हिरवा चाफा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 2 June, 2011 - 07:27

हिरवा चाफा ह्या नावकडे लक्ष केंद्रित केल की वेगळच वाटत. हिरवी पालवी, हिरवी राई, हिरवागार परिसर, हिरवी पाने, गवत हेच ऐकायची आपल्याला सवय असते. पण हिरवे फुल म्हणजे जरा हटकेच. हिरव्या रंगामुळे झाडावर तो लपाछुपीच खेळत असतो. एका नजरेत सहसा ह्याचे छोटे फुल दिसत नाही.

बाळ फुलाला वास येत नाही. ज्या दिवशी फुल तयार होते त्यादिवशी ह्याचा सुगंध परिसरात दरवळायला लागतो. हिरव्या चाफ्याचा सुगंध मात्र पिवळा झाल्यावर जास्त दरवळतो. ह्याच्या सुगंधामुळे साप ह्या झाडाखाली येतात असेही म्हणतात.

हिरव्या चाफ्याच्या झाडाला फळेही हिरवीगार लागतात. लंबगोलाकार टोकाला निमुळती आणि घडात ही फळे लागतात. त्याच्या बी पासुन रोप तयार करता येते.

ह्याचा नावाप्रमाणे हिरव्या चाफयाची पानेही हिरवीगार असतात.
Hirvachpha2.JPG

माझ्या माहेरी हे झाड आहे. मी माहेरी गेले की पहीला पाठी जाते कॅमेरा घेउन आणि झाडावर फुल आहे का पाहते. मागे गेले तेंव्हा अगदीच जन्मलेल्या बाळाप्रमाणे कळी आली होती.
Hirva chapha1.JPG

त्यानंतर बर्‍याच दिवसांनी गेल्याने ह्या आकारावर फुल आले होते.
From Apr 27, 2011

अजुन ४-५ दिवसांनी गेल्यावर पाहील तर पुर्ण होत आलेल्या फुलाचे सौदर्य न्याहाळण्यासाठी एक पाखरू त्या फुलाला साथ देत होत. तेही सुंदर होत. मी फोटो साठी फांदीला सरकवुन पोझ देत होते तरी ते त्याची साथ सोडायला तयार नव्हते. उलट त्यानेच फोटोसाठी पोझ दिल्या.

ह्याची कळी आल्यापासुन साधारण १०-१२ दिवस लागतात हे पुर्ण फुल व्हायला. दुसर्‍या दिवशी सकाळी हे फुल पुर्ण झाल होत. फुल तयार झाले की त्याच्या पाकळ्या फाकतात. अगदी वाटी दिसायला लागते. ते पाखरू अजुन हलल नव्हत.

आता दुसर्‍या दिवशी मला येता येणार नव्हत म्हणुन हे फुल मी काढुन घरी घेउन गेले. त्याच्या दुसर्‍या दिवशी हा हिरवा चाफा स्वत:वर पिवळा रंग रंगवु लागला. घरात सर्वत्र सुगंधही पसरला होता.

असा आहे महिमा ह्या हिरव्या चाफ्याचा (फोटो क्लियर नसल्या बद्दल क्षमस्व).

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

काय सांगतेस शैलजा. खर तर ते असे पिवळे झाले की जास्ती मस्त वास सुटतो. Happy

वासाचा क्रम लावला तर असा लावता येईल.

१. पांढरा (सोन)चाफा
२. पिवळा (सोन)चाफा
३. कवठी चाफा
४. हिरवा चाफा
५. पांढरा/लाल चाफा. (याच्या पाकळ्या दुडपुन अंगठ्या मस्त होतात)

माझ्या माहीती नुसार ...हिरव्या चाफ्याचाच सुगंध सर्वात जास्त मोहक असतो !!

जागुतै ,
मला हिरव्याचाफ्याचे रोप हवे आहे ...कुठे मिळेल ??

हिरवा चाफा... कसला भन्नाट गंध असतो त्याचा!
लहानपणी आमच्या शाळेच्या कुंपणावर होता. त्यानंतर बाजारात फुले बघीतली खुप वेळा. पण झाड नाहीच दिसले कुठे.. Sad
धन्स गं !

सुरेख!

हिरवा चाफा... कसला भन्नाट गंध असतो त्याचा!>>

म्हणून तर ते गाणं आहे न, "लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल का?"

जागु मस्त फोटो गं.. आता कुठे राहिलीत ही झाडे? कोणालाही त्यांचे अप्रुप उरले नाही.

माझे डोके दुखते याच्या वासाने Happy

मस्त!!

सावनी अनिमोदन.. Happy

त्या निमित्ताने एका जुन्या गाण्याचीही आठवण निघाली.
"लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल का?
प्रित लपवूनी लप्पेल का"

धन्स आर्च.. Happy

खुप मस्त.. लहानपणी शाळेचे रिक्षावाले खरेकाका अधुन मधुन आम्हाला द्यायचे . त्याची आठ्वण झाली ...

आमच्या ब्रँचमध्ये हिरवा चाफा अजुनही आहे . आधी दोन होते पण ATM च्या जागेने एकाचा
बळी घेतला, दुसरे मात्र अगदी प्रवेशद्वारा जवळच आहे.

छान फोटो. ही फूले पटकन दिसतच नाहीत झाडावर, वासावरुनच कळते कि फूल उमललेय ते. याची फळे पिकल्यावर खाउन पण बघितली आहेत. गोडसर लागतात. फळांना पण वास येतो.

शैलजा, साधना, पन्ना, सायली, विप्रा, रैना Happy
कांदेपोहे पिवळा कवठीचाफाही असतो.
टग्या जवळच्या नर्सरीत सापडते का पहा. तुम्ही कुठे राहता ? नसेल मिळत तर मी घेउन ठेवेन.

विशाल, आर्च, सुमंगल, अरुंधती, मानुषी, सावनी, किरु, अनु धन्यवाद.

दिनेशदा तुम्हाला अनुमोदन. ती फळे पिकल्यावर त्यांना फुलासारखाच वास येतो.

योगेश तु फोन केला होतास हिरव्या चाफ्यासाठी तेंव्हापासुनच ह्याच्या मागावर होते मी.

यो, त्याला हलवुन सुद्धा ते हलत नव्हत इतक तल्लीन झालेल ते.

अमी ह्याच झुडुप होत. मोठ झाल तर उंचही वाढत.

जागू, माझ्या आजोळी हिरवा चाफा होता. फुल शोधायला वेळ लागायचा कारण पानांमध्ये लपायचं ते. पिकलेल्या फणसासारखा वास यायचा हिरव्या चाफ्याला.

शैलजा अग त्याला झुडूप म्हणाव की वेल हेच मला कळत नाही. झाड मी अजुन पाहील नाही. झाडाबद्दलची माझी व्याख्या जो सरळ उभा राहतो, ज्याला कडक बुंधा आहे, ज्यांच्या फांद्यांना आधाराची गरज नाही अशी आहे. हे झाड वेलीसारखच असत ना ग.

१. पांढरा (सोन)चाफा
२. पिवळा (सोन)चाफा
३. कवठी चाफा
४. हिरवा चाफा
५. पांढरा/लाल चाफा. (याच्या पाकळ्या दुडपुन अंगठ्या मस्त होतात)

याच्या पाकळ्या दुडपुन अंगठ्या मस्त होतात >>>>>>>> अगदी अगदी............ Happy

नागचाफा म्हणतात तो यातला कोणता??

साक्षी नागचाफा निसर्गाच्या गप्पांवर आहे कुठेतरी शोधावा लागेल. बहुतेक पहिल्या भागात आहे.

अश्विनी, अग माझ्या आइकडे पण अजुन तिच साईझ आहे आणि शिवाय त्याच्या फांद्यांना आधार द्यावा लागतो वाकतात म्हणुन. म्हणुन झुडूप कम वेल ह्या प्रकारातलच वाटत मला ते.

Pages