हिरवा चाफा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 2 June, 2011 - 07:27

हिरवा चाफा ह्या नावकडे लक्ष केंद्रित केल की वेगळच वाटत. हिरवी पालवी, हिरवी राई, हिरवागार परिसर, हिरवी पाने, गवत हेच ऐकायची आपल्याला सवय असते. पण हिरवे फुल म्हणजे जरा हटकेच. हिरव्या रंगामुळे झाडावर तो लपाछुपीच खेळत असतो. एका नजरेत सहसा ह्याचे छोटे फुल दिसत नाही.

बाळ फुलाला वास येत नाही. ज्या दिवशी फुल तयार होते त्यादिवशी ह्याचा सुगंध परिसरात दरवळायला लागतो. हिरव्या चाफ्याचा सुगंध मात्र पिवळा झाल्यावर जास्त दरवळतो. ह्याच्या सुगंधामुळे साप ह्या झाडाखाली येतात असेही म्हणतात.

हिरव्या चाफ्याच्या झाडाला फळेही हिरवीगार लागतात. लंबगोलाकार टोकाला निमुळती आणि घडात ही फळे लागतात. त्याच्या बी पासुन रोप तयार करता येते.

ह्याचा नावाप्रमाणे हिरव्या चाफयाची पानेही हिरवीगार असतात.
Hirvachpha2.JPG

माझ्या माहेरी हे झाड आहे. मी माहेरी गेले की पहीला पाठी जाते कॅमेरा घेउन आणि झाडावर फुल आहे का पाहते. मागे गेले तेंव्हा अगदीच जन्मलेल्या बाळाप्रमाणे कळी आली होती.
Hirva chapha1.JPG

त्यानंतर बर्‍याच दिवसांनी गेल्याने ह्या आकारावर फुल आले होते.
From Apr 27, 2011

अजुन ४-५ दिवसांनी गेल्यावर पाहील तर पुर्ण होत आलेल्या फुलाचे सौदर्य न्याहाळण्यासाठी एक पाखरू त्या फुलाला साथ देत होत. तेही सुंदर होत. मी फोटो साठी फांदीला सरकवुन पोझ देत होते तरी ते त्याची साथ सोडायला तयार नव्हते. उलट त्यानेच फोटोसाठी पोझ दिल्या.

ह्याची कळी आल्यापासुन साधारण १०-१२ दिवस लागतात हे पुर्ण फुल व्हायला. दुसर्‍या दिवशी सकाळी हे फुल पुर्ण झाल होत. फुल तयार झाले की त्याच्या पाकळ्या फाकतात. अगदी वाटी दिसायला लागते. ते पाखरू अजुन हलल नव्हत.

आता दुसर्‍या दिवशी मला येता येणार नव्हत म्हणुन हे फुल मी काढुन घरी घेउन गेले. त्याच्या दुसर्‍या दिवशी हा हिरवा चाफा स्वत:वर पिवळा रंग रंगवु लागला. घरात सर्वत्र सुगंधही पसरला होता.

असा आहे महिमा ह्या हिरव्या चाफ्याचा (फोटो क्लियर नसल्या बद्दल क्षमस्व).

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जागू, ये माझ्याकडे एकदा. तुला आमच्या इमारतीच्या गच्चीवरुन फांद्या पसरलेलं हिरव्या चाफ्याचं झाड दाखवीन Happy गच्चीतून फुलं हातात. नक्की ये.

शैलजा फोटो टाक ना ग. खुप जुन असेल म्हणजे ते झाड. आणि फुलेही भरपुर येत असतील. बर मग आपण याला आता झाडच म्हणु. मी लहान असल्या पासुन आमच्याकडे झाड होत ते वेलीसारख होत पण ते उंच होत. आठवल आता. आम्हाला कधी कधी काठी घेउन फुल काठावी लागायची. ते झाड बर्‍याच वर्शापुर्वी गेल. आता नविन लावल आहे. त्याच मोठ झाड व्हायला बराच वेळ लागेल.

अश्विनी ह्या फुलाचा साधारण तसाच फणस पिकल्यासारखा वास असतो. पण जर झाडावर फुल असेल तरच वास येतो. झाडला नाही येत.

जागू, अशा झाडांना सकर म्हणतात (दुसरे उदाहरण मधुमालती) हि झाडे आधी झुडुपासारखी वाढतात, त्यांना आधार मिळायला लागला, कि मूळातूनच परत धुमारे फुटतात आणि आधाराने वर वाढतात. हिरव्या चाफ्याला, एक "हूक" पण असतो.

हिरवा चाफा अगदी सुगंधी फुल. सुगंध पण कसा वेड लावणारा. आमच्या सुदैवाने कॉलनीत बरीच झाडे होती, नंतर शाळेत आणि आता कंपनीतही.
एक मात्र याची फुले खुप उंचावर येतात आणि लवकर गळतात.

मला वाटतंय यात पण जाती प्रजाती असाव्यात. कारण मी पाहिलेलं झाड मध्यम उंचीचं आणि आपल्याला हाताशी फुलं येतील असं होतं.

हेहे खुष खबर मी कालच माहेरी जाउन बघितले तर हिरव्या चाफ्याला फळ लागली आहेत. वरती फोटो लोड केला आहे.

आणि हे पहा आधार नसल्याने त्याची फांदी खाली आली आहे.

खूपच छान! Happy

हिरवा चाफा उर्फ कवठी चाफा.. कवठासारखा फुलांचा सुगंध खूपच सुरेख! आमच्या कॉलेजमध्ये असताना पाहिलेले झाड आमच्या केमिस्ट्री लॅब समोर बागच होती म्हणा ना हिरव्या चाफ्याची मस्त मंद कवठी सुगंध पसरायचा फुले पिकु लगली की! Happy

कृष्णा, हा हिरवा चाफाच आहे. आम्ही ह्याला लाकडी चाफाही म्हणतो..
कवठी चाफा वेगळा असतो. कवठी चाफ्याचा रंग पांढरा आणि पाकळ्या गोल गोल अंडाकृती असतात..

कृष्णा, हा हिरवा चाफाच आहे. आम्ही ह्याला लाकडी चाफाही म्हणतो>>>

मॅगी, तसे असेलही कदाचित. तो मी प्रत्यक्ष पाहिलेला नाही हा पाहिलेला. पण ह्याच्या पिकलेल्या फुलांचा गंध कवठा सारखा येतो. त्यांमुळे आम्ही म्हणायचो! Happy

आमच्याकडे, हा पण आणि कवठी चाफा पण>>>>

येऊ द्या मग त्याचे ही फोटो आम्हाला तेवढेच पहायला मिळतील! Happy

हो हो कवठी चाफा आणि हिरवा चाफा फरक आहे. वरती हेमाताई यांनी फोटो दिलाय त्यालाच आम्ही कवठी चाफा म्हणतो. तो बघितलाय मी, हिरवा चाफा नाही.

Pages