पापलेट जर अगदीच मोठे असतील तर त्याच्या तुकड्या करुन घ्या. मिडीयम असतील आणि कमी जणांसाठी हवे असतील तर पापलेटचे शेपुट, बाजूची परे कापा. डोके आणि पोटाच्या मध्ये चिर देउन पोटातील घाण काढुन टाका आता त्या पापलेटच्या पोटांना वरुन चिरा द्या खालील प्रमाणे.
हे चिरा पाडलेले पापलेट स्वच्छ धुवुन घ्या. बघा कशी मस्त चकचकीत गोरी गोरी दिसतायत.
आता पापलेटांना वाटण, हळद, मसाला, मिठ लावुन जर धिर असेल तर थोडावेळ मुरवा.
आता तवा गॅसवर ठेवा आणि चांगला तापू द्या. जर तवा चांगला तापला नसेल तर तुकड्या चिकटतात. तापलेल्या तव्यावर तेल सोडा ते कालथ्याने पसरवा आणि त्यावर पापलेट शॅलोफ्राय करण्यासाठी सोडा.
२-३ मिनीटांनी पलटा ती बाजु शिजली की परत पलटा आणि पहीली बाजू शिजवुन परत दुसर्या बाजूला पलटून गॅस बंद करा. समजला का अलटी पलटी गेम ? जर कठिण वाटत असेल तर पाच मिनीटे एक बाजु शिजवुन पलटी करुन दुसरी बाजु पाच मिनीटे शिजवा आणि गॅस बंद करा. शिजवता गॅस मध्यम आचेवर किंवा त्यापेक्षा कमी ठेवा.
झाले तयार पापलेट. वास सुटलाय बघा.
ताजे पापलेट ओळखण्यासाठी ते कडक आहेत का बघा. तसेच त्यांच्यावर सुरकुत्या पडलेल्या नसल्या पाहीजेत.
जागु, आपल्या अशा या एकापेक्षा
जागु,
आपल्या अशा या एकापेक्षा एक सरस (सचित्र,तिखटमीठ लावलेल्या :हाहा:) लेखामुळे आमचा संयम सुटत चालला आहे, तुमच्या लेखाचा परिणाम म्हणुन आम्ही जर आता मासे खाण्याचा मोह झालाच तर त्याला जबाबदार तुम्हीच असाल याची कृपया नोंद घ्यावी.
स्वतःला हवे तसे कापुन
स्वतःला हवे तसे कापुन घेतो.>>>>>>>
मस्त! उद्या आमच्याकडे पापलेटच
मस्त! उद्या आमच्याकडे पापलेटच आहे.
भरलं पापलेट करताना आलं,लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद, थोडा चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस, ओले खोबरे, मीठ असे बारीक वाटून घ्यायचे. पापलेटला तोंडापासून शेपटी पर्यंत सुरीने कापून पोकळ करायचे. काटा एका बाजूला राहिल असे कापायचे. वाटण भरुन तांदळाच्या पिठात घोळवुन तव्यावर शॅलोफ्राय करावे.
<< जर आता मासे खाण्याचा मोह
<< जर आता मासे खाण्याचा मोह झालाच तर त्याला जबाबदार तुम्हीच असाल याची कृपया नोंद घ्यावी. >> अनिलभाय, डायरेक्ट 'मत्स्यमाफिया'लाच आवाज देताय तुम्ही !
अनिल खा हो बिनधास्त. शेवटी
अनिल खा हो बिनधास्त. शेवटी आपण सगली हाडा-मासांची माणसच आहोत.
स्वाती, संदीप, भाऊ
मस्त खरपुसवले आहेस... तो
मस्त खरपुसवले आहेस...
तो पापलेट काट्यांसकट अखा खाउन टाकावा असं मन होतंय...
जर तवा चांगला तापला नसेल तर तुकड्या चिकटतात. >> महात्त्वाची माहीती मिळाली... धन्स जागुतै..
जागुले एकदम तोंपासु फोटो
जागुले एकदम तोंपासु फोटो ग.... मला १४ वर्षांपुर्वीचा माझा प्रयोग आठवला.. छोटा भाउ येणार म्हणुन पापलेट आणला.. पुस्तकात पाहुन फ्राय पण केले... जेवायला बसल्यावर भावाला विचारले कसा झाला.. तर म्हणे "महागातला मासा , मसाला , तेल सगळे आहे.. फक्त चव नाही"
आता तुझ्या रेसिपीने ट्राय करेल
वा वा !! फारच तोंपासू !!!!!!
वा वा !! फारच तोंपासू !!!!!!
सकाळी सकाळी फिश फ्राय खावेसे वाटतायत !!!!
ही पहा पन्नाची भरल्या पापलेटची रेसिपी..
http://www.maayboli.com/node/9509
काय मस्त दिसतंय.. लगेच खावंसं
काय मस्त दिसतंय.. लगेच खावंसं वाटतंय.
जागूताई, नेहेमीप्रमाणेच एकदम हिट item ची रेसिपी टाकलीस. thanks,
इथे कधी कधी मिळतात हे छोटे पापलेट.
आख्खे पापलेट कधी try केले नाही. पापलेट शिजले आहे कि नाही, ते कसे ओळखायचे? काही टिप्स ?
( आख्खे पापलेट आहे, म्हणून विचारते आहे. ) कि अंदाजे झालेय असे वाटले, कि तव्यावरुन उतरवू?
आहाहा ..... आंबटवरण, गरमागरम
आहाहा ..... आंबटवरण, गरमागरम भात आणि पापलेटाची तळलेली तुकडी.
या पापलेटांचा मोठा दादा - खापरी पापलेट. ते तर अवाच्या सवा महाग असतं. पण डेलिकसी!
वा,वा जागू. पापलेट हा मी
वा,वा जागू. पापलेट हा मी खाल्लेला पहिला मासा आणि नंतरही घरी ( माहेरच्या ) तुरळक प्रमाणात फिश केलं गेलं तेव्हा जास्त करुन पापलेटच आणलं गेलं. ह्या वेळेच्या भारतवारीत आमच्या शेजारच्या काकूंनी तळलेली दोन आख्खी पापलेटं दिली होती खास माझ्यासाठी. आत्ताही ती चव आठवून पाणी सुटलं तोंडाला
रच्याकने, माझी एक सारस्वत मैत्रीण म्हणायची की पापलेट बटाट्यासारखा लागतो.
<< ते तर अवाच्या सवा महाग
<< ते तर अवाच्या सवा महाग असतं >> -
(No subject)
ए चला फिश जीटीजी करुया. ससून
ए चला फिश जीटीजी करुया.
ससून डॉक, भाईंदर कुठूनतरी टोपली आणूया.
भाउ अगो बटाटा ? मामी माझ्या
भाउ
अगो बटाटा ?
मामी माझ्या सासरी हे कॉम्बीनेशन आवडत वरण किंवा आंबटवरण आणि तळलेल्या तुकड्या.
मानसी कोलंबी, माकुळ आणि खेकडे सोडून बाकीचे बरेचसे मासे पटकन शिजणारे असतात. जर अशी शंका येत असेल तर गॅस मिडीयम पेक्षा थोडा कमी ठेउन ७- ८ मिनीटे एक एक बाजु शिजवायची. तसा पापलेटला जास्त वेळ लागत नाही. अगदीच शंका आली तर थोडासा पिस काढुन टेस्ट करायचा.
पराग धन्यवाद.
वर्षा जाउदे ग लहान होतीस तेंव्हा.
चातका पहीला बाहुला नेहमीचाच अपेक्षित होता. पण तो हंडितला कशासाठी ?
>>आंबटवरण, गरमागरम भात आणि
>>आंबटवरण, गरमागरम भात आणि पापलेटाची तळलेली तुकडी.>> वा मामी क्या कही!! मस्त मस्त मस्त!!
भाऊ काका
ए चला फिश जीटीजी करुया.>>> बाबल्या मी पयला
सगळे तुटून पडलेत पापलेटांवर
सगळे तुटून पडलेत पापलेटांवर
तायग्या, ठरव बगाया.
तायग्या, ठरव बगाया.
कधी करायचा मासे गटग ?
कधी करायचा मासे गटग ?
खय करुया सांग. ( आता जागूच्या
खय करुया सांग. ( आता जागूच्या बाफवर मालवणी धयकालो )
नायतर बाबु आपण असं करुया नॉनव्हेज स्पर्धाच ठेवूया आणि या सगळ्यांना भाग घ्यायला सक्तीचे करुया नंतर आपण जज होवया
नीलु जज होण्यापुर्वी जज ची
नीलु जज होण्यापुर्वी जज ची परिक्षा द्यावी लागेल.
पण तो हंडितला कशासाठी ? >>>
पण तो हंडितला कशासाठी ? >>> त्याला मी खुप समजावलं नको येउस्..जागुतै आहे, तु दिसताच शिजवुन वाढेल ....तरी आला....
बघ अता तु काय करायचंय त्याचं...
कालवण, सुकं, खर्पुसवणी..
जल्ला आता पहिले स्पर्धक जजची
जल्ला आता पहिले स्पर्धक जजची परीक्षा घेणार आणि नंतर जज स्पर्धकची??? अरेरे कलियुग!! कलियुग!!
बरं बोल काय परीक्षा द्यायचीय?
भाऊ नमसकर ......
भाऊ नमसकर ...... 'सारेतिनशान जोरी........' मस्तच आहे.
चातका छोड दिया उसे. नीलू आधी
चातका छोड दिया उसे.
नीलू आधी जजने रेसिपीज करुन दाखवायच्या आणि स्पर्धकांना खिलवायच्या. मग वोट सिस्टीमने जज निवडण्यात येतील.
ए चला फिश जीटीजी करुया. ससून
ए चला फिश जीटीजी करुया.
ससून डॉक, भाईंदर कुठूनतरी टोपली आणूया. >>> बाबु, फतेह की बात!!
जागू, मी फक्त पापलेट आणि
जागू, मी फक्त पापलेट आणि मांदेलीच खातो तेंव्हा शेवटच्या फोटोतल्या दोन तुकड्या पाठवून दे इकडे
हे माझ्याकडुन
मला तर नेहमीच ५००- ६०० रुपये
मला तर नेहमीच ५००- ६०० रुपये एक मोठे पापलेट असे मिळालेय भारतात.
तसेही पुण्यात मासे आणायला खूप त्रास आहे...
यम्मी दिसताहेत
यम्मी दिसताहेत
एकदम झकास! महेश लंच होम
एकदम झकास! महेश लंच होम सारखे. तुमच्या या सिरीज (मासे) मध्ये आतापर्यंत बांगडे येउन गेले का?
Pages