मराठा इतिहास दिनविशेष ... जून महिना.. भाग १

Submitted by सेनापती... on 16 June, 2011 - 11:57

१ जून १९९८ - दुर्गमहर्षी 'गोपाळ निलकंठ दांडेकर' यांची पुण्यतिथी. हा दिवस 'दुर्गदिन' म्हणून साजरा केला जातो.

६ जून १६७४ - जेष्ठ शुध्द त्रयोदशी म्हणजेच शिवराजाभिषेकदिन.. शिवशक ३३८ प्रारंभ...

८ जून १६७० - पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवरायांनी पुनश्च जिंकून घेतला.

८ जून १७०७ - औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि अझमशाह ह्या त्याच्या २ मुलांमध्ये दिल्लीच्या तख्तसाठी युद्ध झाले. ह्यात मुअज्जमने अझमशाहला ठार करून दिल्लीची गादी बळकावली.

८ जून १७१३ - पंतप्रतिनिधि यांनी सिद्दी कडून रायगड किल्ला राजकारण साधून जिंकून घेतला. १६८९ साली रायगड सिद्दीने मुघलांसाठी जिंकला होता.

९ जून १६९६ - छत्रपति राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडू येथील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्न झाले. मुलाचे नाव 'शिवाजी' ठेविले.

९ जून १७०० - दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.

९ जून १७१८ - पूर्ण ताकदीनिशी इंग्रज आंग्र्याँच्या विजयदुर्ग येथील आरमारावर चालून गेले. बरेचसे आरमार आंग्र्यान्नी पावसाळ्यासाठी नांगरुन ठेवले होते. तरीसुद्धा उत्कृष्ट संरक्षण क्षमता आणि सागराचा वापर ह्यामुळे इंग्रज ९ दिवस प्रयत्न करून पराभूत होउन मुंबईला परत गेले.

१० जून १६७६ - छत्रपति शिवरायांच्या 'दक्षिण दिग्विजय' मोहिमेस सुरवात. राजाभिषेकानंतर छत्रपति शिवाजी महाराजांनी 'दक्षिण दिग्विजय' मोहिम आखली. गोवळकोंडयाच्या कुतुबशाही बरोबर सख्य करून विजापुरच्या आदिलशाहीचा नाश करायचा हे या मोहिमेमागचे सूत्र होते.

१० जून १६८१ - औरंगजेबचा मुलगा पाछ्चा उर्फ़ अकबर छत्रपति संभाजी महाराजांच्या शरणार्थ आला. त्यास संभाजी राजांनी नेतोजी पलकर आणि हीरोजी फर्जद यान समवेत पाली येथील सुधागड जवळ ठेविले.

१० जून १७६८ - पेशवे माधवराव आणि राघोबादादा यांसमध्ये धोडोपची लढाई. माधवरावने लढाई जिंकून राघोबास पराभूत केले.

१२ जून १७३२ - सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संभाजी आणि मानाजी ह्या २ मुलांमध्ये सरखेल पदासाठी झगडा सुरु होता. अखेर १२ जून १७३२ रोजी त्यांच्यात लढाई सुरु झाली.
.
.

क्रमश: .....

तळटीप: सदर तारखा, प्रसंग मी विविध संदर्भ पुस्तकांमधून मिळवलेले आहेत...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

औरंगजेबचा मुलगा पाछ्चा उर्फ़ अकबर छत्रपति संभाजी महाराजांच्या शरणार्थ आला. त्यास संभाजी राजांनी नेतोजी पलकर आणि हीरोजी फर्जद यान समवेत पाली येथील सुधागड जवळ ठेविले.
..म्हणून खालच्या गांवाचं नांव पाच्छापूर आहे कांय???

<<८ जून १७१३ - पंतप्रतिनिधि यांनी सिद्दी कडून रायगड किल्ला राजकारण साधून जिंकून घेतला. १६८९ साली रायगड सिद्दीने मुघलांसाठी जिंकला होता.>>
इथे काहीतरी घोळ आहे. ति तारी़ख ५ जून १७३३ आहे.
शाहुमहाराजानी प्रतिनिधिना पाठवुन सिद्दी कडून रायगड किल्ला जिंकून घेतला होता.

<< पूर्ण ताकदीनिशी इंग्रज आंग्र्याँच्या विजयदुर्ग येथील आरमारावर चालून गेले>> व <<संभाजी राजांनी नेतोजी पलकर आणि हीरोजी फर्जद यान समवेत पाली येथील सुधागड जवळ ठेविले. >> ही अनुक्रमे विजयदुर्ग व सुधागडबद्दलची माहिती खूपच 'इंटरेस्टींग' वाटली !