श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला?

Submitted by जागोमोहनप्यारे on 16 June, 2011 - 07:00

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला?

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला याबाबत फारसे कुठे स्पष्टपणे वाचायला मिळत नाही. इंग्रज, पोर्तुगीज आणि भारतीय अशा तीन्ही इतिहासकारानी वेगळीवेगळी कारणे दिली आहेत.

१. विषमज्वर- टायफाइड

२. आतड्याचा अ‍ॅन्थ्रॅक्स.. यात आतड्याला इन्फेक्शन होऊन रक्त्युक्त उलटी जुलाब होतात.

३. महाराजांवर त्यांच्याच एका पत्नीने विषप्रयोग केला.

महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्ञानेश्वर राहू दे, पण तुकाराम तर चाळीशीतच परलोकवासी झाले...थोरले बाजीराव, माधवराव >>>>>

जो आवडतो सर्वाना तोची आवडे देवाला.. .. औरंगजेब ८८... एमेफ हुसेन ९५!!! Happy

मं. जो. तुम्ही आधी हा प्रतिसाद दिला. कारण तुम्हालापण रस होता.
--------------------------------------
मंदार_जोशी | 16 June, 2011 - 07:09
गुडघी रोग असंही वाचनात आलं होतं. ते काय असतं?
---------------------------------------------

मग कुणितरी नको नको म्हणाले आणि तुम्हीपण लिहिले

-------------------------------
मंदार_जोशी | 16 June, 2011 - 07:32
जामोप्या, हा विषय खरंच नको. प्लीजच.
---------------------------------------

ज्यांना खरच हा विषय नको त्यांनी नाही टाकाव्या पोष्टी. ज्यांना आवड आहे त्यांना लिहुदेत.
माफ करा मं. जो. तुम्हाला उदाहरणासाठी लिहावे लागले.

"...त्याच काळात औरंगजेब मात्र ९० वर्षे जगला..."

~ प.भ. : तुमचा (आणि वरील श्री.योग) यांचा प्रश्न किंवा विचार मी काहीसा सीरियसली घेतला तर चालेल का ?

हे अशासाठी लिहित आहे की, माझा या विषयाबाबत थोडा (जास्त नव्हे...) अभ्यास आहे आणि केवळ औरंगझेब ८८ वर्षे जगला म्हणून...आणि का व कसा... आपण आपल्या डोक्याचे केस कमी करून घेण्यात हशील नाही. मुघल साम्राज्य हे एक अतिशय भव्य आणि समृद्धीने भरभराट झालेल्या अवस्थेतील होते हे तुम्हाला मान्य असेलच. औरंगझेब तर जरी खर्‍या अर्थाने शेवटचा नामवंत असा मोघल एम्परर असला तरी त्याच्या अगोदरच्या काळातील सम्राटांनी राज्यविस्तारासोबत स्वतःसाठी तसेच त्यांच्या प्रजेसाठी ज्या काही सोयीसवलती वा कारभार पद्धत राबविली होती तीमध्ये औषधोपचाराची (त्या त्या काळात उत्कृष्ट मानली गेलेली) सोय अंतर्भूत होतीच. अकबराच्या नवरत्नामध्ये जी विविधता होती तद्वतच त्या काळात खास असे हकीमही तब्येतीसाठी होतेच.

पण एकट्या औरंगझेबाच्या आयुष्यमानाकडे पाहून मोघलांच्या त्या काळातील "लाईफ स्पॅन" बाबत तर्क लढविणे योग्य नाही. मुघल साम्राज्याच्या पाया घालणारा आद्य सम्राट चेंगीझखानने सार्‍या भरतखंडात आपल्या कारकिर्दीचा दबदबा निर्माण केला होता...तो जगला ६० वर्षे...तर त्याच्यापुढील बादशहा बाबरला आयुष्य लाभले ४७ वर्षाचे....हुमायून ४६ तर इतिहासात नाव केलेला अकबर जगला ६३ वर्षे...जहांगिर तर ५८ व्या वर्षीच गेला...तर ज्याच्या काळात दिल्लीमध्ये सधनतेची धूमधाम झाली त्या शहाजहानला ७४ वर्षाचे आयुष्य लाभले. औरंगजेबाने ज्या भावांची सत्तेसाठी हत्या केली ते तर तिशीच्या आतीलच होते.

थोडक्यात औरंगजेझ आणि शहाजहान यानाच 'दीर्घ' म्हणावे असे आयुष्य लाभले आणि तेही त्याकाळात त्यांच्या दरबारी नावाजली गेलेली वैद्यकिय सुविधा असताना. त्यामानाने मराठा साम्राज्याच्या काळात 'औषध' नावाच्या घटकाला तितके महत्व नसेलच...सारी कारकिर्दच घोड्यावर मांड टाकून फिरण्यात गेल्याने प्रकृतीकडे दुर्लक्ष साहजिकच होते.

अर्थात हे सर्वत्रच घडत होते....खुद्द राजपुताना इतिहासातील दोन उज्ज्वल नावे... महाराणा प्रताप आणि महाराजा रणजितसिंग यानाही अनुक्रमे ५७ व ५८ वर्षाचेच आयुष्य लाभले....म्हणजे शिवाजीराजांच्यापेक्षा पाचसहा वर्षे जादा.

प्रतिक तुमचे म्हणणे मला मान्य आहे... पण >>> त्यामानाने मराठा साम्राज्याच्या काळात 'औषध' नावाच्या घटकाला तितके महत्व नसेलच...सारी कारकिर्दच घोड्यावर मांड टाकून फिरण्यात गेल्याने प्रकृतीकडे दुर्लक्ष साहजिकच होते.

हे वाक्य राजांना उद्देशून आहे की सर्वच मराठा सरदार /शिलेदार / बारगीर यांना? कारण काय आहे की राजांचे ७/८ जीवन हे गडांवर व्यतीत झालेले आहे. अवघे १/८ जीवन मोहिमेवर. नंतरच्या काळात त्यातील बरेचसे पालखी वापरून. नंतरच्या काळात घोडा तसा कमीच.

संदर्भ --- नरहर कुरुंदर...

सभासद बखर ह्या संदर्भात कुठलेही खळबळजनक विधान करीत नाही. राजांचा मृत्यू नैसर्गिक (ज्वर) होता असेच निदान करते.

परंतु मृत्यूपूर्वीच्या काही दिवसांचे वर्णन सभासदाने उत्कृष्टरित्या मांडले आहे. राजांचे अनेक विचार त्यात उतरलेले आहेत.

प.भ...~ माझे ते वाक्य त्या वेळेस (आणि पेशव्यांच्या काळातही) या ना त्या निमित्ताने मोहिमेत असणार्‍या सर्वच वीरांना (त्यात मग खुद्द महाराजही आलेच) लागू होईल. 'ऐषआरामातील जीवन' म्हटले की आपल्या नजरेसमोर जे चित्र येते तीत मराठा साम्राज्यातील कोणताच घटक "इलिजिबल' होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहेच. सभासद बखर पाहिल्यास तीत केवळ छत्रपतीच नव्हेत तर डाव्या उजव्या बाजूचे सर्व सरदारदरकदार आणि मनसबदार यांच्या आयुष्याचा लेखाजोखा मिळतो आणि सारे किती अल्पायुषी होते याचाही विदा मिळेल. तानाजी, बाजी प्रभु, नेताजी यासारखे खंदे वीर प्रत्यक्ष युद्धात कामी आले आणि त्यांच्या वयावरही महाराजांच्या वयाचीच सावली होती. जे रणभूमीवर गेले नाहीत, त्यानाही दीर्घायुरारोग्य लाभले असेही नाही.

छ. संभाजीराजे हे वयाच्या ३१ व्या वर्षी रणात गेले तर त्यांचेच भाऊ छ. राजाराम हे कधीही युद्धात गेले नाहीत तरीही वयाच्या ३० व्या वर्षीच गेले. पेशव्यांचा इतिहासही असाच....थोरले बाजीराव आणि माधवराव यांच्यावर लिहिले आहेच, विश्वासराव तरुणपणीच पानिपतावर गेले, तर नारायणराव केवळ १८ वर्षाचे असतानाच गेले, सवाई माधवरावांचे आयुष्य अवघे २१ वर्षाचे....अर्थात या सगळ्यांना मृत्यु कसा आणि कोणत्या परिस्थितीत आला त्याची कारणमीमांसा इथे नको, प्रश्न आहे तो आयुष्यमानाचा..... आणि आहे अपवाद तोही फक्त दुसर्‍या बाजीरावाचा जो तब्बल ७५ वर्षे जगला.

>>> जो आवडतो सर्वाना तोची आवडे देवाला.. .. औरंगजेब ८८... एमेफ हुसेन ९५!!!

मोरारजी देसाई ९९, देवीलाल ८६, करूणानिधी नाबाद ८८ . . .

तानाजी, बाजी प्रभु, नेताजी यासारखे खंदे वीर प्रत्यक्ष युद्धात कामी आले

रच्याकने.... नेताजी कसे वारले ह्याबद्दल मला माहिती देऊ शकाल का? माझ्यामते ते युद्धात वारलेले नाहीत. १६८१ नंतर त्यांचा काही संदर्भ लागत नाहीये.

शिवाजी महाराज यांचा मृत्यु ज्वराने झाला . हा ज्वर विषमज्वर अथवा क्षयरोग सुद्धा असू शकतो,कारण मृत्युपूर्वी रक्ताच्या उलट्या झाल्याचे विदित आहे. मृत्यु तापाने झाल्याचे कृष्णाजी अनंत सभासद या चरित्रकाराने लिहिलेल्या ग्रंथात नमूद केले आहे. सदरचे चरित्रकार राजाराम महाराज यांच्या पदरी सभासद होते व त्यांनी महाराजांच्या मृत्युनंतर १२/१४ वर्षांनी लिहिले आहे यास्तव या चरित्राची विश्वासार्हता खचितच जास्त आहे.

प.भ....जरूर. मीही या क्षेत्रातील तज्ज्ञांना विचारून ती माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतो.

महाराजाना अखेर रक्ताच्या उलट्या झाल्या, ही नोंद सगळीकडे कॉमन आहे.. कारण या तीन्ही आजारांमध्ये ( खेरीज इतरही अनेक विकारामम्ध्ये) हे लक्षण दिसू शकते.

जामोप्या, शेवटचा (३) क्रमांक काढाल काय? ते बरोबर नाही वाटत आहे.
>>>>>>

बरोबर न वाटण्यासारखं काय आहे त्यात.... जामोप्याने लिहिलेले ३ शक्यता माझ्याही ऐकिवात/वाचनात आहेत. आणि यातलं काहीही असलं तरी काय लगेच त्यांचं कर्तुत्व कमी होत नाही... त्यांच्यावरची आपली श्रध्दा काय इतकी तकलादू आहे का????

>>> जो आवडतो सर्वाना तोची आवडे देवाला.. .. औरंगजेब ८८... एमेफ हुसेन ९५!!!
मोरारजी देसाई ९९, देवीलाल ८६, करूणानिधी नाबाद ८८ . . .

---- (माझे गुरुवर्य नेहेमी सांगायचे) माणुस किती जगला याला महत्व नाही आहे.... त्याने जिवंतपणी (समाजाकरिता) काय केले हे महत्वाचे आहे.

असे विषय ज्या समाजाविरूद्ध, जातीविरूद्ध, धर्माविरूद्ध आपल्याला द्वेष आहे त्यांच्यावर दोषारोप करण्यासाठी बरे असतात. आता एखाद्या राणीला एखाद्या सेवकाने कसं भडकवलं हे शोधून काढून त्याची जात सुचित केली कि काम झालं. त्यानेही काम न झाल्यास समाधीवर कुत्रा कसा काय आला आणि जिजाऊंच्या बदनामीच्या मागे कोण लोक होते असे विषयही एकाच वेळी सुरू करता येतील. मग काय बहार येईल. मग आयाबहीणी काढणे, फुल्यांची भाषा .. अहाहा !!

असे दोन तीन थ्रेडस पडले कि मग उतारा म्हणून झोपडपट्टी, फोरास रोड इथं जाऊन फुल्यांच्या गाळलेल्या जागा भरून घ्याव्या म्हणजे पूर्णत्वाचा आनंदही मिळेल.

>>> जो आवडतो सर्वाना तोची आवडे देवाला.. .. औरंगजेब ८८... एमेफ हुसेन ९५!!!

मोरारजी देसाई ९९, देवीलाल ८६, करूणानिधी नाबाद ८८ . . .>>> मास्तुरे, अडवाणी ८३ आणि वाजपेयी ८६ राहिले की, का सोयिस्करपणे विसरले.....

@ शायर हटेला.

मला सभासदाची बखर कुठे मिळेल वाचायला. आंतरजालावर आहे का ?

वर तुम्हि जी लिंक दिली आहे त्या मधे फक्त १ पान दिसत आहे

औरंगजेब जास्त का जगला याची कारणे अशी असु शकतातः
१. कधिही कोणाची चिन्ता केली नाही. प्रजा, नातेवाईक, मित्र मेले तरी चालेल पण माझी खुर्चि मात्र अबाधीत रहायला हवी.
२. काहीही चैन केली नाही. अगदी साधी राहणी (याचा अर्थ असा नाही बाकीनी खुप मजा केली म्हणुन त्यान्चा अन्त लवकर झाला.
३. काहीही दगदग केली नाही. आग्रा सोडुन दूर कुठे गेला नाही शेवटी मरायला दख्खन मधे आला, हीच त्याची कदाचित पहिली मात्र नक्कीच शेवटची दगदग असेल.

अजुन काही कारणे असावीत का?

रच्याकने
मायबोली वर धाग्याचा प्रवाह अगदी सराईत पणे बदलला जातो. Happy

मास्तुरे, अडवाणी ८३ आणि वाजपेयी ८६ राहिले की, का सोयिस्करपणे विसरले.....>> अडवाणी राहु देत. पण वाजपेयींना या यादीत घातल्याबद्दल आगाउंचा नीषेध.

अभिजीत्,तुमचा इ- मेल संपर्कातून द्या.किंवा

shayarhatel@gmail.com या मेलवर कळवा. तुम्हाला सभासदांची बखर, ( शिवचरित्र) पाठवतो.

तीन इतिहासकारानी जी तीन कारणे दिली आहेत, ती मी दिली आहेत. नेमकं कुणी काय कारण दिले आहे माझ्या लक्षात नाही.. नेटवर गुगलले तर तीन्ही कारणांची डिटेल्स मिळतील..

उद्या अजुन एखाद्या लुंग्या-सुंग्याने संशोधन करुन नविन प्रकरण टाकले तर तेही चर्चेला घेणार का?

रच्याकने,

सभासद हा राजारामाच्या पदरी होता ना ? आणि हि बखर त्याच्या सांगण्यावरुन लिहिलेली आहे.

शिवाय राजाराम हा सोयराबाई चा मुलगा ना ? म्हणजे मग जरी तिने ( काही ईतिहासकार म्हण्तात त्या प्रमाणे ) महाराजांना विष दिले असेल तर तिच्या मुलाच्या दरबारी असलेला व्यक्ती ( कारकुन?) तसे कसे लिहिल ?

रणजित देसाईंच्या श्रिमान योगी मधे तर त्यांनी सरळ सरळ हेच दिले आहे कि महाराजांना विषप्रयोग करण्यात आला.

पान क्रं १०२ आणि १०३ मधे जे संभाजी राजांविषयी लिहिले आहे त्यत खरेच तथ्य असेल कि हा (स्वताच्या सोयि साठी) बदलले ला इतिहास आहे ? अजुन कुठे या बाबतीत संदर्भ आहेत का ?

बाकि शिवदुताचे विमान धरणीकंप, उल्कापात, धुमकेतु आहेच. तरी पण अभ्यास क्रमा मधे होतं कि सभासदाची बखर हि सर्वात विश्वासार्ह आहे म्हणून.....

राजाराम हा सोयराबाईंचा मुलगा जरी असला,तरी महाराजांना विष दिल्याचा आरोप
पत्नी ६.सकवारबाई (गायकवाड ) यांचेवर केला जातो,किंवा तशी वदंता आहे.त्यामुळे सभासदांची बखर जेन्युईन मानायला हरकत नसावी.

अभिजीत, ही घ्या बखरीची लिंक

http://www.scribd.com/doc/17158123/-

विकिपेडियावर शिवाजी महाराजांच्या आठ पत्न्याम्ची नावे आहेत. त्याच्या हायपरलिंकवर क्लिक केले की सकवारबाईच्याबद्दल जास्त काही लिहिलेले नाही.. सोयराबाईबाबत काय आहे, ते वर दिले आहे.

औरंगजेबाच्या ८८ वर्षे जगण्याचं रहस्य काय?

कसलं डोंबलाचं रहस्य! शिवाजी महाराज फक्त ५२ वर्षेच जगले हेच तर औरंग्याच्या दीर्घायुष्याचं रहस्य! Sad

Happy

Pages