मासे ३२) पापलेट

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 June, 2011 - 02:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पापलेट
हळद
मसाला
मिठ
आल-लसुण्-मिरची-कोथिंबीर वाटण (ऑप्शनल)
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

पापलेट जर अगदीच मोठे असतील तर त्याच्या तुकड्या करुन घ्या. मिडीयम असतील आणि कमी जणांसाठी हवे असतील तर पापलेटचे शेपुट, बाजूची परे कापा. डोके आणि पोटाच्या मध्ये चिर देउन पोटातील घाण काढुन टाका आता त्या पापलेटच्या पोटांना वरुन चिरा द्या खालील प्रमाणे.

हे चिरा पाडलेले पापलेट स्वच्छ धुवुन घ्या. बघा कशी मस्त चकचकीत गोरी गोरी दिसतायत.

आता पापलेटांना वाटण, हळद, मसाला, मिठ लावुन जर धिर असेल तर थोडावेळ मुरवा.

आता तवा गॅसवर ठेवा आणि चांगला तापू द्या. जर तवा चांगला तापला नसेल तर तुकड्या चिकटतात. तापलेल्या तव्यावर तेल सोडा ते कालथ्याने पसरवा आणि त्यावर पापलेट शॅलोफ्राय करण्यासाठी सोडा.

२-३ मिनीटांनी पलटा ती बाजु शिजली की परत पलटा आणि पहीली बाजू शिजवुन परत दुसर्‍या बाजूला पलटून गॅस बंद करा. समजला का अलटी पलटी गेम ? जर कठिण वाटत असेल तर पाच मिनीटे एक बाजु शिजवुन पलटी करुन दुसरी बाजु पाच मिनीटे शिजवा आणि गॅस बंद करा. शिजवता गॅस मध्यम आचेवर किंवा त्यापेक्षा कमी ठेवा.
झाले तयार पापलेट. वास सुटलाय बघा.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी १ पापलेट पाहिजेच ना.
अधिक टिपा: 

ताजे पापलेट ओळखण्यासाठी ते कडक आहेत का बघा. तसेच त्यांच्यावर सुरकुत्या पडलेल्या नसल्या पाहीजेत.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू खूपच सुरेख रेसिपी आणि कठीण सुधा दिसत नाही करायला सोपी आहे. आणि पापलेट खायचं म्हणजे तोपंसू अगदी. आणि फारच कमी लोकांना आवडत नसेल शाकाहारी सोडले तर.

पावसाळ्यात आता हि काळ्या पाकाची पापलेट भरपूर भेटतात साध्या होड्याना तुला माहीतच असेल.

जिप्स्या भारी.

मिरा, सावली, राज धन्स.
राज बांगडे झाले आहेत. मासे-मटण फॅन क्लब मध्ये सगळ्या लिंक आहेत.

होय मया बहुतेक सगळ्याच मांसाहारींना पापलेट आवडिच असत.

बहुतेक ती रेसीपी कालवणाची दिसतेय (फोटो दिसत नाही). तळलेल्या बांगड्यांची रेसीपी लिहायचं जरा मनावर घ्या. घरी होतात पण काहि वेगळं दिसलं तर तसं करायला सांगेन. Happy

http://www.maayboli.com/node/18075

<< होय मया बहुतेक सगळ्याच मांसाहारींना पापलेट आवडिच असत. >> पण बर्‍याच अस्सल मासेहारीना मात्र पापलेटचं खास आकर्षण नसतं, हेंही खरं ; त्याना पापलेट अगदीच मिळमिळीत वाटतं.
<< घरी होतात पण काहि वेगळं दिसलं तर तसं करायला सांगेन. >> राजजी, " करायला सांगेन " पेक्षां "करून बघीन " म्हणा; सोपं असतं तें पण खरंच खूप गंमत असते स्वतः करण्यातही ! स्वानुभवावरून सांगतोय . Wink

मी कालच खाल्ले

१५० ला ४ छोटे होते पण ठिक झालेले,
कधि कधि पापलेट खाउन पोटच भरत नाहि सुरमई पाहिजेच
आनते रविवारि

जागु.. मी तर मासे मोजून हिशोब लावत बसले.. प्रत्येकी कित्ती कित्ती ..स्लर्प!!!!!!!!!!!!!! Proud

टाक टाक सुरमई .. वाट पाहतेय..

जागू.. तुला माझी खास रिक्वेस्ट .. मोठे क्रॅब्स चं सुकं कसं करायचं ..म्हंजे ते स्वच्छ करण्यापास्न सांग ना प्लीज!!!!

वर्षू अग परवाच आणले होते क्रॅब्स मी रस्सा केला होता. आता परत आणले की नक्की सुके करेन आणि रेसिपी देईन.

टिना संदेश खंडालकरने मला वाटत फक्त शेअर केलेय. त्याचा दोष नाही. सिंधुदुर्ग वाल्यांनी चोरल्या आहेत. पण त्याने खुलासा आणि माफी मागीतली आहे.

Pages