अशीही तशीही (कविता/गझल)
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
5
अशीही तशीही
ओठांनी वाचतो शब्द मौनाचे
"कळतेस" तू अशीही तशीही
भास आभास हा खेळ कल्पनांचा?
"दिसतेस" तू अशीही तशीही
एकच खळी परि लागते जिव्हारी
"रुजतेस" तू अशीही तशीही
डाव मोडून पुन: मांडतो नव्याने
"जिंकतेस" तू अशीही तशीही
मिळते पत्र जरी पत्ता चुकलेले
"भेटतेस" तू अशीही तशीही
सावल्यांच्या छत्र्या घेवून फिरतो
"जाळतेस" तू अशीही तशीही
डोळ्यात जागतो गाव चांदण्यांचा
"स्मरतेस" तू अशीही तशीही
विषय:
प्रकार:
शेअर करा
<<एकच खळी परि लागते
<<एकच खळी परि लागते जिव्हारी
"रुजतेस" तू अशीही तशीही
डाव मोडून पुन: मांडतो नव्याने
"जिंकतेस" तू अशीही तशीही<<
खल्लास ओळी आहेत या! मस्तच !
अहा! एकसे एक. ऊघड्या खुपलं
अहा! एकसे एक.
ऊघड्या खुपलं मात्र.
मस्तच ...!
मस्तच ...!
>>ऊघड्या खुपलं
>>ऊघड्या खुपलं मात्र
चिन्नु,
थोडासा बदल केलाय.. पहा बरा वाटतो का.
अहा!! मस्तचं..
अहा!! मस्तचं..