मासे ३२) पापलेट

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 June, 2011 - 02:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पापलेट
हळद
मसाला
मिठ
आल-लसुण्-मिरची-कोथिंबीर वाटण (ऑप्शनल)
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

पापलेट जर अगदीच मोठे असतील तर त्याच्या तुकड्या करुन घ्या. मिडीयम असतील आणि कमी जणांसाठी हवे असतील तर पापलेटचे शेपुट, बाजूची परे कापा. डोके आणि पोटाच्या मध्ये चिर देउन पोटातील घाण काढुन टाका आता त्या पापलेटच्या पोटांना वरुन चिरा द्या खालील प्रमाणे.

हे चिरा पाडलेले पापलेट स्वच्छ धुवुन घ्या. बघा कशी मस्त चकचकीत गोरी गोरी दिसतायत.

आता पापलेटांना वाटण, हळद, मसाला, मिठ लावुन जर धिर असेल तर थोडावेळ मुरवा.

आता तवा गॅसवर ठेवा आणि चांगला तापू द्या. जर तवा चांगला तापला नसेल तर तुकड्या चिकटतात. तापलेल्या तव्यावर तेल सोडा ते कालथ्याने पसरवा आणि त्यावर पापलेट शॅलोफ्राय करण्यासाठी सोडा.

२-३ मिनीटांनी पलटा ती बाजु शिजली की परत पलटा आणि पहीली बाजू शिजवुन परत दुसर्‍या बाजूला पलटून गॅस बंद करा. समजला का अलटी पलटी गेम ? जर कठिण वाटत असेल तर पाच मिनीटे एक बाजु शिजवुन पलटी करुन दुसरी बाजु पाच मिनीटे शिजवा आणि गॅस बंद करा. शिजवता गॅस मध्यम आचेवर किंवा त्यापेक्षा कमी ठेवा.
झाले तयार पापलेट. वास सुटलाय बघा.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी १ पापलेट पाहिजेच ना.
अधिक टिपा: 

ताजे पापलेट ओळखण्यासाठी ते कडक आहेत का बघा. तसेच त्यांच्यावर सुरकुत्या पडलेल्या नसल्या पाहीजेत.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु,
आपल्या अशा या एकापेक्षा एक सरस (सचित्र,तिखटमीठ लावलेल्या :हाहा:) लेखामुळे आमचा संयम सुटत चालला आहे, तुमच्या लेखाचा परिणाम म्हणुन आम्ही जर आता मासे खाण्याचा मोह झालाच तर त्याला जबाबदार तुम्हीच असाल याची कृपया नोंद घ्यावी.
Lol

मस्त! उद्या आमच्याकडे पापलेटच आहे.

भरलं पापलेट करताना आलं,लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद, थोडा चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस, ओले खोबरे, मीठ असे बारीक वाटून घ्यायचे. पापलेटला तोंडापासून शेपटी पर्यंत सुरीने कापून पोकळ करायचे. काटा एका बाजूला राहिल असे कापायचे. वाटण भरुन तांदळाच्या पिठात घोळवुन तव्यावर शॅलोफ्राय करावे.

<< जर आता मासे खाण्याचा मोह झालाच तर त्याला जबाबदार तुम्हीच असाल याची कृपया नोंद घ्यावी. >> अनिलभाय, डायरेक्ट 'मत्स्यमाफिया'लाच आवाज देताय तुम्ही ! Wink

मस्त खरपुसवले आहेस...
तो पापलेट काट्यांसकट अखा खाउन टाकावा असं मन होतंय...
3D%20Smiles%20(46).giffish-bowll-3.gif

जर तवा चांगला तापला नसेल तर तुकड्या चिकटतात. >> महात्त्वाची माहीती मिळाली... धन्स जागुतै.. Happy

जागुले एकदम तोंपासु फोटो ग.... मला १४ वर्षांपुर्वीचा माझा प्रयोग आठवला.. छोटा भाउ येणार म्हणुन पापलेट आणला.. पुस्तकात पाहुन फ्राय पण केले... जेवायला बसल्यावर भावाला विचारले कसा झाला.. तर म्हणे "महागातला मासा , मसाला , तेल सगळे आहे.. फक्त चव नाही" Sad

आता तुझ्या रेसिपीने ट्राय करेल Happy

काय मस्त दिसतंय.. लगेच खावंसं वाटतंय.
जागूताई, नेहेमीप्रमाणेच एकदम हिट item ची रेसिपी टाकलीस. thanks, Happy
इथे कधी कधी मिळतात हे छोटे पापलेट.
आख्खे पापलेट कधी try केले नाही. पापलेट शिजले आहे कि नाही, ते कसे ओळखायचे? काही टिप्स ?
( आख्खे पापलेट आहे, म्हणून विचारते आहे. ) कि अंदाजे झालेय असे वाटले, कि तव्यावरुन उतरवू?

आहाहा ..... आंबटवरण, गरमागरम भात आणि पापलेटाची तळलेली तुकडी.

या पापलेटांचा मोठा दादा - खापरी पापलेट. ते तर अवाच्या सवा महाग असतं. पण डेलिकसी!

वा,वा जागू. पापलेट हा मी खाल्लेला पहिला मासा आणि नंतरही घरी ( माहेरच्या ) तुरळक प्रमाणात फिश केलं गेलं तेव्हा जास्त करुन पापलेटच आणलं गेलं. ह्या वेळेच्या भारतवारीत आमच्या शेजारच्या काकूंनी तळलेली दोन आख्खी पापलेटं दिली होती खास माझ्यासाठी. आत्ताही ती चव आठवून पाणी सुटलं तोंडाला Happy
रच्याकने, माझी एक सारस्वत मैत्रीण म्हणायची की पापलेट बटाट्यासारखा लागतो.

भाउ Lol

अगो बटाटा ? Lol

मामी माझ्या सासरी हे कॉम्बीनेशन आवडत वरण किंवा आंबटवरण आणि तळलेल्या तुकड्या.

मानसी कोलंबी, माकुळ आणि खेकडे सोडून बाकीचे बरेचसे मासे पटकन शिजणारे असतात. जर अशी शंका येत असेल तर गॅस मिडीयम पेक्षा थोडा कमी ठेउन ७- ८ मिनीटे एक एक बाजु शिजवायची. तसा पापलेटला जास्त वेळ लागत नाही. अगदीच शंका आली तर थोडासा पिस काढुन टेस्ट करायचा.

पराग धन्यवाद.

वर्षा Lol जाउदे ग लहान होतीस तेंव्हा.

चातका पहीला बाहुला नेहमीचाच अपेक्षित होता. पण तो हंडितला कशासाठी ?

>>आंबटवरण, गरमागरम भात आणि पापलेटाची तळलेली तुकडी.>> वा मामी क्या कही!! मस्त मस्त मस्त!!

भाऊ काका Rofl

ए चला फिश जीटीजी करुया.>>> बाबल्या मी पयला Proud

खय करुया सांग. ( आता जागूच्या बाफवर मालवणी धयकालो Proud )
नायतर बाबु आपण असं करुया नॉनव्हेज स्पर्धाच ठेवूया आणि या सगळ्यांना भाग घ्यायला सक्तीचे करुया नंतर आपण जज होवया Biggrin

पण तो हंडितला कशासाठी ? >>> त्याला मी खुप समजावलं नको येउस्..जागुतै आहे, तु दिसताच शिजवुन वाढेल ....तरी आला....

बघ अता तु काय करायचंय त्याचं...
कालवण, सुकं, खर्पुसवणी.. Wink

जल्ला आता पहिले स्पर्धक जजची परीक्षा घेणार आणि नंतर जज स्पर्धकची??? अरेरे कलियुग!! कलियुग!! Lol
बरं बोल काय परीक्षा द्यायचीय? Happy

भाऊ नमसकर ...... Rofl 'सारेतिनशान जोरी........' मस्तच आहे.

चातका छोड दिया उसे.

नीलू आधी जजने रेसिपीज करुन दाखवायच्या आणि स्पर्धकांना खिलवायच्या. मग वोट सिस्टीमने जज निवडण्यात येतील. Lol

जागू, मी फक्त पापलेट आणि मांदेलीच खातो Proud तेंव्हा शेवटच्या फोटोतल्या दोन तुकड्या पाठवून दे इकडे Happy

हे माझ्याकडुन Happy

मला तर नेहमीच ५००- ६०० रुपये एक मोठे पापलेट असे मिळालेय भारतात.
तसेही पुण्यात मासे आणायला खूप त्रास आहे...

एकदम झकास! महेश लंच होम सारखे. तुमच्या या सिरीज (मासे) मध्ये आतापर्यंत बांगडे येउन गेले का?

Pages