हायकू -

Submitted by विदेश on 27 June, 2011 - 15:07

आकाशी पक्षी
उडतात मजेत
शिकारी खिन्न

हाती लपली
चार फुले चाफ्याची
शीळ वाऱ्याची

निजरूपाचे
कुतूहल बाळाचे
आरसा खूष

पुढे दगड
पडलेले रग्गड
मी का शहाणा

उत्सुक डोळे
पिंडापाशी कावळे
मोकळा आत्मा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पुढे दगड
पडलेले रग्गड
मी का शहाणा>>> व्व्व्व्वा!

मुख्य म्हणजे तुम्ही हायकूचे वृत्त तंतोतंत पाळलेत व ब्रेकही प्रॉपर घेतलात.

अभिनंदन अभिनंदन अभिनंदन!

खूप छान प्रकार आहे हा .............
तुम्हाला छान जमतोय .........अजून अशा रचना असतील तर सादर कराव्यात ही विनन्ती..........!!

माझ्या एका रचनेची लिन्क देतोय ती हायकू होवू शकते का ते प्लीज सान्गावे ही विनंती

http://www.maayboli.com/node/30893