Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:13
Jul 6-10, 2011 (10:00 local | 14:00 GMT | 10:00 EDT | 09:00 CDT | 07:00 PDT)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यासाठी एका नवीन धाग्याची
यासाठी एका नवीन धाग्याची आवश्यकता वाटत नाहिय्ये. फार काहि रोमांचकारक या कसोटीत घडेल असे वाटत नाही. विशेषतः सचिन, सेहवाग, गंभीर, युवराज इ. नसताना व विंडीजचा दुबळा संघ समोर असताना फार काहि मजा येणार नाही.
मालिका विजय - धोणीचा अजुन एक
मालिका विजय - धोणीचा अजुन एक रेकॉर्ड. बाकी काही वाटत नाही.
च्च च्च! तुम्ही लोकांनी अगदीच
च्च च्च! तुम्ही लोकांनी अगदीच पाठ फिरवली की हो.
बघा, बघा, धोणीच्या ७४ धावा, हरभजनचे ३ बळी. इतके दिवस दोघांना नावे ठेवली, बरोबरच होते. पण आता कौतुकहि करा ना!!
जाऊ दे झाले. आता उद्या जिंकल्यावर निदान अभिनंदन म्हणायला तरी या. आणि न जाणो, हरलो किंवा सॅमी नि चंद्रपॉलने बाद व्हायचेच नाही असे ठरवून खूप खूप धावा केल्या, किंवा पावसामुळे, जर सामना अनिर्णित राहिला तर??
धोनी बहुतेक मालिकेच्या
धोनी बहुतेक मालिकेच्या शेवटच्या सामन्यात खेळून आपली पुढच्या मालिकेतली सीट नक्की करतोय. विश्वचषकामध्ये सुध्दा पहिले ८ सामने फ्लॉप गेल्यावर अंतिम फेरीत जबरदस्त नाबाद ९७ धावा करून सामना जिंकायला हातभार लावला. याही मालिकेत पहिले ४ डाव फ्लॉप गेल्यावर त्याने नेमक्या शेवटच्या सामन्यात ७४ धावा केल्या.
असे वाटते की ही पण कसोटी
असे वाटते की ही पण कसोटी अनिर्णित राहणार......जर ५व्या दिवशी लवकर विकेट नाही पडली आणि लक्ष्य जर १५० पेक्षा अधिक असेल तर धोनी सेफ गेम खेळेल..........
जिंकायला पाहिजे आज. लक्ष्मण
जिंकायला पाहिजे आज. लक्ष्मण चे मागच्या टेस्ट मधे दोन्ही डावात शतक हुकले. यावेळेसही मस्त खेळला तो. (आता खूप जुनी गोष्ट वाटते, पण ३-४ मॅचपूर्वीच दरबान ला तो काय जबरी खेळला होता! मॅच जिंकून देण्यात त्याचा मोठा हात होता). आज त्यांना फार रन्स अजून करू दिले तर लक्ष्मण पुन्हा फोकस मधे येइल.
पण बहुधा तशी वेळ येणार नाही. इशांत, प्रवीण, मुनाफ आणि भज्जी काय करतात बघू.
चला थोडी तरी उत्सुकता वाढली
चला थोडी तरी उत्सुकता वाढली आहे, काय होते ते बघायची. पुनः त्यांचे शेपूट किती वळवळते तेहि बघायला हवे, नाहीतर हत्ती गेला, शेपुट राहिले, नि मग नखे खात बसावे लागेल!
जर जिंकायला १७५ पेक्षा जास्त
जर जिंकायला १७५ पेक्षा जास्त धावा हव्या असतील, तर भारत आपल्या परंपरेला जागून अत्यंत संथ खेळून सामना न हरण्यात धन्यता मानेल.
हॅटस ऑफ टू शिव! तो मस्त
हॅटस ऑफ टू शिव! तो मस्त निगोशिएट करत आहे. पण आता बास. विकेट घ्या एक आणि जय हो म्हणा. आज जिंकू शकतो.
मास्तुरे फक्त १८ ओव्हर्स झाल्यात पुढच्या अगदी १० त्यांनी खेळल्या तरी उरल्या ६०. त्यात आपण सहज १८०+ आज काढू शकतो.
ह्या ओव्हरला इशांत ८-१ ने
ह्या ओव्हरला इशांत ८-१ ने टाकत आहे. वॉव! भारत इंग्लंड मध्ये सचिनला अशी लाईन नासिरने टाकली होती. (फ्लिंटॉफ वगैरे टिम) काढा विकेट.
१००!
१००!
वैत्ताग! काय झाले आहे
वैत्ताग! काय झाले आहे काय?
लक्ष्य जर १५० पेक्षा अधिक असेल तर धोनी सेफ गेम खेळेल..........
तेहि नसे थोडके! खरे तर ज्या गतीने खेळ चालू आहे, त्या गतीने, हेच होईल असे वाटते! सगळेजण लाईन लावून बाद नाही झाले म्हणजे मिळवली.
एकटा भज्जी बिचारा मरे मरे तो गोलंदाजी करतो आहे. आता जरा त्याला, मुनाफ नि इशांतला विश्रांती द्या, नि येउन जाउ दे रैना नि मुकुंदला! काढली तर विकेट काढतील, नाहीतर कितीही धावा दिल्या तरी काय, अनिर्णितच ठेवायचा आहे सामना असे ठरवूनच खेळताहेत!!!
जिंकायला अंदाजे ४७ षटकांत १८०
जिंकायला अंदाजे ४७ षटकांत १८० धावा करायच्या आहेत. फक्त रैना व धोनीच वेगाने खेळू शकतील. कोहली व मुरली फॉर्मात नाहीत. द्रविड नांगर टाकून खेळतो. लक्ष्मणने लागोपाठ ३ अर्धशतके केल्यामुळे ह्या डावात तो लवकर बाद होण्याची शक्यता आहे. मुकुंदनेही लागोपाठ २ डाव चांगली फलंदाजी केल्यामुळे त्याचाही भरवसा नाही. धोनी पहिल्या २-३ विकेट जाईपर्यंत प्रयत्न करेल. द्रविडला एक बाजू धरून ठेवायला सांगेल. ३ विकेट गेल्यावर जर विजय खूप लांब असेल, तर प्रयत्न सोडून देईल. एकंदरीत सामना अनिर्णित राहण्याची जास्त शक्यता आहे.
हातातली मॅच घालवत आहेत असे
हातातली मॅच घालवत आहेत असे वाटतेय. द्रविड ने तंबू ठोकून लक्ष्मण येई पर्यंत विजय, विराट ह्यांनी ठोकायला पाहिजे. बास झाले सरळ फिल्डर कडे बॉल मारणे.
४ चा रन रेट हवा असताना गेल्या १० ओव्हर्स मध्ये परत एकदा २.६५ चा रन रेट ठेवत आहेत. धन्य!
दमले असतील बिचारे आपले सगळे
दमले असतील बिचारे आपले सगळे खेळाडू. इतके महिने उन्हातान्हात, पावसात खेळताहेत नादिष्टासारखे. त्यातून एव्हढा लांबचा प्रवास. नि आता पुनः एव्हढ्या गरम हवेतून थंड इंग्लंडमधे. तिथे तरी आराम आहे का, नाहीच. कित्येक दिवसात आईच्या हातचे खायला मिळाले नाही!
सवय नाही एव्हढ्या कष्टांची! एव्हढा इंग्लंडचा दौरा आटोपला की बास करा खेळणे सहा सात महिने. आराम करा जरा.
ते काय हमाल, मजूर आहेत, काम नाही केले तर खायला मिळणार नाही म्हणून आपले सकाळ दुपार काबाडकष्ट करायला.
मी विंडीज ची बॅटिंग थोडी
मी विंडीज ची बॅटिंग थोडी बघितली. एकदम आज पिच खेळायला एवढे सोपे का वाटत होते कळाले नाही.
नालायक, हरामखोर साले!
नालायक, हरामखोर साले! जिंकायची शक्यता होती तरी अनिर्णितच्याच मागे लागले साले!
वर बोलण्या प्रमाणेच झाले....
वर बोलण्या प्रमाणेच झाले....:) धोनी ने सेफ गेम खेळला..........
>>> नालायक, हरामखोर साले!
>>> नालायक, हरामखोर साले! जिंकायची शक्यता होती तरी अनिर्णितच्याच मागे लागले साले!
मालिकेत १-० अशी आघाडी असेल किंवा १-१ अशी बरोबरी असेल तर भारत उर्वरित सामने न हरण्याकरता खेळतो. ही खूप जुनी परंपरा आहे. शेवटचा सामना जिंकला तर २-० किंवा २-१ असा विजय होऊ शकतो ह्या मोहात भारतीय पडत नाहीत.
मालिकेत ०-१ असे मागे असले, तरी, ०-२ अशी हार होऊ नये म्हणून हीच टाईम टेस्टेड स्ट्रॅटेजी वापरली जाते.
आजचा सामना तरी त्याला कसा अपवाद असणार? यापूर्वी अनेकदा मालिकेच्या शेवटच्या सामन्यात भारताने अशी संतापजनक फलंदाजी केलेली आहे. (उदा. १९८१ ची इंग्लंडविरूध्द्ची मालिका, १९९२-९३ ची द. आफ्रिकेविरूध्दची मालिका, २०१०-११ ची द. आफ्रिकेविरूध्द्ची मालिका, १९८६ च्या इंग्लंडविरूध्दच्या मालिकेतला शेवटचा सामना इ.)
काल १९ षटकांत १ बाद ६४ धावसंख्या असताना व उर्वरित २८ षटकांत फक्त ११६ धावा हव्या असताना, कसोटीत प्रथम क्रमांकावर असलेल्या व एकदिवसीय स्पर्घेत जगज्जेते असलेल्या भारताने आपल्या उच्च परंपरेला जागून संथ खेळून हा सामना अनिर्णित ठेवण्यात धन्यता मानली!
रात्री जागून बघितली आणि
रात्री जागून बघितली आणि अंगाचा तीळपापड झाला
सेहवाग असता (आणि अर्थातच सचिनही) तर नक्की जिंकण्याचा प्रयत्न केला असता शेवटपर्यंत.
धोनी असा शेपूटघालू असेल असं वाटलं नव्हतं.
काल त्याने का नाही स्वतःला वर प्रोमोट करुन घेतलं? आधी रैना, ल़क्ष्मण नामक constipated फलंदाजांना पाठवलं
*मालिका पाहिली नाही. इशान्त
*मालिका पाहिली नाही. इशान्त शर्मा मॅन ऑफ द सिरीज, म्हणजे पूर्वीचा (ऑस्ट्रेलिया दौर्यातला) इशान्त मिळाला का?
त्याचे म्हणणे असे होते की झहीरची कॉपी करायला गेल्याने त्याची गोलंदाजी बिधडली. आता चुका सुधारल्यात म्हणे.
*एवढं चिडायला बेटिंग केलं होतं का?
नाही हो बेटिंग कधीच नाही करत
नाही हो बेटिंग कधीच नाही करत आणि आताही नव्हतं केलं. क्रिकेटवर मनसोक्त प्रेम आहे म्हणूनच हा सात्विक संताप.
>>> सेहवाग असता (आणि अर्थातच
>>> सेहवाग असता (आणि अर्थातच सचिनही)
सचिनची खात्री नाही. जानेवारी २०११ मध्ये द आफ्रिकेविरूध्द मालिकेत १-१ अशी बरोबरी असताना व शेवटची कसोटी जिंकण्यासाठी ५ व्या दिवशी ३०० च्या आसपास धावा करायच्या असताना भारताने पूर्ण ९० षटके खेळून १४० धावा सुध्दा केल्या नाहीत व सामना अनिर्णित ठेवण्यात धन्यता मानली. त्यात सचिनचा वाटा नाबाद १४ (१०० हून अधिक चेंडू खेळून). लक्ष्मणही खूप संथ खेळला होता.
अर्थात त्याला सचिन तरी काय करणार? कप्तान जसा हुकूम देईल तसेच त्याला खेळावे लागणार! विकेट न घालवता सामना न हरण्याचाच प्रयत्न करा असे धोनीने सांगितल्यावर तो बिचारा काय करणार?
द आफ्रिकेविरूध्द गोष्ट वेगळी
द आफ्रिकेविरूध्द गोष्ट वेगळी आहे हो. तिखट मारा असतो त्यांचा. इथे वेस्ट इंडीजचे उंदीर होते गोलंदाजीला. त्यात रामपाल, बिशु वगैरे आपलीच मंडळी
एक द्रविड सोडला तर बाकी सगळे
एक द्रविड सोडला तर बाकी सगळे वेगात खेळू शकतात. पण धोनीने स्वतःच सांगितले आज की सिरीज धोक्यात आणायची नव्हती. मलाही वाटत होते की प्रयत्न करायला हवा होता. हा संघ आधीच्या संघांपेक्षा जास्त चांगला आहे, जरी सचिन वगैरे नसले तरी.
बार्बाडोस १९९७ डोक्यात असेल काही जणांच्या. त्यापेक्षा मॅच ड्रॉ ठेवून सिरीज खिशात ठेवलेली बरी म्हंटला असेल धोनी
आता इंग्लंड दौरा.
आता इंग्लंड दौरा.
मला तरी पटला धोणी चा निर्णय.
मला तरी पटला धोणी चा निर्णय. शेवटच्या डावात साधारण ४ च्या सरासरीने कसोटी सामना जिंकल्याची ऊ.दा. फार कमी आहेत. त्यातही आपली सलामीची जोडी अन मधली फळी कायम बेभरवशाची ठरली आहे या मालिकेत (अपवाद लक्षमण, रैना). खेरीज खेळपट्टी बर्यापैकी खराब झाली होती. अशा वेळी जोखिम पत्करून फलंदाज बाद झाले असते तर आपल्या ईतर फलंदाजांवर अधिक दडपण आले असते ज्याचा फायदा विंडीज ने घेतला असता.. they had nothing to loose, we had the series to loose/draw.
विरू असता तर विंडीज च्या या गोलंदाजीपूढे आपण तीनही सामने मोठ्या फरकाने खिशात घातले असते..
असो. आता खरी मजा येईल ईंग्लंड दौर्यात.
या मालिकेतून ईशांत, रैना, प्रवीण कुमार, भज्जी यांना गवसलेला सूर आणि आत्मविश्वास आपल्याला ई. विरुध्द नक्कीच फायद्याचा ठरेल. ई. मध्ये प्रवीण ची गोलंदाजी (स्विंग) अधिक प्रभावी ठरेल असे वाटते.
धोणी कडून अजूनही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. बाकी कोहली, विजय, मुकुंद यांना या मालिकेतून चांगला अनुभव मिळाला आहे. अण्णा आणि अप्पा आहेतच फॉर्मात.. तेव्हा ईं विरुध्द मला तरी भारताचे पारडे जड वाटते.
तेव्हा ईं विरुध्द मला तरी
तेव्हा ईं विरुध्द मला तरी भारताचे पारडे जड वाटते.
>>>>
इंग्लंड टीम फॉर्म मध्ये आहे, टारगेट टफ आहे.
शेवटचा सामना जिंकला तर २-०
शेवटचा सामना जिंकला तर २-० किंवा २-१ असा विजय होऊ शकतो ह्या मोहात भारतीय पडत नाहीत.
त्याचे कारण भारतीय संस्कृती. काम, क्रोध, मद, मोह यांचे दमन करा. सत्य, अहिंसा यांचा मार्ग धरा. शरण आलेल्या शत्रूला जीवदान द्या. हाल हाल करून मारून टाकण्यात कसली आली संस्कृती!
त्याला खरे सुसंस्कृत म्हणतात.
या उलट पाश्चात्य किंवा इतर यांची संस्कृती - तोडा, मोडा, सगळी देवळे उध्वस्त करा, सगळ्यांची कत्तल करा, जालीयनवाला बागेत निरपराध लोकांना गोळ्या घालून ठार मारा, जपान बेचिराख करा, बगदाद बेचिराख करा, चिडून, फसवून सामने जिंका! रानटी लेकाचे. काट्या चमच्याने खातात म्हणजे सुसंस्कृत नाही झाले!!
त्यांचाच खेळ भारतीय संस्कृती प्रमाणे कसा खेळायचा याचा आदर्श जगात घालून देताहेत आपले लोक!
असे म्हणा, आपण जे केले ते चांगलेच होते असेच म्हणत रहा.
खेळात कसली दया माया, जो जिता
खेळात कसली दया माया, जो जिता वही सिकंदर.
Pages