अजुनही मी तुझ्याच आठवणीत रमतो ,
पन कोनाला सांगत नाही .....
रोज तुझी नवी आठवण ,
तुला मिस करतोय ते मनाला सांगत नाही !
-----------------------------------------
- सक्षम दळवी
सप्त सुरांनी बहरलेल्या
सायंकाळी काहुरलेल्या
नूपुरातूनी निनादलेल्या
सावल्या मी हरविल्या
पापण्यातून लाह्यांपरि निखळल्या
व्यथित अशा त्या मनी न मावल्या
परि मला अती भावल्या
मुक्तपणे निसटणार्या तुझ्या सावल्या
सागराच्या
सागराच्या किनार्यावर
मन हे झुलतय..झुरतय
तु जर नसशिल तर
माझ्या जिवनाला काय अर्थय
सरता सरता
सरता सरता सरले अजुन एक वर्ष
नव वर्षाच्या स्वागतात नाही काही हर्ष
चांगले वाईट बरेच काही यामधे घडले
शौर्याचे ते मरण पाहता मुंबईकर ही रडले
नव वर्षाच्या नव्या सकाळी घेऊ एकच ध्यास
ठेचून काढू त्यांना जे करतील असा प्रयास
नवरया मागे
नवरया मागे बायको धावते सकाळ संध्याकाळ
खर्च करवते नको तेवढा जाते तिचे रे काय
काय तीच्या रे मनात दडले नकळे कधी कुणा
आवाज चढता लगेच काढे ती रे आपल फणा
राजकारण-रा
राजकारण-राजकारण
सत्तेसाठी अब्रुतारण
राजकारण गटारगन्गा
हाही नन्गा तोही नन्गा
विधान सभेत लोक्सभेत
जोमात सुरु धान्गडधिन्गा
हाही नन्गा तोही नन्गा
कधी इकडे
कधी इकडे कधी तिकडे बॉम्ब एक फुट्टो
कुण्या एक संसाराचा धागा मधेच तुट्टो
करतं हे जे कुणी त्याला जात नाही धर्म
काय होतं साध्य त्यांना करता अशी कर्म
क्षणभराचं
क्षणभराचं उमलणं संपुर्ण आयुश्याला फुलवतं
क्षणभर का होईना स्वपनांच्या हिंदोळ्यावर झुलवतं
उमलल्या
उमलल्या नंतर फुलणं हे स्वाभविक असतं
फुलालाच नव्हे तर मनाचही तसच असतं
शेवटच्या
शेवटच्या क्षणाला
तुझी आठवण येते
आपल कुणीतरी आहे
हि जाणीव मनाला
समाधान देते.
तु आणि मी
तु आणि मी एका नदीचे दोन काठ
दोन जिवांनी दूरूनच द्यायची साथ
दीपा....
आज जुनेच
आज जुनेच बहाणे
नव्याने देत आहे..
नयनातिल प्रेमाचे
नक्षत्र मनात साठवित आहे..
प्रिति
ब-याच महिन्यांनि लिहित आहे..मंडळी संभाळुन घ्या..
मला तुझी
मला तुझी अभिलाषा गं
उगाच वेडी आशा ग॑
मना तुझ्या त्या कळेल का?
या डोळयांची भाषा गं
जयदीप ओक
**********
मी दुसर्यांन सारखा होऊ शकत नाही कारण मी माझत्वं घालवु शकत नाही.
संसारचे
संसारचे सारेच सूर छेदील का एकच ताण
नाही जमले आज तरीही उद्या पुन्हा करीन असे ठाण
विकती हे
विकती हे आज इथे स्वत्त्वाला,
अन मजला वैश्या ही हे म्हणती..
काढूनी माझ्या अब्रुचे धिंडवडे,
स्वतास पुरुषोत्तम गणती..
दैव आपल्या
दैव आपल्या मुठीत आहे असं वाटतं
जेव्हा मनासारखं मिळत असतं यश
आपण दैवाच्या मुठीत आहोत हे कळतं
जेव्हा अनुभवायला मिळतं अपयश
सहज
सहज
अजुनही मी
अजुनही मी तुझ्याच आठवणीत रमतो ,
पन कोनाला सांगत नाही .....
रोज तुझी नवी आठवण ,
तुला मिस करतोय ते मनाला सांगत नाही !
-----------------------------------------
- सक्षम दळवी
आकाशातील
आकाशातील चंद्रालापण
वाटतोय तुझा हेवा...
ध्रुव सुध्दा सांगतोय
तुझ्यावरी दावा
सोन्दयॉची महती तुझी
सर्व जगात माजलीय
उडानटपु पोरांची शिटी
फक्त तुझ्यासाठी वाजलीय
गंधरल्या
गंधरल्या मनात उमलुनि स्वप्न आज,
निशब्द शांत भास बिलगुनि पापण्यास,
स्पर्श तुझ्या ओठांचा गाली जुनाच माझ्या,
खुलवुनि रात्र गेला भुलवुनि रे मनास.......
sanky
sanky सहीच
सप्त सुरांनी बहरलेल्या
सायंकाळी काहुरलेल्या
नूपुरातूनी निनादलेल्या
सावल्या मी हरविल्या
पापण्यातून लाह्यांपरि निखळल्या
व्यथित अशा त्या मनी न मावल्या
परि मला अती भावल्या
मुक्तपणे निसटणार्या तुझ्या सावल्या
शमा
माझी पण एक
माझी पण एक चारोळी--
ईथे प्रत्येक घराचे दार बंद
नी प्रत्येक जण घरात बसुन आहे
शेजार्याची बेल वाजल्यावर मात्र
आय होल मधुन पाहण्याचा छंद आहे!!
माझ्या
माझ्या जिवनात तुझ्या सहवासाची
आकाशा येवढी छाया देशील का ?
तुजसाठी झालो मी वेडा
मजसाठी खुळी तु होशिल का ?
झाली
झाली निवडणूक
झाले "चुनाव" सांगू कैसे?
उमटे चित्र आगळे ऐसे -
राजदंडा मिळे हिर्याची मूठ,
फक्त पैसे खायला सूट !
नकोत स्वस्त गहू-तांदूळ-
ते तर असतात वातूळ...
घेर पोटाचाच मोजून,
उगीच घेतील टीडीएस कापून,
फुस्स हवाच जाईल निघून,
नेहमीच परतावा शून्य म्हणून
मुठीवर आवळला पंजा,
करेल तुला-मलाच गंजा
जपून ठेव सांगतो ईंगित
ख्ररी गम्मत असते शब्दातीत
लोक वेगळे अन शाही वेगळी
हीच परंपरा अपुली आगळी !!
मी मागे
मी मागे वळूनी पाहता
मन दु:खी का हो होते
भय वयाचे वाढता
भुतकाळी सुख रमते
शब्द एकदा
शब्द एकदा अर्थाशी लढला
मोठा कोण यासाठी नडला
थकून जेव्हा एकटा उरला
व्यर्थ वाटले जीवन त्याला
पहाटेच्या
पहाटेच्या स्वप्नामध्ये तुझे चुंबन घेतांना
बायको ओरडली चला उठा, ऑफिसला जाताय ना!>>>>>>>>>>> हे तर अफलातूनच आहे अज्ऊन हसतोय व्वा!
तुला शोधता
तुला शोधता शोधता
मी हरवून बसलो होतो स्वतःलाच
आता तुझे विचारही नाही मनात
मी शोधत आहे माझे मलाच..
___निशिगंध
पावसाच्या
पावसाच्या थेंबाना
हातावर झेलतना
नाही का रे वाटत तुला
तु झेलतोयस माझ्या अश्रुंना
जबाबदारी
जबाबदारी सोपवून मला
तु केव्हाच झालास मुक्त
इंद्रधनुंची उधळण करताना
मागे ठेवलास काळोख फक्त
कोड्यात
कोड्यात टाकायची सवय तुझी
कधीच का नाही गं सुटायची
बघ ना ! नाहीतर तु आधी कधी
अशी नजर नाही चुकवायचीस
शब्द आहेत
शब्द आहेत दूर दूर
मनात माजल आहे भावनेच काहूर
कही केल्या सापडेना सुर
कारण, आसवानी दाटल आहे माझ ऊर
***************************
-: योगिता सावंत
Pages