बारा ए.वे.ए.ठी, १८ जुन २०११

Submitted by अनिलभाई on 3 June, 2011 - 10:13
ठिकाण/पत्ता: 
चटणी मॅनोर 3793 US Highway 1 South Monmouth Junction, New Jersey 08852

From: Northern New Jersey
Take Garden State Parkway South to Exit-130, Take Route-1 South for about 12 miles, pass Regal Cinemas on your right. Chutney Mary / Chutney Manor is on your right hand side after the 4th Traffic light between Henderson Road and Deans Lane.

From: Southern New Jersey
Take Route-130 North to Route-1 South for about 5 miles or take NJ Turnpike North to Exit-9 and continue as above.

सगळ्यानी जरुर या.

तारीख/वेळ: 
शनिवार, June 18, 2011 - 12:30 to 15:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी दुपारी १ नंतर येईन. त्याआधी ठेसनावरून रिक्षा हवी असेल तर भाईंना सांगू.

विनय Happy

१८ जूनला मला येणे जमणार नाही.
जीएस, पुनः केंव्हातरी भेटू. तुम्हाला तुमच्या उरलेल्या प्रवासासाठी शुभेच्छा.
बाकीचे, मजा करा!
धन्यवाद.

चला, आता १९ जूनपर्यंत इथे नाही आले तरी चालेल.

झक्की, तुम्ही हल्ली फार म्हणजे फारच टांग देता. अहो ते नवीन सगळे नियम इथे लिहिताना. गाडीत जे बोलाल त्याला नवीन नियम लागू होणार नाहीयेत. तेव्हा या.

खर तर नवीन नियम इथे लिहिताना पण (झक्कींनी जे लिहिले त्याला) लागू होत नाहीत. तेवढे मतस्वातंत्र्य नक्कीच आहे. झक्कींनी पोस्ट बदलण्यासाठी त्याचा फक्त आधार घेतला. काय झक्की? Happy

अहो १८ ला केळवण आहे, सौ. च्या कुणा मैत्रिणीच्या मुलीचे. नि त्यामुळे जमणार नाही.
केदार, मला मायबोलीची काळजी जास्त आहे, म्हणून मी माझे लिखाण उडवले.

झक्की, अहो कल्लोळाच्या दिवशीच लग्न झालं ना? (म्हणजे हेच कारण सांगून तुम्ही कल्लोळाला आला नव्हतात). मग आता केळवण? हे म्हणजे वरातीमागून.... Proud

काय तुम्ही पण!!! लग्नाआधी केळवण ही विशिष्ट शहरातली पद्धत असेल पण अमेरिकेत नंतरच केळवण करतात. Happy

अहो, माझ्या सौ. ला अनेक मैत्रिणी!
एकीच्या मुलाचे लग्न झाले १३ मे ला. आता एकीच्या मुलीचे लग्न आहे ऑगस्टमधे केंव्हातरी. तिचे केळवण जून १८ ला. तिसर्‍याच एकीच्या मुलाचे लग्न सप्टेंबरमधे, त्याचे केळवण १६ जुलै. नंतर आमचा एक घनिष्ठ मित्र, जो धंद्यानिमित्त सतत भारतात ये-जा करतो, नि मला भारतातल्या लोकांबद्दल सांगतो, त्याच्या मुलीचे लग्न ऑक्टोबरमधे, नि केळवण कदाचित् ऑगस्टमधे.
आणखीन माझा पुतण्याहि लग्न करायला निघाला तर विचारूच नका!
पुनः पुढल्या जून, जुलै मधे भारत यात्रा आहेच. गेलो तर कमीत किती किती दिवसात आटपावं याचे प्लॅनिंग चालू आहे. व्हिसा मिळाला तर. तेहि हजारो डॉ. लागणार असतील तर नाही. स्वस्तात स्वस्त, अगदी कमी दिवसांचा, काही कटकट न करता व्हिसा मिळाला तर बघू. नाहीतर इथूनच शुभाशिर्वाद वगैरे. त्यापेक्षा कॅलिफोर्नियातल्या नातेवाइकांना भेटायला जाईन. जास्त आनंद होतो सर्वांना.

भारतातून पुस्तके, कपडे, मसाले, आयुर्वेदिक औषधे, नि वाटाणे, फुटाणे असले काहीहि आणायचे नाही. कुणालाहि बोलवायचे नाही. कुठलेहि गटग करायचे नाही.

Pages