पहिल्यांदा आलेला तुझा तो नकार
वळीवाच्या सरीसारखा अनपेक्षित
तरीही चिंब चिंब भिजवुन गेलेला
माझे मित्र माझी चेष्टा उडवत असताना
अन तुझ्या मैत्रीणी नकळत हसताना
हळुच झालेली ती चोरटी नजरभेट
एकांकिके नंतरच्या एकांतातले ते क्षण
"बोल बोल "म्हणणार्या मनाला थांबवणारी ती आठवण
अन तुझं ते नेहमीचच गोंधळवणारं स्मितहास्य
बरंचसं मौन अन थोडासा संवाद
अचानक पडलेल्या विजेसारखा तुझा प्रतिसाद
" काय मग?, रेग्युलर फ्लर्टींग की सीरीयस ? "
मग श्रावणातल्या सरींसारख्या नित्याच्या गाठीभेटी
हिरव्यागर्द संध्याकाळी पडलेली तुझी ती चिंब मिठी
लाजत लाजत माझ्यात विरघळुन गेलेली
.
.
.
आळवावरचे मोती तू 'मुठीत घेवु' पाहताना
मीही हसत राहिलो 'विरुन सारे' जाताना
पाउस मात्र कुठे गेला ? मला खरंच माहीत नाही
एकएक गोष्टी कशा हातात पकडलेल्या गारांसारख्या
विरघळुन गेल्या नकळत ...अगदी नसल्यासारख्या
आणि ती विचारते ........" आजकाल कविता का लिहित नाहीस ? "
----रकीब
----रकीब
सहीच... आवडली...
सहीच... आवडली...
आवडेश
आवडेश
सही आहे. अहो पण ही का.का.क.
सही आहे. अहो पण ही का.का.क. मधे का?
नॉर्मल कवितेमधे हलवा.
<<आणि ती विचारते ........"
<<आणि ती विचारते ........" आजकाल कविता का लिहित नाहीस ?,<<
सहीये!!