Submitted by वर्षा_म on 14 June, 2011 - 06:16
नास्तिक असुन तुला
दर्शनाला नेणारी मी
माझ्या इच्छेखातर
येणारा तू
हार-फुलांचा भाव करत
ताट घेणारी मी
दारातल्या भिक्षुकांना
मदत करणारा तू
रांगेत पुढे जाण्यासाठी
धडपडणारी मी
देवळाची सुबकता
न्याहाळाणारा तू
चिडुन नमस्कारासाठी
तुला खुणावणारी मी
देवळातली प्रसन्नता
अनुभवणारा तू
देवळातही चपलेची
काळजी करणारी मी
गरजुने नेली असेल
विचार करणारा तू
खरेच देव नक्की
कुणाला पावत असेल
माझ्यासारख्या आस्तिकाला
की तुझ्यासारख्या नास्तिकाला?
गुलमोहर:
शेअर करा
वर्षा, छान जमलिये कविता
वर्षा, छान जमलिये कविता
नास्तिकाला शब्दात मांडण्याचा
नास्तिकाला शब्दात मांडण्याचा छान प्रयत्न.
मस्त आहे
मस्त आहे
व्वा ..... छान
व्वा ..... छान मांडलंय.
कवितेतली ’ती/मी’, पूजेचा व्यवहार सांभाळतेय;
तर ’तो’, त्याच्या व्यवहारातून पूजा घडवतोय.
चांगला विचार आहे. अभिनंदन!
चांगला विचार आहे. अभिनंदन!
चांगला प्रश्न आहे! आवडलं..
चांगला प्रश्न आहे! आवडलं..
मस्त गं वर्षे......आवडेश
मस्त गं वर्षे......आवडेश
मस्त गं वर्षे......आवडेश
मस्त गं वर्षे......आवडेश
ह्म्म्म्म विचार चांगला आहे
ह्म्म्म्म विचार चांगला आहे खरं!!
खरंच तिला दर्शनासाठी देवळात
खरंच तिला दर्शनासाठी देवळात जायची गरज आहे? आणि तो नास्तिक? च्च च्च! बिच्चारा!
वर्षे, नाईस वन.
वर्षे, नाईस वन.
धन्यवाद खरंच तिला दर्शनासाठी
धन्यवाद


खरंच तिला दर्शनासाठी देवळात जायची गरज आहे? >> हे ही बरोबरच आहे
च्च च्च! बिच्चारा! >>> आणि हे ही
वर्षे, कविताच चांगल्या करतेस
वर्षे, कविताच चांगल्या करतेस विडंबनापेक्षा..

मला खूप आवडली..
थोडं शुद्धलेखनाकडे लक्ष दे..
खुनावणारी च्या जागी खुणावणारी हवंय.
भारी. एक नंबर
भारी. एक नंबर
वर्सन्माय, ही कविता मला का
वर्सन्माय, ही कविता मला का सुचली नै असं वाटलं. नेमक्या शब्दात मस्त बसलीय.
मस्त..! नास्तिकपणाचा एका
मस्त..! नास्तिकपणाचा एका वेगळ्या नजरेने केलेला विचार प्रचंड आवडला.
वर्षे, छान जमलिये कविता
वर्षे, छान जमलिये कविता
आवडली 
वर्षे, हे कशाचं विडंबन आहे?
वर्षे, हे कशाचं विडंबन आहे?
आवडली कविता
आवडली कविता
छान गं वर्षाराणी
छान गं वर्षाराणी
कविता खुपच आवडली. त्या
कविता खुपच आवडली. त्या नास्तिकाला देवाची गरज नाही कारण त्याच्या मनात च देव वसलेला आहे व त्याच्या क्रुतीत देवाचे दर्शन होत आहे. तुमच मात्र अस झाल आहे की "मनी नाही भाव आणि देवा मला पाव"..... (इट्स अ जोक)
छान आहे आवडली या आधी ही तुझी
छान आहे आवडली
या आधी ही तुझी अशीच कविता वाचल्याचे आठवते.
खुप आवडली. पुलेशु
खुप आवडली. पुलेशु
आवडली कविता
आवडली कविता
सही आहे.
सही आहे.
हे कशाचं विडंबन आहे? >>>
हे कशाचं विडंबन आहे? >>> चिमण्या गुन्हेगार कितीही चांगले वागायचा प्रयत्न करु देत.. तुझ्यासारखे लोक त्याला काही सुधारु देणार नाहीत
दक्षे धन्स ग.. केलाय बदल
धन्यवाद
छान.
छान.
व॑र्षा, कवितेचा आशय खूप आवडला
व॑र्षा, कवितेचा आशय खूप आवडला
देवळातही चपलेची काळजी करणारी
देवळातही चपलेची
काळजी करणारी मी
गरजुने नेली असेल
विचार करणारा तू
'गरजु' च्या रुपात येवुन नास्तिकालाच दर्शन देणार
आस्तिक शोधतोय रोज देवळात
छान प्रश्न मांडलास अन प्रश्नातच उत्तर लिहीलेस
मस्त थोडं शुद्धलेखनाकडे लक्ष
मस्त

थोडं शुद्धलेखनाकडे लक्ष दे..>>> २ वर्ष झाली माझ्याकडे क्लास लाव सांगतेय
Pages