरुध्द मालिकेत आहे. दबाव नसलेले साहेब, फिट (?) विरू, गंभीर, फॉर्मात आलेला युवी आणि अण्णा, अप्पां चे अजरामर कॉंबो... मजा आयेगा!
एखादा सामना थेट राणीच्या राज्यात जावूनच पहावा... येताय काय कुणी ऊत्साही?

>>> कुणाच्या जोरावर? विजय, मुकुंद, आणि द्रविड ? का रैना आणि धोणी ने ओपनिंग ला यायला हवे होते असे तुम्हाला म्हणायचे आहे? २८ षटकात ११६ धावा इतकं साधं एकदिवसीय सामन्या सारखं समीकरण कसोटी मध्ये असत नाही हे काही मी सांगायची गरज आहे का मास्तुरे?

सामना जिंकायची इच्छा होती तर रैनाला ३ रा, स्वतः धोनी ४ था व हरभजन ५ वा यायला पाहिजे होते. जर पडझड झाली असती तर खाली द्रविड व लक्ष्मण हे भक्कम फलंदाज सामना वाचवू शकले असते.

९ विकेट हातात असताना २८ षटकांत ११६ धावा न जमणे किंवा निदान त्यासाठी प्रयत्न सुध्दा न करणे ही नामुष्कीच आहे. एकदिवसीय सामन्यात २८ षटकांत १५० ते २०० धावा होऊ शकतात. कसोटीत ११६ व्हायला हरकत नाही. गेल्या काहि वर्षात कसोटीत षटकामागे ४ किंवा अधिक धावा अनेक वेळा केलेल्या आहेत (भारताने सुध्दा). त्यामुळे षटकामागे ४ च्या गतीने धावा (ते सुध्दा ९ विकेट हातात असताना) ही अवाजवी अपेक्षा नाही.

कालचा सामना न जिंकण्याचे मूळ भारताच्या बचावात्मक व अप्लसंतुष्ट मानसिकतेत आहे. १९८१ इंग्लंडविरूध्द पहिली कसोटी जिंकल्यावर, मालिका हरायची नाही, या उद्देशाने गावसकर, यशपाल शर्मा व विश्वनाथ उर्वरित ५ सामन्यात पराकोटीचा संथ खेळ करून सामने अनिर्णित ठेवण्यात धन्यता मानली होती.

१९८६ मध्ये मालिकेतले पहिले २ कसोटी सामने जिंकल्यावर व तिसर्‍या सामन्यात ५ व्या दिवशी २०० च्या आसपास धावा करून इंग्लंडची त्यांच्याच भूमीवर ३-० अशी धुलाई करण्याची उत्कृष्ट संधी आलेली असताना कपिलने कच खाऊन सामना न हरण्याचा प्रयन्त केला. त्यावेळी रवी शास्त्रीने अत्यंत कूर्मगतीने फलंदाजी करून सामना अनिर्णित ठेवण्यात धन्यता मानली होती.

जानेवारी १९९३ द. आफ्रिकेविरूध्द ०-१ असे मागे असताना व ५ व्या दिवशी विजयासाठी ३०३ धावा करायच्या असताना (सर्व १० विकेट हातात होत्या), शास्त्री, मांजरेकर, अझरूद्दिन इं. नी दिवसभर तब्बल ९० षटके खेळून फक्त १२५ धावा केल्या (सामना संपताना भारताचे फक्त २ गडी बाद झाले होते). त्यावेळी मालिकेत १-१ अशी बरोबरी करायची संधी असताना अजिबात प्रयत्न न करता दिवस खेळून काढला होता.

ह्याच सामन्याची पुनरावृत्ती जानेवारी २०११ मध्ये झाली. पुन्हा एकदा ५ व्या दिवशी सामना जिंकून मालिका २-१ अशी जिंकायची संधी असताना, सचिन, लक्ष्मण इं. नी कूर्मगती फलंदाजी करून दिवसभरात जेमतेम १५० धावा केल्या.

१९८६ मध्ये ऑस्ट्रेलियात ५ व्या दिवशी जिंकायला फक्त १२६ धावा हव्या असताना, मोहिंदर, वेंगसरकर, अझरूद्दिन इं. नी कमालीचा संथ खेळ केला. डावाची २५ षटके पूर्ण झाल्यावर पावसामुळे उर्वरित सामना झाला नाही. अर्थात १२६ धावांसाठी २५ षटके पुरेशी होती. पण २५ षटकांत भारताने फक्त ५८ धावा केल्या व सामना जिंकण्याची सुवर्णसंधी घालविली.

आपली मानसिकताच बचावात्मक खेळणे, जिंकण्यापेक्षा न हरण्यात धन्यता मानणे अशी आहे.

>>> >>व पराभवाच्या भीतिने संथ खेळून सामना अनिर्णित ठेवण्यात धन्यता मानणे, ही प्रथम क्रमांकाच्या संघाकरता नामुष्कीची गोष्ट आहे. >>>>> हा निश्कर्ष कशावरून काढलात? आपण नुकतेच म्हणजे गेल्याच वर्षी क्र. १ चे झालो आहोत. तूर्तास तो क्र. टिकवणे हे मला महत्वाचे वाटते. त्यासाठी अवाजवी धोका न पत्करता प्रसंगी बचावात्मक खेळ केला तर बिघडले कुठे? बचाव करायलाही तितकेच कसब लागते ना- का ते कुणीही सोम्या गोम्या करू शकतो? आपला संघ आता कंगारू थाटात ईतर देशांना पार धूळ चारत सर्व सामने मालिका जिंकेल वगैरे असा एकंदरीत अपेक्षांचा सूर सर्वत्र दिसतोय.

हा सामना आपण हरला असता तरी आपला प्रथम क्रमांक टिकून राहिला असता. २८ षटकांत ११६ धावा कराव्यात (ते सुध्दा ९ विकेट हातात असताना) ही अपेक्षा प्रथम क्रमांकाच्या संघाकडून नाही ठेवायची?मुळात १८० धावांचे आव्हान अतिशय किरकोळ होते. विंडीजची गोलंदाजीही सामान्य होती. आपल्याकडे द्रविड, लक्ष्मण असा भक्कम बचाव होता व रैना, धोनी सारखे फटकेबाजही होते. जोडीला मुकुंद, कोहली, विजय पण होता. प्रवीणकुमार, हरभजन हे सुध्दा बर्‍यापैकी फलंदाजी करू शकतात. अशा संघाने शेपूट घालावी ही माझ्या दृष्टीने नामुष्कीच आहे.

धोनी ने फक्त एकच मुर्ख पणा केला तो म्हणजे मुरली विजय बाद झाल्या वर रैना ला पाठवला.......त्या जागी जर हरभजन पाठवला असता तर काही रन कमी झाले असते झटपट......आणि समजा तो लवकर तरी बाद झाला असता तरी हरकत नव्हती......मागे रैना लक्ष्मण धोनी होतेच.......... हा जुगार खेळायला हवा........

मास्तुरेंशी बर्‍यापैकी सहमत. फक्त एकच पॉईंट - पूर्वीच्या संघांना तो आत्मविश्वास नव्हता. तसेच संघनिवडीतील राजकारणामुळे कोणालाच भरवसा वाटत नसेल असे डेअरिंग करण्याचा. पण आता परिस्थिती वेगळी आहे. निदान संघाने थोडे प्रयत्न केले, पण २-३ विकेट्स गेल्यावर शटर ओढून घेतले असे जरी दिसले असते तरी चालले असते.

फक्त ३-४ वर्षांपूर्वी आठवते - द्रविड कप्तान असताना बरेच रन्स हवे होते, तेव्हा पहिले २-३ तास मॅच वाचवण्याच्या दृष्टीने खेळ करून फक्त ८-१० शतके मारायचा प्रयत्न केला होता आपल्या लोकांनी. लिन्क मिळाली तर देतो. तो ही खूप लेटच होता पण निदान काहीतरी इंटेंट दाखवला होता.

ज्या मानाने सुरुवातीला, 'छे:, यात काय बघायचे, अगदी सामान्य खेळाडू, उगाचच धोणीने आणखी एक सामना जिंकला एव्हढेच होईल' असे म्हणत होते लोक, त्यामानाने आता मात्र अहमहिकेने पुढे येऊन कुणाचे कुठे काय चुकले हे सांगायला तयार. अगदी सामना संपून दोन दिवस झाले तरी.
मज्जा आहे न् काय!
तेहि बरोबरच आहे म्हणा. आपण कधी आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळलो नाही, घरी बसून आरामात बघतो. ते मात्र पूर्वी खेळले आहेत, प्रत्यक्ष तिथे उभे राहून बघताहेत चेंडू वळताहेत का, उसळताहेत का, फलंदाजाला कुठल्या प्रकारे टाकलेला चेंडू, आज खेळायला कठीण जातो आहे. ते अगदी जवळून बघत असतात. त्यांचे मत वेगळे नि आपण जरा बाजूला बसून सगळीकडे नजर टाकून, पूर्वी काय झाले ते बघून मग निर्णय घेतो. त्यामुळे आपले निर्णय, दोन्ही बाजूंचा सांगोपांग विचार करून मग घेतलेले असतात. त्यामुळे आपला निर्णय होइस्तवर सामना संपतो, पण तरी जे समजले ते सांगायला पाहिजे.

हे सर्व कोच, धोणी, शरद पवार इ. लोकांना पत्रे लिहून कळवले पाहिजे.
एक विचार.

<< आपण नुकतेच म्हणजे गेल्याच वर्षी क्र. १ चे झालो आहोत. तूर्तास तो क्र. टिकवणे हे मला महत्वाचे वाटते. >> योगजी, याची दुसरी बाजू अशी कीं क्र.१ चा संघ म्हणून टिकून रहाण्यासाठी नुसती जिंकण्याची आंकडेवारी पुरेशी नसते; त्याकरता जिंकण्याच्या प्रत्येक संधीचा लाभ उठवण्याची मानसिकता जोपासणं अधिक महत्वाचं असावं. मला अजूनही वाटतं कीं तिसर्‍या कसोटीत आपण याबाबतीत कमी पडलो.

Pages