सांगू नकोस
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
6
तू म्हणशील "तू सुंदर दिसतेस"
मी म्हणेन "मी सुंदर असेनही पण सांगू नकोस मला तसं.."
तू म्हणशील "तुझी खूप आठवण आली"
मी म्हणेन "आठवण आली असेलही पण सांगू नकोस मला तसं.."
तू म्हणशील "मी तुला ओळखतो"
मी म्हणेन "ओळखत असशीलही कदाचित.. पण सांगू नकोस मला तसं.."
आता तू विचारशीलच ना "का?"
मी हसून फक्त म्हणेन "तेही तुला माहीतच असेल.."
विषय:
प्रकार:
शेअर करा
सहीच.....
सहीच.....
मी मात्र म्हणेन.. मनातल्या
मी मात्र म्हणेन..
मनातल्या कल्पना मांडलेली कविता आवडली !
वाह!!!
वाह!!!
खरंय अनिल "आम्ही मनातच
खरंय अनिल "आम्ही मनातच म्हणायचे" असा पुलंचा जगप्रसिद्ध असा वल्डफेमस आणि माझा आवडता असलेला ड्वायलॉक आठवला. त्याची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवादम.
बाकी आनंदयात्री, चिमुरी धन्यवाद..
मस्तच
मस्तच
वॉव, मस्तच ! खुप गोड आहे ही
वॉव, मस्तच ! खुप गोड आहे ही कविता. एकदम आवडली.